करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण नक्की जिंकू- नितीन गडकरी

नवी दिल्ली । जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाच्या लढाईत पुढे आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरु झाले आहेत. बंदरं सुरु झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलं जातं आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत आपण बरंच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ तसंच करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढतो आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू असा विश्वास … Read more

देशातील कोरोनाबाधीतांची संख्या १८ हजार ६०१ वर, ५९० जणांचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील कोरोना बळींची एकूण संख्या आता १८,६०१ वर पोहोचली आहे.शनिवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, यातील १४,७५९ अद्यापही कोविड -१९ विषाणूमुळे पीडित आहेत. उपचारानंतर सुमारे ३२५१ रुग्णांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे,परंतु मृतांचा आकडा मात्र ५९० वर पोहोचला आहे.आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अंदमान आणि निकोबारमधील कोरोनाग्रस्त लोकांची संख्या आता १६ … Read more

Video: मास्क नाही आहे, टेन्शन नहीं लेने का! रोनित रॉयने शोधली मास्क बनवण्याची भन्नाट आयडिया

मुंबई । देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. अशा वेळी काळजी घेण्याची विशेष गरज आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार हात धुण्याची,बाहेर जातांना तोंडाला मास्क लावण्याचं आवाहन करत आहे. मात्र सध्या बाजारात मास्कचा तुटवडा जाणवत असून काही मास्क हे प्रचंड महाग आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला ते परवडण्यासारखे नाहीत. त्यामुळेच अभिनेता रोनित रॉयने घरच्या घरी कमी खर्चात … Read more

देशातील ४५ जिल्ह्यांमध्ये १४ दिवसांपासून करोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही

मुंबई । केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीबाबत माहिती देणारी आकडेवारी जाहीर करण्यात आली. आज दिल्लीत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत ही आकडेवारी सांगण्यात आली. आकडेवारीनुसार देशातील काही भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असल्याचा सकारात्मक ट्रेंड समोर आला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज … Read more

देशात १७० जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट – केंद्रीय आरोग्य मंत्रालय

नवी दिल्ली । करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत जे यश आले आहे ते काम पुढेही असेच सुरु ठेवायचे आहे. यानुसार देशातील जिल्ह्यांचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात आले आहे. पहिल्या प्रकारात हॉटस्पॉट जिल्हे, दुसऱ्या प्रकारात हॉटस्पॉट नसलेले पण तिथे करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत असे जिल्हे आणि तिसरा प्रकार म्हणजे ग्रीन झोन जिल्हे या जिल्ह्यांमध्ये एकही करोनाचा … Read more

मुंबईत करोना पॉझिटिव्ह महिलेची रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई । राज्यात एकीकडे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या धास्तीनं आत्महत्या केल्याची प्रकरण सुद्धा समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईत घडल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका २९ वर्षीय महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आली आहे. मुंबईतील नायर रुग्णालयात या महिलेवर उपचार सुरु होते. … Read more

मुंबईत कोरोना मृत्यूने गाठली शंभरी,करोनाग्रस्तांची संख्या दीड हजार पार

मुंबई । मुंबई हे राज्यातील कोरोनाच केंद्रबिंदू बनलं आहे. आज मुंबईत दिवसभरात करोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत करोनाची लागण झाल्याने एकूण १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत पावलेल्या ९ जणांपैकी ७ जणांना दीर्घकालीन आजार होते तर २ जण वयोवृद्ध होते.तर दुसरीकडे मुंबईत आज करोनाचे १५० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुबंईत … Read more

मास्क न घालणे एका पुणेकराला पडलं चांगलंच महागात

पुणे प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. प्रशासनाने याबाबत नियम सुद्धा घालून देत घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक केलं आहे. याहीपेक्षा आपल्या आणि समाजाचे आरोग्याची काळजी घेत एक जबाबदार नागरिक म्हणून मास्क वापरणं हे आपलं कर्तव्य आहे. मात्र, तरीही बरेच नागरिक बेफिकिरीने घराबाहेर पडत आहेत. पुण्यात मास्क न लावत बाहेर … Read more

TikTok वर मास्कची उडवली होती खिल्ली,आता आता भोगतोय कोरोनाची फळं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. प्रशासन, सरकार आणि डॉक्टर सर्व लोकांना सतत मास्क घाला, सॅनिटाईझ करुन घरात रहाण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान असेही काही लोक आहेत जे या सल्ल्याचे पालन करण्यास तयार नाहीत. मध्य प्रदेशच्या सागरमध्येही असेच एक प्रकरण पाहायला मिळाले. येथे,टिक टॉक मोबाइल अ‍ॅपवर व्हिडिओ बनविणारा आणि मास्कची चेष्टा करणारा … Read more

बाॅलिवुडच्या या अभिनेत्रीने चक्क पायमोज्यापासून बनवला मास्क, पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगात सर्वत्र कोरोनाव्हायरसचा उद्रेक सुरू आहे. ज्यामुळे लोक त्यांच्या घरीच आपला वेळ घालवत आहेत. भारतातही कोरोना वाढू नये म्हणून लॉकडाउन सुरू आहे, अशा परिस्थितीत लोकांना अनेक संकटांनाही सामोरे जावे लागत आहे, परंतु कोरोना संकटावर मात करण्यासाठी लोक एकमेकांना सर्व प्रकारे सहकार्य करीत आहेत. बॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा या लॉकडाउनच्या दिवसात आपल्या कुटुंबियांसमवेत घरी … Read more