धक्कादायक! एका महिन्यात मुंबईतील रुग्णसंख्या शंभर पटीने वाढली

मुंबई । संपूर्ण देशाला कोरोनाने जखडून ठेवलं आहे. दिवसागणिक कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत जाऊन अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. देशात सर्वात जास्त कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात सापडले आहेत. महाराष्ट्रात कोरोना प्रसारच मोठं केंद्र बनलेल्या मुंबापुरी म्हणजेच मुंबईत कोरोनाने हैदोस घातलं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या या मुंबईत संपूर्ण देशाच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण आहेत. एवढंच नव्हे … Read more

खरंच कोरोना व्हायरस सूर्यप्रकाशात नष्ट होतो? अमेरिकी शास्त्रज्ञांचा मोठा दावा

वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. या महामारीला निकालात काढण्यासाठी संपूर्ण जग निकाराची लढाई लढत आहे. या महामारीला जगातून हद्दपार करण्यासाठी असंख्य संशोधक या कोरोना व्हायरसच्या सखोलअभ्यासात गुंतले आहेत. दरम्यान, भय आणि अनिच्छतेच्या वातावरण कोरोना व्हायरसबाबतचे रोज नवे दावे समोर येत आहेत. असाच एक दावा अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केला आहे. कोरोनाचा व्हायरस सूर्यप्रकाशात … Read more

जगातील सर्वात तरुण पंतप्रधान क्वारंटाइन! कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्याने उचलले पाऊल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात तरुण पंतप्रधान सना मारिन यांनी स्वत: ला क्वारंटाइन केले आहे.फिनलँडच्या पंतप्रधान मरीन यांनी आपल्या घरी काम करणारी व्यक्ती दुसर्‍या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून प्रसिद्ध झालेल्या निवेदनानुसार पंतप्रधान मरीन यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे.त्यांना संसर्ग होण्याची चिन्हे नाहीत.डिसेंबरमध्ये चर्चेत आल्यापासून ३४ वर्षांची सना … Read more

दिलासादायक! राज्यातील कोरोना हॉटस्पॉटच्या संख्येत घट; १४ वरून ५ वर

मुंबई । महाराष्ट्रात १४ हॉटस्पॉट होते ते आता ५ वर आले आहेत हे चित्र दिलासादायक आहे. औरंगाबाद, सांगली, अहमदनगर हे हॉटस्पॉट होते. मात्र आता ते हॉटस्पॉट नाहीत. मालेगाववर जास्त फोकस केला असता तर हॉटस्पॉट ४ झाले असते अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी संवाद … Read more

महाराष्ट्रात ४३१ नवे करोना रुग्ण, १८ जणांचा मृत्यू, बाधितांची संख्या ५६४९वर

मुंबई । राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यभरात नवीन ४३१ रुग्ण सापडले. त्यामुळं रुग्णांची संख्या आता ५ हजार ६४९ वर पोहोचली आहे. तर दिवसभरात आज १८ जण दगावले आहेत. आज ६७ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ७८९ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ४५९१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याच्या … Read more

नवी मुंबईतील आयटी कंपनीत १९ जणांना कोरोनाचा संसर्ग

नवी मुंबई । नवी मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आज आणखी २० कोविड पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यात महापे येथील टीटीसी एमआयडीसी इंडस्ट्रीयल इस्टेटमधील एका आयटी कंपनीच्या १९ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या घटनेने एमआयडीसीतील विशेष करून आयटी कंपनीत काम करणाऱ्या सर्वांमध्येच भीतीचे वातावरण आहे. महापे येथील एका आयटी कंपनीत लॉकडाउन असूनही काम सुरू … Read more

लॉकडाऊनपासून आतापर्यंत राज्यात 49 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई । राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून म्हणजे 22 मार्च पासून ते आज दुपारी 4 वाजेपर्यंत किती पोलिसांना कोरोनाची लागण झाली याची आकडेवारी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यभरातील 11 पोलीस अधिकारी व 38 पोलिसांची करोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाकडून मिळाली आहे. राज्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी … Read more

चीनमधून मधून आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवा; आयसीएमआरची राज्यांना सूचना

नवी दिल्ली । चीनमधून आयात केलेल्या राज्यांना देण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटचा वापर थांबवण्याची सूचना आयसीएमआरने केली आहे. काही राज्यांमध्ये हे टेस्टिंग किट फोल ठरत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. २ दिवसांनंतर या संदर्भात नव्याने दिशानिर्देश जारी करण्यात येतील, अशी माहिती आयसीएमआर(Indian council of medical research)चे अध्यक्ष डॉ. रमण गंगाखेडकर यांनी दिली. … Read more

धक्कादायक! चीनमधून आयात केलेले कोरोना टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे; राजस्थान सरकारचा दावा

जयपूर । चीनमधून आयात केलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे येत असल्याचा खळबळजनक दावा राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजस्थान सरकारनं चीननं पाठवलेल्या या किट्सचा वापर करणं थांबवलं आहे. यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे. प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे रिपोर्टही चीनमधून आयात … Read more

राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनच्या निकषात बदल- आरोग्यमंत्री

मुंबई । कोरोनाबाधित रुग्णसंख्येनुसार जिल्हा व प्रमुख महानगरांची तीन भागांत विभागणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले होते. त्यानूसार राज्यातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. दरम्यान आता राज्यातील रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन ठरवण्याचे निकष बदलल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आता 14 दिवसांमध्ये नव्याने एकही रुग्ण … Read more