धक्कादायक! चीनमधून आयात केलेले कोरोना टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे; राजस्थान सरकारचा दावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जयपूर । चीनमधून आयात केलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सचे रिपोर्ट चुकीचे येत असल्याचा खळबळजनक दावा राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजस्थान सरकारनं चीननं पाठवलेल्या या किट्सचा वापर करणं थांबवलं आहे. यामुळे चीनमधून आयात करण्यात आलेल्या कोरोना रॅपिड टेस्टिंग किट्सच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.

प्रयोगशाळेच्या रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांचे रिपोर्टही चीनमधून आयात केलेल्या या रॅपिड टेस्टिंग किट्स निगेटिव्ह दाखवत आहेत. ही धक्कादायक बाब निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकारनं एक समिती स्थापन केली होती. त्या समितीनं किट्सच्या रिझल्टचा अभ्यास केला. त्यानंतर या रॅपिड टेस्टिंग किट्सनं ९० टक्के अचूक निकाल देणं अपेक्षित आहे. पण, या किट्स फक्त ५.४ टक्केच अचूक निकाल देत असल्याचं समोर आलं. त्यामुळं चीनने पाठवलेल्या किट्स चुकीचा रिझल्ट दाखवत असल्यानं समितीनं या किट्सचा वापर न करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार राज्य सरकारनं तातडीनं या किट्सचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती शर्मा यांनी दिली.

दरम्यान, या किट्सबद्दल आयसीएमआरला (भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद) माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात त्यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आता आम्ही काय करायचं? असा प्रश्नही आम्ही आयसीएमआरकडं उपस्थित केला आहे. राजस्थान सरकार आयसीएमआरच्या उत्तरांची प्रतिक्षा करत आहे असंही शर्मा यांनी म्हटलं.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”. 

Leave a Comment