कोरोनाग्रस्त रुग्णांसाठीची प्लाझ्मा थेरपी नक्की आहे तरी काय?
जे रुग्ण अशा जिवाणू किंवा विषाणूपासून झालेल्या रोगातून बरे झालेले असतात त्यांच्या शरीरात त्या जिवाणू किंवा विषाणू विरुद्ध प्रतिजैविके तयार झालेली असतात. अशा रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा (रक्तद्रव) हा या रोगाच्या बाधित रुग्णाच्या उपचारासाठी वापरला जातो आणि यालाच प्लाझ्मा थेरपी म्हणतात.