सातारा जिल्ह्यात 844 कोरोनामुक्त तर 861 पाॅझिटीव्ह

Corona Satara N

सातारा | जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज गुरूवार दि. 26 रोजी संध्याकाळपर्यंत 844 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. तर जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 861 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 9 बाधितांचा मृत्यु … Read more

इच्छाशक्तीच्या जोरावर ९५ वर्षाच्या आजीबाई घरीच झाल्या कोरोनामुक्त

सांगली | कुपवाड शहरातील शिवशक्ती नगर मधील 95 वयोवर्ष असलेल्या श्रीमती मुक्ताबाई रामचंद्र कारंडे यांनी कोरोना या भयंकर रोगावर जिद्द व इच्छाशक्तीने गृह विलगीकरणात उपचार घेत यशस्वी मात केली आहे. आजींना धाप लागण्यासारखा त्रास सुरू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने आजीबाई कोरोनामुक्त झालेल्या आहेत. मुक्ताबाई कारंडे यांच्या नातेवईकांनी आरोग्य विस्तार अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या सहाय्याने त्वरित … Read more

सांगलीत कर्नाटकातून येणारा ऑक्सिजन पुरवठा खंडीत, दुपारपर्यंत पुरेल ऐवढा ऑक्सिजन साठा शिल्लक

oxygen plant

सांगली | कोरोनाच्या युध्दजन्य परिस्थितीत कर्नाटकातून सांगली जिल्ह्यासाठी दररोज मिळणारा 10 टन ऑक्सिजन बंद करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने ऑक्सिजन पुरवठा थांबविण्यात आला. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने तुटवडा निर्माण होण्याची भीती असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सद्यस्थितीत शुक्रवारी दुपारपर्यंत पुरेल ऐवढा ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी … Read more

फलटण शहरांसह हाॅटस्पाॅट गावे सात दिवस कटेंटमेंट झोन म्हणून जाहीर ः प्रांताधिकारी

फलटण | फलटण शहरांप्रमाणेच तालुक्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असेलेली कोळकी, जाधववाडी, फरांदवाडी, विडणी, साखरवाडी, वाखरी, वाठार निंबाळकर, तरडगाव ही गावे सुध्दा कटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्याची माहिती फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली. फलटण तालुक्यात कोरोनाचे रूग्ण हे मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत. कटेंटमेंट झोन जाहीर केलेल्या गावामध्ये मेडीकल व दवाखाने वगळता इतर सर्व अत्यावश्यक … Read more

गुजरातमध्ये कोव्हीड हाॅस्पीटलला भीषण आग ः 18 जण मृत्यूमुखी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | गुजरातमधील भरूच शहरातील पटेल वेलफेयर हाॅस्पीटलमध्ये भीषण आग लागलेली आहे. या आगीच्या घटनेत 18 रूग्ण मृत्यूमुखी पडलेले असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे समजत आहे. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रात्री एक वाजता शाॅर्टसर्किंटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण समजत आहे. कोरोना रूग्णांसाठी असलेले भरूच शहरातील पटेल हाॅस्पीटलमध्ये शुक्रवारी रात्री … Read more

खंबाटकी घाटात ऑक्सिजन लावलेल्या कोरोना बाधितांच्या रुग्णवाहिकेला अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके भोर येथून ऑक्सिजन लावून एका कोरोना बाधित रुग्णाला घेऊन वाईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात झाला. हा अपघात पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला. पोलिसांनी दुसरी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी पाठविले. याबाबत माहिती अशी की, भोर येथील एका कोरोना बाधित रुग्णाची ऑक्सिजन लेवल कमी असल्याने त्याचे प्राण … Read more

कोरोना बाधितांसाठी लोकवर्गणीतून तिरकवाडी ग्रामपंचायतीने उभारले होम आयसोलेशन

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे  कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन होम आयसोलेशन संकल्पनेंतर्गत कोरोना बाधीत रुग्णांसाठी तिरकवाडी (ता. फलटण) येथे कोरोना दक्षता कमिटी, ग्रामपंचायत तिरकवाडी व ग्रामस्थांचे प्रयत्नातून लोकवर्गणीतून जयभवानी हायस्कूल येथे ११ बेडचे होम आयसोलेशन सेंटर सुरु करण्यात आले असल्याची माहिती उपसरपंच नानासाहेब काळुखे यांनी दिली आहे. फलटण तालुक्यातील तिरकवाडी व परिसरात कोरोना … Read more

कासारशिंरबेत कोरोना बाधित हाफसेंच्युरीकडे, ग्रामपंचायतीकडून आठ दिवसांचा जनता कर्फ्यु

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कासारशिरंबे गावात कोरोनाची रुग्णसंख्या जास्त असल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत कासारशिंरबे गावात हाफसेंच्युरीकडे कोरोना बाधितांचा आकडा आला आहे. त्यामुळे कोरोना साखळी खंडित करण्याकरता कासारशिरंबेत रविवार दि. 25 एप्रिल ते शनिवार दि. 1 मे असा आठ दिवसांचा जनता कर्फ्यु लावण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायतीमार्फत देण्यात आली … Read more

सामाजिक संस्थानकडून हाॅस्पीटलला 20 ऑक्सिजन मशीन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडमधील राजश्री हाॅस्पीटल व एरम हाॅस्पीटल या सोबत अन्य ठिकाणीही ऑक्सिजन कमी असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांना ही माहिती समजली. तेव्हा सामाजिक संस्थानी शहरातील सर्व ऑक्सिजन मशीन हाॅस्पीटलमध्ये देवून रूग्णांना दिलासा देण्याचे काम केले आहे. शहरात दोन हाॅस्पीटलांना 20 ऑक्सिजन मशीन देण्यात आल्या आहेत. कराड शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित आहेत. … Read more

कराडच्या रूग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आल्याबाबतचा ईमेल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील दक्ष कराडकर ग्रुपचे प्रमोद पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखरसिंह व लोकप्रतिनिधी यांना ईमेल केलेला आहे. त्यामध्ये कराड येथील कोरोना रुग्णालयातील ऑक्सिजन साठा संपत आला असून त्याबाबत माहीती घेवून पुरवठा करण्याची मागणी केली आहे. प्रमोद पाटील यांनी ईमेलमध्ये म्हटले आहे की, राज्यात, जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. कराड … Read more