मुंबईत दिवसभरात ११ जणांचा बळी, २०४ नवे करोनाबाधित

मुंबई । देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या २ हजाराच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत आज दिवसभरात करोनाने ११ बळी घेतले आहेत. तर २०४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ७५३ वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या १११ … Read more

कोरोनामुळे कोल्हापूरी चप्पल व्यवसायाला तब्बल १ हजार कोटींचा फटका; मजुरांवर उपासमारीची वेळ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू आहे. या लॉकडाऊनचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. फॅशन स्टेटमेंट म्हणून कोल्हापुरी चप्पल हा ब्रँड जगभर प्रसिद्ध आहे. थोरांपासून लहानपर्यंत कोल्हापूर चप्पल वापरायची क्रेज आहे. ज्या कोल्हापूरच नाव संपूर्ण जगात तिच्या सुबक आणि टिकाऊ चप्पलीमुळे पसरले त्या कोल्हापूरातील चप्पल … Read more

पुदीना वाढवतो रोग प्रतिकारशक्ती तसेच त्वचा आणि केसांची निगा राखण्यास मदतही करतो जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे, देशभरातील लोक त्यांच्या घरातच कैद झाले आहेत. लोक सोशल डिस्टसिंगमुळे एकमेकांपासून अंतर ठेवत आहेत. त्याच वेळी, लोक स्वतःच्या आरोग्याकडेही खूप लक्ष देत आहेत.कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती बळकट ठेवणे फार महत्वाचे आहे कारण ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, त्यांनाच आजारी पडण्याची आणि कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. … Read more

क्वारंटाईन सेंटरमध्ये दलिताने बनवलेले जेवण घेण्यास नकार,एकास अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तर प्रदेशमधील कुशीनगर जिल्ह्यातील नुकतेच एक लाजिरवाणे प्रकरण समोर आले आहे.येथील एका क्वारंटाईन केंद्रावर दलिताने शिजवलेले जेवण जेवण्यास नकार दिल्यामुळे एका ३५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वृत्तानुसार, कुशीनगर जिल्ह्यातील खड्डा ठाण्या अंतर्गत भुजौली खुर्द खेड्यातील रहिवासी सिराज अहमद २९ मार्च रोजी दिल्लीहून परत आले होते आणि ते इतर चार … Read more

रेल्वेला अजूनही रेड सिग्नलच; प्रवासी वाहतूक ३ मेपर्यंत बंद

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन ३ मे पर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी रेल्वे सेवा ३ मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या चालू राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. सर्व आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३ मे पर्यंत … Read more

पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले म्हणाले,”म्हणजे पंतप्रधानांना काही माहितच नाही.”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानमधील कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराबाबत होणाऱ्या दुर्लक्षाची दखल घेत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी केली आणि यावेळी इम्रान खान यांच्या नेतृत्वातील फेडरल सरकार आणि प्रांतीय सरकारांवर जोरदार हल्ला केला. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. ‘जिओ उर्दू’ च्या अहवालानुसार, खंडपीठाने न्यायालयात सरकारची … Read more

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली राज्यात ‘कोरोना’ उपसमितीची स्थापना

मुंबई । करोनाचा उपद्रव झाल्यानंतर राज्यातील सर्वच क्षेत्रातील आर्थिक स्थिती चिंताजनक होत चालली आहे. राज्यावरील करोनाच्या संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी सामना करुन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा बसवण्यासाठी, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी एका ‘कोरोना’ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार … Read more

मदतकार्याचे गॉगल लावून फोटो कसले काढता? ही वेळ आहे का ती – राज ठाकरे

मुंबई । ‘प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंगच बाका असल्यानं नाईलाजानं अनेकांना मदत स्वीकारावी लागत आहे. मात्र, अशावेळी मदतकर्त्यांनी गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का? प्रत्येकानं याचा विचार करावा,’ असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांनाच केलं … Read more

मॅरोडोनाचे चाहत्यांना निरोगी आणि आनंदी राहण्याचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अर्जेटिनाचे महान फुटबॉल खेळाडू दिएगो मॅराडोना यांनी कोरोनाव्हायरसच्या या कठीण काळात चाहत्यांसाठी काही खास संदेश पाठवले आहेत. १९८६ फुटबॉल विश्वचषक विजेत्या अर्जेंटिनाचा संघाचे सदस्य असलेले मॅराडोना सध्या अर्जेंटिनाचा फर्स्ट डिवीजन क्लब गिमनेसिया ला प्लाताचे प्रशिक्षक आहेत.त्यांनी आपल्या देशवासियांना निरोगी आणि सकारात्मक होण्यास सांगितले आहे. मॅराडोना सोशल मीडियावर म्हणाले, “मला इस्टरच्या निमित्ताने … Read more

भारतात ‘या’ ३ राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत संपूर्ण देशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यँत वाढवण्यात आला आहे. संपूर्ण देशातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. कोरोनाचे जास्तीत जास्त रूग्ण या ३ राज्यांमध्येच आहेत. याव्यतिरिक्त सर्वाधिक चिंताजनक गोष्ट म्हणजे, कोरोनामुळे देशभरात झालेल्या मृत्यूंमध्ये निम्म्यापेक्षा जास्त … Read more