भारत-पाक क्रिकेटसाठी आफ्रिदीचे शोएब अख्तरला समर्थन म्हणाला,’कपिल देवने निराश केले’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -१९ या प्राणघातक साथीविरूद्ध लढा उभारण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्याच्या शोएब अख्तरच्या प्रस्तावाचे पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने समर्थन केले आणि म्हटले की या प्रकरणात कपिल देव यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे तो निराश झाला आहे. माजी अष्टपैलू कपिल आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी अख्तर … Read more

केरळने कोरोनाला केलं काबूत, कोरोनावर नियंत्रण मिळवणारे देशातील पहिले राज्य

वृत्तसंस्था । देशात सर्वात पहिला कोरोना व्हायरसची लागण झालेला रुग्ण केरळमध्ये सापडला होता. त्यानंतर संपूर्ण देशात वेगवेगळ्या मार्गाने कोरोनाचा विषाणू फोफावत गेला. ३० जानेवारीला पहिला कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर केरळ सरकारने वेळीच धोका ओळखत पाऊल उचलायला सुरुवात केली. त्याचाच परिणाम म्हणजे देशातील अन्य राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या रोज वाढत असताना केरळमध्ये आता कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण अवघे … Read more

कहर कोरोनाचा! राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ४५५ वर

मुंबई । राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर राज्यात वाढत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाची लागण झालेले १२१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता २ हजार ४५५ वर पोहोचला आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज आढळलेल्या कोरोनाच्या १२१ नव्या रुग्णांपैकी ९२ रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. 121 new COVID19 … Read more

भारताच्या वाटेवर असलेलं मेडिकल किटने भरलेले जहाज अमेरिकेला का पाठवले? WHO म्हणते…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनमधून पसरलेल्या कोरोनाव्हायरसने संपूर्ण जगाचा ताबा घेतला आहे. सर्व देश या विषाणूपासून बचाव करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत, परंतु आता बर्‍याच देशांमध्ये हे वादाचे कारणही बनत आहे. वास्तविक, चीनमधून भारतात येत असलेल्या रॅपिड अँटी बॉडी टेस्ट किट्सची डिलिव्हरी एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात दिली जाणार होती, जी अद्यापही झालेली नाही. या किटच्या डिलिव्हरीला … Read more

३० एप्रिल ऐवजी मोदींनी ३ मे पर्यंत का वाढवला लॉकडाउन, हे आहे कारण

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला असतानाही पंतप्रधान नरेंद्र … Read more

मुंबईत कोरोना मृत्यूने गाठली शंभरी,करोनाग्रस्तांची संख्या दीड हजार पार

मुंबई । मुंबई हे राज्यातील कोरोनाच केंद्रबिंदू बनलं आहे. आज मुंबईत दिवसभरात करोनामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईत करोनाची लागण झाल्याने एकूण १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज मृत पावलेल्या ९ जणांपैकी ७ जणांना दीर्घकालीन आजार होते तर २ जण वयोवृद्ध होते.तर दुसरीकडे मुंबईत आज करोनाचे १५० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुबंईत … Read more

मास्क न घालणे एका पुणेकराला पडलं चांगलंच महागात

पुणे प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणं हे अनिवार्य आहे. प्रशासनाने याबाबत नियम सुद्धा घालून देत घराबाहेर पडताना मास्क बंधनकारक केलं आहे. याहीपेक्षा आपल्या आणि समाजाचे आरोग्याची काळजी घेत एक जबाबदार नागरिक म्हणून मास्क वापरणं हे आपलं कर्तव्य आहे. मात्र, तरीही बरेच नागरिक बेफिकिरीने घराबाहेर पडत आहेत. पुण्यात मास्क न लावत बाहेर … Read more

हा कोरोना तर कुणाल कामराचा मित्र निघाला, शशी थरुर असं का म्हणतायत पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत जगभरात कोरोनाव्हायरसच्या १८,००,००० प्रकरणांची नोंद झाली आहे. भारतासह बर्‍याच देशांमध्ये या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. फ्लाइट, गाड्या धावत नाही आहेत. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाउन सुरु आहे ज्या अंतर्गत सर्व प्रकारच्या गाड्या बंद आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या परिस्थितीला प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या … Read more

कोरोनाच्या संकटात भारताला गुगलच्या CEOने केली तब्बल इतक्या कोटींची मदत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाविरुद्धच्या लढाईत अनेक जण केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक मदत करत आहे. अशातच जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन असलेल्या गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी भारताला ५ कोटी इतकी मदत दिली आहे. कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत मोठ्या व्यक्ती आणि उद्योग संघटना केंद्र आणि राज्य सरकारांना आर्थिक स्वरुपात मदत करत आहेत. भारतीय स्टार, … Read more

यंदाची आंबेडकर जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार

मुंबई । कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. दरम्यान, त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. … Read more