आज जागतिक महासागर दिन; ‘शाश्वत महासागरांसाठी नाविन्यता’ ही यंदाची थीम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या एकूण पाण्याच्या ९७% पाणी हे महासागरांमध्ये सामावलेलं असल्याची माहिती शालेय शिक्षणातून मिळाली होती. महासागरांचा विचार करत असताना या पाण्यामध्ये अधिवास करणारे जलचर, या पाण्याचं सांडपाणी आणि घातक कचऱ्यापासून करावं लागणारं संरक्षण या गोष्टीही तितक्याच महत्वाच्या ठरतात. … Read more

मिशन बिगिन अगेनचा तिसरा टप्पा आजपासून सुरु; काय चालू होणार, काय बंद राहणार? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेन द्वारे आजपासून राज्यातील काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी दिली आहे. संचारबंदीच्या शिथिल झालेल्या नियमांनुसार आजपासून खाजगी कार्यालये सुरु केली जाणार आहेत. १०% कर्मचाऱ्यांना कार्यालयात परवानगी असणार आहे. मुंबईमध्ये जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरु केली जाणार आहे. कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील अनेक भागात नियम शिथिल केले गेले आहेत. आजपासून … Read more

अरविंद केजरीवाल आयसोलेशनमध्ये, कोरोना चाचणी होणार

नवी दिल्ली | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना कालपासून बारीक ताप आणि घशात खवखव होतेय. यामुळे त्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. त्यांनी बोलावलेल्या सर्व सर्व बैठका काल दुपारपासूनच रद्द करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कालच दिल्लीकरांसाठी मोठा निर्णय घेतला. दिल्लीतील रुग्णालयांमध्ये फक्त दिल्लीकरांवर उपचार होतील. मग ती हॉस्पिटल्स … Read more

सातारा जिल्ह्यात आज पुन्हा १० नवीन कोरोनाग्रस्त; दोघांचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी | सातारा जिल्हयातील दहा जणांचे रिपोर्ट कोरोनाबाधित आले आहेत. यामध्ये खडाळा तालुक्यातील आसवली येथील 60 वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील 75 वर्षीय पुरुषाचा घरीच मृत्यु झाला आहे. या दोघाचा मृत्यु पश्चात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर … Read more

धक्कादायक! हर्सूल कारागृहात एकाच दिवशी सापडले कोरोनाचे 29 रुग्ण

औरंगाबाद प्रतिनिधी | हर्सूल कारागृहात एकाच दिवशी 29 जणांचे स्वाब नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व धार्मिक स्थळावर बंदी असताना हर्सूलमध्ये शारीरिक अंतर न पाळता ईदच्या दिवशी सामूहिक नमाज पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आता इथे कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवल्याची चर्चा सुरू आहे. आज सकाळी 90 जणांचे … Read more

मुंबई, दिल्ली पेक्षा ‘या’ शहरात कोरोनाचा मृत्यू दर सर्वाधिक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली आणि मुंबई हे भारतातील कोरोनाव्हायरसचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेली राज्ये आहे. देशातील एकूण कोरोना प्रकरणांपैकी २० टक्के प्रकरणे ही एकट्या मुंबईतून समोर आली आहेत. पण भारतातील दर दहा लाख लोकसंख्येच्या मागे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे गुजरातमधील अहमदाबाद शहरात घडले आहे. इतकेच नाही तर अहमदाबादमध्येही शंभर कोरोना प्रकरणातील सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण (सीएफआर) … Read more

WHO चा भारताला दिलासा; अपेक्षेपेक्षा कोरोना प्रसाराचा वेग कमीच

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनपासून जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरसने भारतातही आपल्या संसर्गाचा परिणाम वेगाने दाखवायला सुरवात केली आहे. आतापर्यंत देशातील २.२६ लाख लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने एक दिलासा देणारी बातमी दिली आहे. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की, आम्ही भारताच्या कोरोनाच्या परिस्थितीतबाबत जे अंदाज बांधले होते त्यापेक्षा येथील परिस्थिती खूपच … Read more

मुंबईहून अचलपुरला गावी परतलेल्या २३ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई | अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यात असणारर्‍या व काकडा गावात मुंबईहून दिनांक २६ मे रोजी आलेल्या एका २३ वर्षीय युवकाचा कोरोना अहवाल आज सकाळी सकारात्मक आलेला आहे. विशेष म्हणजे या युवकामधे कोणतेही कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत. मात्र तरीही याचा थ्रोट स्वॅब अहवाल कोरोना सकारात्मक आल्याने आता चींता व्यक्त होत आहे. … Read more

भारताने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत इटलीलाही टाकले मागे; मागील २४ तासात सर्वाधिक रुग्ण सापडले

नवी दिल्ली । देशात दोन महिन्याच्या कडक लॉकडाऊननंतरही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात कोरोनाचे ९ हजार ८८७ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २,३६,६५७ इतका झाला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भारतात प्रत्येक दिवशी कोरोनाचे जवळपास १० हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे इटलीला मागे टाकत सर्वाधिक कोरोना … Read more

खाजगी कार्यालये, धार्मिक स्थळे, हॉटेल सुरु पण ‘या’ सूचनांचे पालन करावेच लागेल

नवी दिल्ली । केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी कामकाजाबाबत एक मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केली आहे. यामध्ये गर्भवती महिला, 65 वर्षांवरील लोक आणि ज्यांना आधीच गंभीर आजार आहेत अशा लोकांनी कामावर जाणे टाळले पाहिजे असे सांगण्यात आले आहे. सोबतच कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग, सफाई, सॅनिटायझेशन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. कार्यालयांमध्ये थुंकण्यावर पूर्णपणे बंदी … Read more