चीनमधून मालदीवच्या ७ नागरिकांची भारताने केली सुटका; परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना व्हायरसची दहशत जगभर पसरत असताना चीनमधील वुहानमधून रविवारी सकाळी ३२३ भारतीय नागरिकांसह ७ मालदीवच्या नागरिकांना भारताने आपल्या विशेष मोहिमेद्वारे एअर इंडियाच्या विमानातून सुखरुप भारतात आणले. याबाबतची माहिती देणारे ट्विट परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केले होते. त्यांच्या ट्विटला उत्तर उत्तर देताना मालदीवच्या राष्ट्रपतींनी भारत सरकारचे आभार मानले आहेत. मालदीवच्या नागरिकांना वाचवताना … Read more

कोरोना विषाणूचा धोका लक्षात घेत WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित

कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. चीनमध्ये आतापर्यंत २१३ बळी कोरोना विषाणूने घेतला असून जवळपास १० हजार जणांना या रोगाची लागण आहे. झालेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मनुष्यहानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेनं (World Health Organisation – WHO) आणीबाणी घोषित केली आहे.

जगभरातील शेअर बाजार कोरोना व्हायरसच्या दहशतीत! सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला

नच्या प्राणघातक कोरोना व्हायरसच्या भीतीने गुंतवणूकदारांनी जगभरातील स्टॉक मार्केटमध्ये मोठी विक्री केली आहे. गुरुवारी जपान, चीन, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया या भागातील शेअर बाजारात ३ टक्क्यांची घसरण झाली आहे. याचा परिणाम देशांतर्गत शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीवर दिसून येत आहे. आज सकाळी लवकर उघडल्यानंतर सेन्सेक्स २०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. त्याचबरोबर निफ्टी ७० अंकांनी खाली आला आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये आत्तापर्यंत १७० हून अधिक लोक मरण पावले आहेत. वुहान शहराव्यतिरिक्त बीजिंगमध्येही या व्हायरसच्या संसर्गाचे एक प्रकरण आढळले आहे. त्यानंतर बीजिंग प्रशासनाने लोकांना जास्तीत जास्त प्रवास करण्याचे टाळण्याचे आवाहन केले आहे.

सनी लिओनीने घेतला कठोर निर्णय; ‘या’ भयानक आजाराच्या भीतीनं चाहत्यांना ‘सेल्फी’ देणार नाही

अनेक चित्रपटांमध्ये अभिनय आणि डांन्स नंबर केल्यावर सनी लिओनी आता निर्माता बनली आहे. सध्या सनी आपला पती डॅनियल वेबरसोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच या चित्रपटाच्या एका शूटच्या संदर्भात सनी देशाबाहेर गेली होती. यावेळी तिची टीमही तिच्यासोबत दिसली. सनी बऱ्याच वेळेस आपल्या टीममधील प्रत्येकासोबत तसेच आपल्या चाहत्यांना भेटते. सनीने कधीही आपल्या चाहत्यांना तिच्यासोबत सेल्फी घेण्यास मनाई केली नाही.परंतु, आता एका भयानक आजारामुळे सनी लिओनने चाहत्यांना सेल्फी देण्यास नकार दिला आहे. या आजाराचे नाव कोरोना व्हायरस आहे.