औरंगाबादेत शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, मनपाने 346 विद्यार्थ्यांचे घेतले स्वॅब

corona test

औरंगाबाद – औरंगपुऱ्यातील प्रसिद्ध प्रशालेत क्रीडा शिक्षकाचा कोरोना तपासणी अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझीटीव्ह आला. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी धसका घेतला. यामुळे सोबतच्या 53 शिक्षकांनी बुधवारीच आरोग्य केंद्रात धाव घेवून आरटीपीसीआर तपासणी करून घेतली. मंगळवारी पाचवी ते सातवी 403 तर बुधवारी 463 विद्यार्थी उपस्थित होते. तर पहीती ते दहावीच्या या शाळेत 54 शिक्षक असून दुपारच्या बॅचला … Read more

औरंगाबादचे जिल्हाधिकारी, मनपा प्रशासकांना नोटीस, ‘हे’ आहे कारण

औरंगाबाद – कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरणाची सक्ती करणे, लस न घेणाऱ्या नागरिकांना प्रवास बंदी आणि 500 रुपये दंडात्मक कारवाई आदी संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेच्या अनुषंगाने न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या एस. जी. डिगे यांनी राज्याचे मुख्य सचिव औरंगाबादचे जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका प्रशासक आदींना नोटीस बजावण्याचे आदेश काल … Read more

फलटणकरांची चिंता वाढली : ओमायक्रॉन बाधिताचे आई- वडिल कोरोना पाॅझिटीव्ह

फलटण । फलटणला काही दिवसापूर्वी दक्षिण आफ्रिकेतील युगांडाहून आलेले तिघेजण ओमायक्रॉन बाधित असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. आता बाधितांच्या संपर्कातील त्याचे आई- वडिलाचा अहवाल कोरोना बाधित आल्याने फलटणकरांची चिंता वाढलेली आहे. अद्याप आई व वडिलाचा ओमायक्रॉनचा अहवाल येणे बाकी आहे. फलटण शहरांमध्ये आफ्रिकेतील युगांडा होऊन आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यातील … Read more

औरंगाबादकरांना दिलासा ! ‘त्या’ हॉटेलमधील 20 कर्मचारी निगेटिव्ह

Corona Test

औरंगाबाद – लंडनहून शहरात आलेल्या 50 वर्षीय कोरोना पॉझिटिव रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत पण त्यांच्या मागणीवरून त्यांना बेल्ट्रॉन मधून खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते. तेथील वीज कर्मचाऱ्यांचा कोरोना तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र, सात दिवसांनी त्यांची पुन्हा एकदा कोरोना तपासणी केली जाणार आहे. नातेवाइकांच्या … Read more

औरंगाबादेत होम क्वारंटाइन बंद ! ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांचे नवे आदेश

sunil chavhan

औरंगाबाद – ओमिक्रॉन हा नवा विषाणू आणि कोरोनाची तिसरी लाट अशी दोन्ही संकटं घोंगावत असताना औरंगाबाद जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे. जिल्हा टास्कफोर्सने सोमवारी तातडीची बैठक घेऊन काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, जिल्ग्यातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाला घरी उपचार घेता येणार नाहीत. शासकीय किंवा खासगी कोव्हिड सेंटरमध्येच त्यांना दाखल व्हावे लागेल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच … Read more

औरंगाबादेत ओमायक्रॉनचा शिरकाव ? लंडनहून आलेला 50 वर्षीय जेष्ठ कोरोनाग्रस्त

औरंगाबाद – औरंगाबादेतील नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेला येणार आहे. कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी रविवारी ओमिक्रोन बाधित आढळली मुंबईत अहवाल निगेटिव्ह आल्याने आई-वडील आणि बहिण असे तिघेही औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, तेथे तपासणीअंती ओमायक्रॉन बाधित मुलीचे 50 वर्षीय वडील बाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यांना ओमायक्रोनची बाधा झाली का, याचे निदान होण्यासाठी … Read more

नागरिकांचे लसीकरण लवकर करा, अन्यथा…

औरंगाबाद – जिल्ह्यातील नऊ तालुक्यांपैकी सिल्लोड तालुक्यातील लसीकरण सर्वात कमी असल्याचे सांगत उपहासात्मक अभिनंदन करून येत्या आठ दिवसांत उर्वरित सव्वीस हजार नागरिकांचे लसीकरण करून घ्या, अन्यथा कारवाईला तयार रहा, असा सज्जड दम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिला आहे. तसेच लस न घेणाऱ्या नागरिकांचे रेशनसह किराणा सामान सुद्धा बंद करण्याचे आदेश त्यांनी … Read more

शहरातील 746 शाळांमध्ये आजपासून किलबिलाट

औरंगाबाद – कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा शहरात आज पासून सुरू होणार आहेत. शहरात शासकीय आणि खासगी अशा 746 शाळांची घंटा वाजणार आहे. विशेष म्हणजे तब्बल वीस महिन्यानंतर शाळांमध्ये पुन्हा एकदा बच्चेकंपनीचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे. मनपा प्रशासन अस्तिक कुमार पांडे यांच्या आदेशानुसार शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून … Read more

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पुन्हा रोजंदारी कर्मचारी भरती

औरंगाबाद – ओमिक्रोन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून 123 कंत्राटी तत्त्वावर नर्स, लस टोचण्याची भरती केली जात आहे. याअंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने नुकत्याच 264 जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील 80 टक्‍क्‍यांहून अधिक नागरिकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर दुसरा डोस घेतलेल्या … Read more

लस प्रमाणपत्र नाही, पहिल्याच दिवशी 37 जणांना दंड

vaccine

औरंगाबाद – कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन चा वाढता धोका लक्षात घेऊन लसीकरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. त्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत नसेल तर पाचशे रुपये दंड आकारण्याची मोहीम महापालिकेकडून कालपासून सुरू करण्यात आली. काल पहिल्या दिवशी मनपाच्या नागरी मित्र पथकाने दिवसभरात 1 हजार 755 नागरिकांचे प्रमाणपत्र तपासले. … Read more