कोरोनाच्या संकटात आता ‘सारी’ने चिंता वाढवली; औरंगाबादमध्ये १० जणांचा बळी

औरंगाबाद  । राज्यावर सध्या करोनाचं संकट आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, करोनाच्या संकटाशी दोन हात करत असताना राज्यासमोर एक नवं संकट उभं ठाकलं आहे. औरंगाबादमध्ये ‘सारी’चा (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) आजार पसरत आहे. या आजारामुळे औरंगाबादमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान २३ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं … Read more

राज्यात एकाच दिवसात आढळले १६२ नवे रुग्ण; कोरोनाग्रस्तांचा आकडा झाला ‘इतका’

वृत्तसंस्था । महाराष्ट्रात कोरोनाने आता रौद्र रूप धारण करायला सुरुवात केली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस राज्याच्या चिंतेत आणखी वाढ करत आहे. धक्कदायक बाब म्हणजे मागील २४ तासात राज्यात करोनाचे १६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. या नवीन रुग्णांनंतर राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२९७ वर पोहचली आहे. यासंदर्भातील माहिती राज्याच्या आरोग्य खात्याने दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील … Read more

भारताला गरज अधिक तपासण्यांची..!! संचारबंदी हा दिलासा देणारा तात्पुरता इलाज – आशिष झा

आपण जर अचूक ठिकाणी अगोदर पुरेशा चाचण्या केल्या नाहीत, तर यातून बाहेर पडण्यासाठीची कोणतीही रणनीती निष्फळच आहे. हे सांगत असताना त्यांनी असा युक्तिवाद केला की, भारतात सध्या जेवढी कोरोनाग्रस्तांची संख्या आहे, त्यापेक्षा ती निश्चित अधिक आहे. आणि हे केवळ तपासणी करुनच समजू शकतं.

बारावीची पुस्तकं आता बालभारतीच्या वेबसाईटवर; शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सरकारचा निर्णय

मुंबई । राज्यात लॉकडाउनमुळे सर्व शाळा महाविद्यालय बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. दरम्यान, लॉकडाउनच्या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं महतवाची घोषणा केली आहे. बारावी अभ्यासक्रमाचे सर्व शैक्षणिक साहित्य ‘पीडीएफ’ स्वरुपात बालभारतीच्या या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे साहित्य विद्यार्थ्यांना डाऊनलोड … Read more

कोरोनाच्या टेस्ट मोफत करा- सुप्रीम कोर्ट

मुंबई । कोरोनाच्या सर्व टेस्ट मोफत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. सरकारी पाठोपाठ खाजगी प्रयोगशाळांमध्येही मोफतच टेस्ट करण्यात यावी असही सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. करोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता टेस्टसाठी सरकारी प्रयोगशाळा पुरेशा नाहीत, त्यामुळे खासगी प्रयोगशाळांना सुद्धा टेस्टची परवानगी देण्यात आली आहे. सध्या खासगी प्रयोगशाळांना करोना व्हायरसच्या … Read more

घराबाहेर पडलेला कोरोना पॉझिटिव्ह ३० दिवसात करू शकतो एवढ्या लोकांना संक्रमित जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणू देशात पसरत आहे. याचा प्रसार होऊ नये यासाठी सरकारने लोकांना घरामध्येच राहण्याचे आवाहन केले आहे. आता एका संशोधनातून असे समोर आले आहे की जर या प्राणघातक रोगाने ग्रस्त एखादा रुग्ण बाहेर भटकत गेला तर ३० दिवसांत तो ४०६ लोकांना संक्रमित करू शकतो. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की इंडियन कौन्सिल … Read more

देशातील कोरोनारुग्णांची संख्या ५ हजार पार, जाणुन घ्या ताजी आकडेवारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये कोरोना विषाणूचा कहर थांबायचे नाव घेत नाही आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोविड -१९ चे ४७१४ ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत, तर आतापर्यंत एकूण ५२७४ रुग्णांची पुष्टी झाल्याची नोंद आहे. कोरोनामुळे आतापर्यंत १४९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. ४१० लोक बरे अथवा घरी सोडण्यात आले आहेत.एकूण पुष्टी झालेल्या … Read more

कोरोनाव्हायरसमुळे टीव्ही, फ्रिज सोबत ‘या’ वस्तूंच्या किमतीत होणार प्रचंड वाढ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे त्रस्त भारतीय लोकांसाठी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वास्तविक ही बातमी चीनी पुरवठादारांकडून कंज्यूमर ड्यूरेबल्स गुड्स उद्योग यांच्याशी संबंधित वस्तूंच्या किंमतीत वाढ करण्याविषयी आहे. जर हा माल महाग असेल तर भारताच्या उत्पादकांना त्यांच्या उत्पादनाची किंमत वाढवावी लागेल. कारण या उत्पादकाच्या ७० टक्के पर्यंत कच्चा माल चीनकडून मिळविला जातो. … Read more

मोंदींसोबतच्या बैठकीत सेना-राष्ट्रवादीनं केली राज्यपालांची तक्रार

मुंबई । देशात फैलावत असलेल्या करोना विषाणूचं संकट आणि लॉकडाऊनवर चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वपक्षीय बैठकीत चर्चा केली. पंतप्रधानांसोबत या बैठकीत काँग्रेससहीत विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत शिवसेनेच्या वतीनं खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुद्धा सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सरकारद्वारे करोना … Read more

महारूगडेवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व्हेंटीलेटरवर; रुग्णाच्या संपर्कातील 35 जण विलगीकरण कक्षात

महारुगडेवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.