करोनाविरुद्धची लढाई लवकर संपवायची असेल तर लपू नका, स्वत:हून पुढं या!- अजित पवार

मुंबई । देशात दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढत जाणारा आकडा चिंतेत भर घालत आहे. करोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे आहेत किंवा इतिहास करोनाच्यादृष्टीने संशयित आहे त्यांनी आता तरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. करोनाविरुद्धचा … Read more

करोनाशी लढताना पंतप्रधान मोदींनी भाजपा कार्यकर्त्यांना केले ‘हे’ ५ आग्रह

नवी दिल्ली । करोना विरुद्धची लढाई ही दीर्घकालीन लढाई असून, देशातील १३० कोटी जनता या युद्धामध्ये जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांपुढे ५ आग्रह धरले आहेत. हे ५ आग्रह महत्त्वाचे संकल्प असून त्यांद्वारे करोनाचा पराभव करण्यात मोठी मदत मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते भारतीय जनता … Read more

पुढील २ महिन्यांत भारताला २ करोड ७० लाख मास्क आणि ५० हजार वेंटीलेटरची गरज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात, कोरोनाव्हायरस संक्रमणासह रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. दरम्यान, सीओव्हीआयडी १९ सर्व देशभर साथीच्या विरूद्ध सुरू असलेल्या युद्धामध्ये केंद्र सरकारने वैयक्तिक संरक्षक उपकरणे (पीपीई) आणि निदान किटच्या मागणीत वाढ होण्याचा अंदाज वर्तविला आहे. इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार एनआयटीआय आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचा असा विश्वास आहे की येत्या … Read more

यंदा घरातच आंबेडकर आणि फुले जयंती साजरी करा- शरद पवार

मुंबई । राज्यावर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळं कोरोना प्रादुर्भाव आणखी वाढू नये म्हणून यंदा ‘एक दिवा ज्ञानाचा’ लावून फुले जयंती आणि ‘एक दिवा संविधानासाठी’ लावून आंबेडकर जयंती साजरी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं.शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी … Read more

तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला परवानगी देण्यातच का आली?- शरद पवार

मुंबई । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा परिस्थितीत दिल्लीत मरकजचा धार्मिक मेळावा व्हायला नको होता. महाराष्ट्र सरकारने जशी मरकजच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तशीच दिल्लीतही परवानगी नाकारायला हवी होती. दिल्लीत थोडी खबरदारी घेतली असती तर बरंच नियंत्रण आलं असतं, असं शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना म्हटलं. राज्यातील जनतेशी संवाद साधताना वृत्तवाहिन्यांच्या बेजबाबदारपणावरही … Read more

कोरोनाचा हाहाकार! देशातील रुग्णांची संख्या पोहोचली ३ हजार ५७७ वर

वृत्तसंस्था । भारतात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील करोना रुग्णांची संख्या रविवारी सायंकाळपर्यंत ३ हजार ५७७ वर पोहोचली होती. देशातील कोरोनाबाधितांचा वाढलेला आकडा चिंता वाढवणारा असून एकूण मृतांची संख्याही ८३ वर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे संपूर्ण देशात गेल्या २४ तासांमध्ये ५०५ रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, … Read more

शाळा, महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय १४ एप्रिललाच- केंद्र सरकार

वृत्तसंस्था । देशात कोरोनाने शिरकाव केल्यांनतर देशातील राज्य आणि केंद्र सरकारनं सर्व शाळा, महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारनंही केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातंर्गत येणाऱ्या शैक्षणिक संस्था बंद करण्याचे आदेश दिले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सर्व शाळा, महाविद्यालयांसह अनेक परीक्षा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. दरम्यान आता बंद करण्यात आलेली शाळा, महाविद्यालय … Read more

धक्कादायक! देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण एकट्या मुंबईत

मुंबई । देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद एकट्या मुंबईत झाली आहे. तर राज्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी निम्मे मुंबईतील आहेत. त्यामुळं मुंबईच्या पर्यायानं राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ६९० वर पोहोचला असून त्यापैकी ४३३ कोरोनाग्रस्त एकट्या मुंबईत आहेत. मुंबईतील वरळी, धारावी, जोगेश्वरी, ग्रॅण्ट रोड ही ठिकाण कोरोनाची हॉटस्पॉट आहेत. आजच्या दिवसातील सर्वात गंभीर … Read more

मराठवाड्यात कोरोनाचा पहिला बळी

औरंगाबाद । औरंगाबाद शहरात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. आज रविवारी एका ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सातारा परिसरातील रहिवाशी असलेल्या या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी करोनासदृश्य लक्षणं दिसून आली होती. त्यानंतर या व्यक्तीला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी उपचारदरम्यान मृत्यू झाला. बीड बायपास लगत असलेल्या सातारा परिसरातील मुबईहून … Read more

कोरोनावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी घेणार सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली । देशात करोनाचं संकट दिवसागणिक आणखी गहिरं होत चाललं आहे. केंद्र सरकार असो देशातील राज्य सरकारे करोनाला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयन्त करत आहे. करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी उपाययोजना म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. देशातील सर्व आर्थिक, सामाजिक व्यवहार बंद आहेत. अशा सर्व बिकट परिस्थितीत चर्चा आणि मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र … Read more