घबराना मत, चुनौती का सामना मिलकर करेंगे; उद्धव ठाकरेंचा परप्रांतीयांना दिलासा

टीम हॅलो महाराष्ट्र | देशातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकलेले आहेत. त्या मजुरांना १४ तारखेला लॉकडाऊन हटेल असं वाटलं होतं म्हणून ते एकत्र आले होते. पण संचारबंदी वाढवण्याचा निर्णय झाल्यामुळे त्यांची निराशा झाली. पण राज्याचा प्रमुख म्हणून मी त्यांना आश्वासित करु इच्छितो की तुमची संपूर्ण काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे, तुम्ही अजिबात घाबरु नका. लॉकडाऊन झाल्यानंतर … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स काम करेल – उद्धव ठाकरे

टीम हॅलो महाराष्ट्र | परिस्थिती नियंत्रणात आली असली किंवा नसली तरी या लढ्याकडे गांभीर्याने पहावं लागेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यातील नागरिकांचं कौतुक केलं. महाराष्ट्रात वैद्यकीय परिस्थिती आजही व्यवस्थित असून चाचण्यांची संख्याही वाढली आहे. सरकारतर्फे करता येणारे सर्व प्रयत्न सुरुच असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीविषयी उद्धव ठाकरेंनी सविस्तर माहिती यावेळी दिली. कोरोनातून … Read more

मुंबईत दिवसभरात ११ जणांचा बळी, २०४ नवे करोनाबाधित

मुंबई । देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या २ हजाराच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत आज दिवसभरात करोनाने ११ बळी घेतले आहेत. तर २०४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ७५३ वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या १११ … Read more

लाहोरमध्ये बर्फ पडेल पण भारत-पाक क्रिकेट मालिका शक्यच नाही- सुनील गावस्कर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही दिवसांपूर्वी माजी पाकिस्तानी गोलंदाज शोएब अख्तरने करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभा करण्यासाठी भारत-पाक क्रिकेट मालिका खेळवण्याचा पर्याय सुचवला होता. या पर्यायाला पाकच्या माजी खेळाडूंनी पाठींबा दर्शवला. परंतु भारतामधील खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंची ही मागणी धुडकावून लावली आहे. माजी खेळाडू सुनिल गावसकर यांनी एकवेळ लाहोरमध्ये बर्फ पडेल, पण भारत-पाक क्रिकेट मालिका सध्या शक्य … Read more

वांद्रे स्टेशनबाहेर हजारो स्थलांतरीत मजुरांचा ठिय्या

मुंबई । करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर मुंबईत अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांत अस्वस्थता वाढली आहे. देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने मुंबईत त्याचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील परराज्यातील हजारो मजुरांनी थेट वांद्रे स्टेशनवर धडक दिली. वांद्रे स्टेशनबाहेर ठिय्या देऊन … Read more

पुण्यात २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू; शहरातील मृतांची संख्या ३८

पुणे । पुण्यात १२ तासांमध्ये ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीनच भर पडली आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते. धक्कादायक बाब म्हणजे आजच्या मृतांमध्ये एका २७ वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे. आतापर्यंत केवळ चाळीशी पार व्यक्तीच कोरोनाने दगावण्याची जास्त शक्यता असताना २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने पुणेकरांच्या चिंता वाढली आहे. पुण्यात आता मृतांची संख्या … Read more

कोरोनामुळे कोल्हापूरी चप्पल व्यवसायाला तब्बल १ हजार कोटींचा फटका; मजुरांवर उपासमारीची वेळ

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू आहे. या लॉकडाऊनचा आर्थिक फटका सर्वच क्षेत्रातील व्यवसायांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. फॅशन स्टेटमेंट म्हणून कोल्हापुरी चप्पल हा ब्रँड जगभर प्रसिद्ध आहे. थोरांपासून लहानपर्यंत कोल्हापूर चप्पल वापरायची क्रेज आहे. ज्या कोल्हापूरच नाव संपूर्ण जगात तिच्या सुबक आणि टिकाऊ चप्पलीमुळे पसरले त्या कोल्हापूरातील चप्पल … Read more

लॉकडाऊन तोडणाऱ्यांसाठी कोल्हापूर पोलिसांचा अनोखा सेल्फी पॉईंट

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या सर्वत्र लॉकडाऊन लागू आहे. कोरोनाच्या संसर्गापासून जनतेला वाचवण्यासाठी सरकार, प्रशासन वारंवार घराबाहेर पडू नका असं आवाहन करत आहे. मात्र, तरीही काही बेजबाबदार महाभाग घराबाहेर हिंडताना दिसत आहे. अशांना धडा शिकवण्यासाठी पोलिसांनी लाठी प्रसादाचे वाटपही करून पहिले पण काही जण सुधारतांना दिसत नाही आहेत. त्यावर आता … Read more

रेल्वेला अजूनही रेड सिग्नलच; प्रवासी वाहतूक ३ मेपर्यंत बंद

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउन ३ मे पर्यंत कायम राहणार असल्याची घोषणा केली आहे. पंतप्रधानांच्या लॉकडाऊनच्या घोषणेनंतर भारतीय रेल्वे मंत्रालयाकडून प्रवासी रेल्वे सेवा ३ मेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी मालगाड्या चालू राहणार असल्याचं रेल्वे मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. सर्व आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३ मे पर्यंत … Read more

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली राज्यात ‘कोरोना’ उपसमितीची स्थापना

मुंबई । करोनाचा उपद्रव झाल्यानंतर राज्यातील सर्वच क्षेत्रातील आर्थिक स्थिती चिंताजनक होत चालली आहे. राज्यावरील करोनाच्या संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी सामना करुन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा बसवण्यासाठी, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी एका ‘कोरोना’ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार … Read more