देशात पुन्हा लॉकडाउन लागणार का?? केंद्र सरकार म्हणते….

modi lockdown

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता देशात पुन्हा लॉकडाउन होणार का असा प्रश्न पडला आहे.नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पुढच्या काळात … Read more

राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली आहे. आता आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी थेट पत्र लिहून मोदी सरकारला काही सल्ले दिले आहेत. करोना विषाणूच्या प्रत्येक रुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल … Read more

लोकांनी आम्हांला दोनदा निवडून दिलं आहे, आम्हांलाही जनतेची काळजी – मोदी सरकारचे कोर्टाला प्रत्युत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच असून कोरोना परिस्थिती हाताळणे अवघड बनले आहे. त्यातच ऑक्सिजनची कमतरता असताना केंद्राकडून ऑक्सिजनचा पुरवठा करताना योग्य पद्दतीने नियोजन केलं जात नसल्याचा आरोप दिल्ली सरकारने केला होता. यावर आता मोदी सरकारने न्यायालयाला प्रत्युत्तर दिले आहे. देशातील जनतेनं दोनदा आम्हाला निवडणून दिलं आहे. आम्हाला लोकांना होत असणाऱ्या त्रासाची … Read more

कोरोनाचा हाहाकार सुरूच!! सलग दुसऱ्या दिवशी 4 लाखांहून अधिक नवे रुग्ण

corona test

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने हाहाकार केला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे चार लाखांहून अधिक नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 3 हजार 915 कोरोनाग्रस्तांना आपला जीव गमवावा लागला. आतापर्यंत देशात 1 कोटी  76 लाख 12 हजार 351 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी … Read more

किरण मजुमदार शॉ म्हणाल्या,”कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे त्सुनामीसारखेच देशाचे नुकसान झाले”

नवी दिल्ली । देश सध्या कोरोनाव्हायरसच्या दुसर्‍या लाटेशी झगडत आहे. मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्याचबरोबर बायोकॉन या फार्मा कंपनीचे प्रमुख किरण मजूमदार शॉ यांनी म्हटले आहे की,” भारताचे कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे त्सुनामीसारखे नुकसान झाले आहे.” शॉ म्हणाल्या की,” कोरोना प्रकरणांमध्ये वाढ होण्यामागील राज्यांमध्ये निवडणुका आणि धार्मिक कार्यक्रम हे प्रमुख कारण आहे.” वन-शेअर वर्ल्डने जगभरातील … Read more

कोरोना रुग्णांना मोठा दिलासा ! रेल्वेने तयार केले 70,000 आयसोलेशन बेड, कोणकोणत्या शहरांमध्ये सुविधा उपलब्ध आहे हे जाणून घ्या

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या साथीविरोधातील युद्धात भारतीय रेल्वेने मोठे योगदान दिले आहे. एकीकडे, रेल्वेच्या संकटाच्या या टप्प्यात, देशभरातून ऑक्सिजन तसेच आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे. तर दुसरीकडे रेल्वेने कोविड केअर कोचमध्ये 4,400 डब्यांचे रुपांतर केले आहे. रेल्वे, महाराष्ट्र, दिल्लीसह देशातील 6 राज्यांत 70,000 वेगळ्या बेड्ससह हे 4,400 कोच उपलब्ध करुन दिले आहेत. इतकेच … Read more

आरोग्य विभागात 16 हजार पदे तातडीने भरली जाणार; आरोग्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने अक्षरशः कहर केला असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे आरोग्य यंत्रणा मात्र अपुरी पडत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात आरोग्य विभागात तब्बल 16000 पदे भरण्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना याबाबत माहिती दिली आरोग्य विभागातील … Read more

RBI गव्हर्नरच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे, त्यांचा बाजारावर आणि तुमच्यावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज कोरोनाच्या दुसर्‍या लाटे दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत भाषण केले. RBI गव्हर्नर म्हणाले की,” कोरोनाची दुसरी लाट पूर्वीपेक्षा अधिक प्राणघातक आहे. अनेक राज्यांत वेगवेगळ्या निर्बंधांमुळे त्याचा अर्थकारणावर गंभीर परिणाम होईल. आरबीआय या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.” दास म्हणाले की,” कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर अर्थव्यवस्थेने … Read more

एप्रिलमध्ये 13 महिन्यांनंतर सर्वात कमी नोकरकपात, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये किंचित सुधारणा

नवी दिल्ली । मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये देशाच्या मॅन्युफॅक्चरिंग (Manufacturing) सेक्टरच्या कामकाजात किंचित सुधारणा झाली. तथापि एप्रिलमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्येही रीट्रेंचमेंट सुरूच राहिली. तथापि, रीट्रेंचमेंटचा दर गेल्या 13 महिन्यांत सर्वात कमी होता. एका मासिक सर्वेक्षणात असे म्हटले गेले आहे. आयएचएस मार्किटचे (IHS Markit) मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (PMI) एप्रिलमध्ये 55.5 वर होता. मार्चमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा PMI 55.4 … Read more

देशात मोफत लसीकरण सुरू करा ; देशातील सर्वपक्षीय नेत्यांची केंद्राला विनंती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. देशात काही दिवसांपासून मृत्यूचे प्रमाण देखील वाढलं असून चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन संपूर्ण देशभर मोफत लसीकरणासाठी केंद्राला निवेदन दिले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एचडी. देवेगौडा, … Read more