राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नेहमीच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली आहे. आता आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी थेट पत्र लिहून मोदी सरकारला काही सल्ले दिले आहेत. करोना विषाणूच्या प्रत्येक रुपाची माहिती मिळवण्यासाठी वैज्ञानिक पद्धतींचा वापर करण्यासोबतच संपूर्ण जगाला याबद्दल माहिती देण्याचा आग्रह राहुल गांधी यांनी या पत्राद्वारे केला आहे.

देशातील करोना स्थिती पाहता तुम्हाला पुन्हा पत्र लिहावं लागत आहे. देशावरील संकट पाहता भारतीय नागरिकांना प्राथमिकता देणं गरजेचं आहे. देशातील नागरिकांना या समस्येतून काढण्यासाठी जे शक्य होईल ते करा, अशी मी तुम्हाला विनंती करतो’, असं त्यांनी आपल्या पत्रात लिहीलं आहे. हे पत्र काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केलं आहे.

पुन्हा एकदा तुम्हाला पत्र लिहिण्याची वेळ माझ्यावर आलीय कारण आपला देश कोविड त्सुनामीच्या विळख्यात अडकला आहे. अशा प्रकारच्या अनपेक्षित संकटात भारतीय जनतेलाच आपलं सर्वात जास्त प्राधान्य असायला हवं. देशातील जनतेला या त्रासातून वाचवण्यासाठी जे काही शक्य होईल ते करण्याची मी तुम्हाला विनंती करत आहे’, असंही राहुल गांधी यांनी या पत्रात म्हटलंय.

सध्याची परिस्थिती पाहता करोना विषाणूचं ‘दुहेरी उत्परिवर्तन’ आणि ‘तिहेरी उत्परिवर्तन’ ही सुरुवात असू शकते, अशी मला भीती वाटतेय. या विषाणूचं अनियंत्रितरित्या प्रसार होणं हे केवळ देशासाठीच नाही तर जगासाठी अतिशय घातक ठरू शकतं’ अशी भीतीही राहुल गांधींनी व्यक्त केलीय.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

You might also like