राज्यातील मोठ्या बाजार समित्या बंद झाल्यानं शेतकरी संकटात

 पुणे । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये मोठ्या बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. बाजार समित्या बंद करताना कोणतीही पर्यायीव्यवस्था उभी न करता सरकारच्या या निर्णयामुळे शेजारी आर्थिक संकटात सापडला आहे. बाजार समित्या बंद झाल्यानं फळे, भाजीपाला व फळभाज्या अक्षरशः फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दुसरीकडे साथीच्या … Read more

मुंबईत एकाच दिवसात आढळले २१८ करोना रुग्ण,कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराच्या उंबरठ्यावर

मुंबई । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असून राजधानी मुंबई करोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन २१८ रुग्ण आढळले असून १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत करोनाची लागण होऊन ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज २१८ नवीन रुग्ण आढळल्याने … Read more

जगभरात सर्वाधिक १८ हजार २८९ मृत्यू इटलीमध्ये

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इटलीमध्ये गेल्या चोवीस तासांत ६१० लोकांचा मृत्यू झाल्यानंतर, देशातील कोरोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे मृतांचा आकडा जगभरातील सर्वाधिक १८,२७९ वर पोहोचला आहे. माहिती देताना नागरी संरक्षण एजन्सी म्हणाली, “तथापि, इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये (आयसीयू) रूग्णांची संख्या कमी होत गेल्याने देशातील रुग्णालयांवरील दबाव निरंतर कमी होत आहे.” एफफे न्यूजने आपल्या अहवालात म्हटले आहे की, “इटलीचे … Read more

Don’t Worry! भारताकडे ३ कोटी २८ लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्स

नवी दिल्ली । भारताकडे कोरोनासाठी लढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्सचा पुष्कळ साठा असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. भारताकडे सध्या तब्बल ३ कोटी २८ लाख हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्स आहेत. तर भारताची सध्याची गरज १ कोटी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन टॅबलेट्सची आहे अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत … Read more

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन ICUमधून आले बाहेर

वृत्तसंस्था । ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होत. दरम्यान, त्यांना आता अतिदक्षता विभागाबाहेर आणण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अशी माहिती रुग्णालयानं दिली आहे. पंतप्रधान जॉन्सन यांना आयसीयूमधून बाहेर आले असले तरी त्यांना रुग्णालयातच डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली आहे. ब्रिटनमध्ये सुद्धा … Read more

धक्कादायक! कोरोनाव्हायरसमुळे २३ दिवसांच्या चिमुकल्याचा मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिलिपिन्समध्ये कोरोनाव्हायरसमुळे नुकताच एका २३ दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. याबाबत शुक्रवारी माहिती मिळाली. एफ न्यूजच्या वृत्तानुसार,हे कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंतच्या झालेल्या सर्वात लहान मृत्यूंपैकी एक आहे.फिलिपिन्सच्या मनिलापासून सुमारे ७० किमी दक्षिणेस असलेल्या लिपामध्ये ५ एप्रिल रोजी या नवजात बाळाचा मृत्यू झाला, परंतु गुरुवारपर्यंत या विषाणूच्या तपासणी अहवालाविषयी कोणालाही माहिती नव्हते. आणखी एका … Read more

Breaking | धक्कादायक! पुण्यात २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू

पुणे । पुण्यातील ससून रुग्णालयात एका २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या या तरुणावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. आजसकाळी त्याचा मृत्यू झाला आहे. या तरुणाच्या मृत्यूनंतर पुण्यातील मृतांचा आकडा २६ वर पोहोचला आहे. आतापर्यंत पुण्यात केवळ ५० वर्षांवरील कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. मात्र, आता … Read more

वेंटिलेटर, मास्क बाबत भारत सरकारने घेतला मोठा निर्णय!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरस या साथीच्या रोगावर भारतात नियंत्रण मिळावे यासाठी केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला असून मास्क आणि व्हेंटिलेटरसारखे वैद्यकीय उपकरणे स्वस्त करण्यासाठी त्यांच्यावरील सर्व कर काढून घेतला आहे. केंद्र सरकारने या वैद्यकीय उपकरणांमधून कस्टम ड्यूटी आणि हेल्थ सेस काढून टाकला आहे.३० सप्टेंबर २०२० पर्यंत काही वैद्यकीय उपकरणांवर कोणतीही शुल्क आकारले जाणार … Read more

कडक उन्हाळा आपल्याला कोरोनापासून वाचवेल असं समजत असाल तर ‘हे’ वाचा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कोरोनाव्हायरसचा प्रसार झपाट्याने होत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासात ८०९ प्रकरणे नोंदली गेली आणि ४६ लोक मरण पावले आहेत. कोविड १९ विषयी सांगायचे झाले तर येणाऱ्या हंगामात उन्हामुळे संसर्गावर काही प्रमाणात नियंत्रण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अमेरिकेच्या एका प्रतिष्ठित संस्थेने उच्च तापमानामुळे कोरोनावर काहीही परिणाम होणार … Read more

लॉकडाउन नसता तर देशात हाहा:कार माजला असता! अहवालातून धक्कादायक माहिती उघड

नवी दिल्ली । कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू करण्यात आला. हा लॉकडाउन जर लागू केला नसता तर भारतात कोरोनाने हाहाकार माजला असता असं निरीक्षण आयसीएमआर (Indian Council of Medical Research ) या संस्थेनं आपल्या एका निरीक्षणात म्हटलं आहे. आयसीएमआरने आपल्या अहवालात भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा निर्णय फायद्याचं ठरलं असल्याचे सांगितलं आहे. … Read more