ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादेतही निर्बंध लागू

औरंगाबाद – गेल्या आठवड्यात राज्यभरात कोविड 19 व ओमीक्रॉनची प्रकरणे वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मध्यरात्रीपासून शहर व जिल्ह्यात काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळात जिल्हाभरात सर्व सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी … Read more

सावधान ! औरंगाबादेत ओमिक्रॉनचा शिरकाव; दोघांना लागण

  औरंगाबाद – अखेर औरंगाबादेत ओमायक्राॅनचा शिरकाव झाला असून, दोन ओमायक्राॅनबाधित रुग्णांचे निदान झाले आहे. मराठवाड्यात आतापर्यंत लातूर -1, उस्मानाबाद – 5 आणि आता औरंगाबादमध्ये – 2 असे एकूण 8 ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत. औरंगाबादेतील नातेवाइकाच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेल्या एनआरआय कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी ओमायक्राॅन बाधित आढळली होती. तेथे अहवाल निगेटिव्ह आल्याने आधी … Read more

खळबळजनक ! कोरोनाचे अनुदान मिळविण्यासाठी 216 जिवंत व्यक्तींना दाखवले मृत

corona

औरंगाबाद – पैशांसाठी आजकाल कोण काय करेल सांगता येत नाही. बीडमध्ये कोरोना मृतांच्याबाबत असाच एक धक्कादायक घोटाळा उघडकीस आला आहे. कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची खातरजमा करत असताना मोठा खुलासा झालाय. बीडच्या अंबेजोगाईत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची व्यक्तींचा खोटा आकडा समोर आला आहे. यामध्ये 216 जिवंत व्यक्ती मृत दाखवण्यात आल्या आहेत. आता हा आरोग्य विभागाचा गलथानपणा … Read more

औरंगाबादेत शाळेतील शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, मनपाने 346 विद्यार्थ्यांचे घेतले स्वॅब

corona test

औरंगाबाद – औरंगपुऱ्यातील प्रसिद्ध प्रशालेत क्रीडा शिक्षकाचा कोरोना तपासणी अहवाल मंगळवारी सायंकाळी पॉझीटीव्ह आला. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षकांनी धसका घेतला. यामुळे सोबतच्या 53 शिक्षकांनी बुधवारीच आरोग्य केंद्रात धाव घेवून आरटीपीसीआर तपासणी करून घेतली. मंगळवारी पाचवी ते सातवी 403 तर बुधवारी 463 विद्यार्थी उपस्थित होते. तर पहीती ते दहावीच्या या शाळेत 54 शिक्षक असून दुपारच्या बॅचला … Read more

औरंगाबादेत होम क्वारंटाइन बंद ! ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याधिकाऱ्यांचे नवे आदेश

sunil chavhan

औरंगाबाद – ओमिक्रॉन हा नवा विषाणू आणि कोरोनाची तिसरी लाट अशी दोन्ही संकटं घोंगावत असताना औरंगाबाद जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे. जिल्हा टास्कफोर्सने सोमवारी तातडीची बैठक घेऊन काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, जिल्ग्यातील कोणत्याही कोरोनाबाधित रुग्णाला घरी उपचार घेता येणार नाहीत. शासकीय किंवा खासगी कोव्हिड सेंटरमध्येच त्यांना दाखल व्हावे लागेल अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. तसेच … Read more

औरंगाबादेत ओमायक्रॉनचा शिरकाव ? लंडनहून आलेला 50 वर्षीय जेष्ठ कोरोनाग्रस्त

औरंगाबाद – औरंगाबादेतील नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी लंडनहून मुंबईत दाखल झालेला येणार आहे. कुटुंबातील 21 वर्षीय मुलगी रविवारी ओमिक्रोन बाधित आढळली मुंबईत अहवाल निगेटिव्ह आल्याने आई-वडील आणि बहिण असे तिघेही औरंगाबादेत दाखल झाले. मात्र, तेथे तपासणीअंती ओमायक्रॉन बाधित मुलीचे 50 वर्षीय वडील बाधित आढळल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. त्यांना ओमायक्रोनची बाधा झाली का, याचे निदान होण्यासाठी … Read more

लस प्रमाणपत्र नाही, पहिल्याच दिवशी 37 जणांना दंड

vaccine

औरंगाबाद – कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन चा वाढता धोका लक्षात घेऊन लसीकरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. त्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत नसेल तर पाचशे रुपये दंड आकारण्याची मोहीम महापालिकेकडून कालपासून सुरू करण्यात आली. काल पहिल्या दिवशी मनपाच्या नागरी मित्र पथकाने दिवसभरात 1 हजार 755 नागरिकांचे प्रमाणपत्र तपासले. … Read more

शहरातील 80 टक्के नागरिक लसवंत

औरंगाबाद – कोरोना संसर्गाचा ओमिक्रॉन हा घातक विषाणू आढळून आल्यानंतर प्रशासनाने लसीकरणाची गती वाढविण्यासाठी विविध बंधने टाकली आहेत. त्यामुळे नागरिकांचा लसीसाठी प्रतिसाद वाढला आहे. आजघडीला शहरातील 80 टक्के नागरिक लसवंत झाले आहेत. गेल्या महिन्यात मात्र लसीकरणाची टक्केवारी 55 ते 60 एवढीच होती. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी लस नाही तर रेशन, … Read more

शहरात बोगस लसीकरण प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

vaccine

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरणासाठी सक्तीची मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. मात्र याचा फायदा घेत शहरात बनावट कोरोना लस देणारी टोळी सक्रीय झाली. 500 ते दोन हजार रुपयांना बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या तिघांना जिन्सी पोलीसांनी काल रंगेहाथ पकडले. त्यांनी आतापर्यंत 400 पेक्षा जास्त बोगस लस प्रमाणपत्रे दिल्याचे उघडकीस आले. विशेष म्हणजे घाटी रुग्णालयातील … Read more

औरंगाबादकरांनो लवकर लस घ्या, अन्यथा…

औरंगाबाद – ज्या व्यक्तींनी अद्यापपर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तसेच दुसऱ्या डोसची तारीख उलटून गेल्यानंतरही डोस घेतलेला नाही अशा नागरिकांकडून दंड आकरण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश औरंगाबाद महापालिकेने काढले आहेत. येत्या 15 डिसेंबरपासून ही कारवाई करण्यात येणार असून, यासाठी 500 रुपये दंड आकरण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीदेखील औरंगाबाद शहरात लस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविणाऱ्या … Read more