अहमदनगर : विहिरीत उडी मारून चिमुरडीसह आईची आत्महत्या …

नगर तालुक्यातील धनगरवाडी येथे मायलेकीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आई ने मुलीला सोबत घेऊन आत्महत्या का केली ? यामागचे कारणं अद्याप समजू शकले नाही . नीता उर्फ कविता सचिन कापडे (वय- 27) रा. धनगरवाडी तालुका नगर, व मुलगी प्रणाली सचिन कापडे (वय- 4) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला .

धुळे : चालकाच्या प्रसंगावधानाने सिनेस्टाइल अपहरणाचा प्रयत्न फसला …

शिरुड गावाजवळ स्कुल बस चालकाला बंदुकीचा धाक दाखवत लहान मुलाचे अपहरण करण्याचा प्रयत्न अज्ञात इसमाने केला. चालकाचे प्रसंगावधानामुळे तो प्रयत्न फसला. या घटनेने धुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली .

धुळे : पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने चोरटयांनी सोन्याचे दागिने केले लंपास

शहरातील चाळीसगाव रोड जवळील कॉलनीतील घरात घुसून भरदिवसा दोन तोळे सोन्यांचे दागिने लंपास केले आहेत . पितळ , चांदी आणि सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करुन देतो असा बहाणा करून या चोरट्यांनी घरात प्रवेश मिळवला आणि हातचलाखीने दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत .

धक्कादायक! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीची आत्महत्या

सोलापूर प्रतिनिधी | नऊ वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरुणीने राहत्या घरी गळफास घेतल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. लग्नास नकार देऊन शारीरिक व मानसिक त्रास दिल्याच्या कारणावरून तरूणीने आत्महत्या केल्याप्रकरणी मोहोळ येथील शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखाचा मुलगा व शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविकेवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवरत्न दीपक गायकवाड, … Read more

प्रदीप शर्मांवर गुन्हा दाखल; निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप

माजी पोलीस अधिकारी आणि शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला (प्रोसिडिंग ऑफिसर) मतदान केंद्रावरच धमकी दिल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांनी तक्रार दाखल केली आहे. शर्मा यांच्यावर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विरार पूर्व चंदनसार जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.

बुलडाणा जिल्ह्यात माजी सैनिकाची २ मुलांसह आत्महत्या

जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी या गावत एका माजी सैनिकानं आपल्या दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मृतक चराटे असं या माजी सैनिकाच नाव आहे.

कोल्हापूर स्फोटाचा सखोल तपास सुरु; २०१४ ची पुनरावृत्ती झाल्यामुळे खळबळ

पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हापूरचा एंट्री पॉइंट समजल्या जाणाऱ्या उजळाईवाडी उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटात एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट कमी तीव्रतेचा असून सुद्धा घटनास्थळी बॉम्ब शोधक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक तपासणी करत आहेत. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. 

इचलकरंजी मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजीत असणाऱ्या दातार मळा इथं एका कारखान्यात बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्या जवळ असणाऱ्या १० लाख १ हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली.

कामगारानेच ५१ लाखांच्या मुद्देमालावर मारला डल्ला

विटा पोलिसांच्या डीबी पथकाने अतिशय मोठ्या चपळाईने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. बंद बंगल्याच्या छताचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातून १४५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोलेक्स कंपनीचे १ घड्याळ, स्विसकॉर्न कंपनीची २ घड्याळे रोख ३ लाख असा ५१ लाख ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करणाऱ्या बिराप्पा बन्ने याला विटा पोलिसानी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३२ लाखाचा ऐवज जप्त केल्याची माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

ठाण्यात ज्वलनशील केमिकल साठ्यावर छापा, २ केमिकल माफियांना अटक  

भिवंडी तालुक्याच्या पुर्णा येथील केमिकल गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकला. त्यात पोलिसांनी ८ लाख ३५ हजार ९०० रुपये किंमतीचा केमिकल साठा जप्त केला. तसच केमिकल मालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तिर्थराज पाल आणि विरल गंबीया असे अटक केलेल्या केमिकल माफियांची नाव आहेत.