विकास दुबे यांच्या चकमकीवर तापसी पन्नूची प्रतिक्रिया, म्हणाली अशी अपेक्षा नव्हती

मुंबई | उत्तर प्रदेशच्या कानपूर पोलिस हत्येप्रकरणी most wanted विकास दुबे शुक्रवारी सकाळी पोलीस चकमकीत मारला गेला. आता नाट्यमय चकमकीबाबत सतत प्रश्न उपस्थित होत आहेत. आता या संपूर्ण घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूने एक ट्वीट केलं आहे. हे अपेक्षित नव्हते असं तापसीनं म्हटलं आहे. तापसी पन्नू यांनी लिहिले, “वाह! याची मुळीच अपेक्षा नव्हती !! आणि … Read more

हा पोलिसांनी घेतलेला सूड; विकास दुबे एनकाऊंटर वर बोलले संजय राऊत 

मुंबई । उत्तरप्रदेशच्या कानपुर मध्ये हिस्ट्रीशीटर म्हणून कुप्रसिद्ध असणाऱ्या विकास दुबेला पकडायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात ८ पोलीस शहीद झाले होते. या घटनेला ५-६ दिवस उलटल्यानंतर विकास दुबे पोलिसांच्या हाती सापडला होता. त्याला घेऊन जात असताना पोलिसांची गाडी पलटी झाली. यावेळी विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता त्याचा एनकाऊंटर करण्यात … Read more

पीडीत महिलेकडून लाचेची रक्कम स्विकारली, उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार सापळ्यात

औरंगाबाद प्रतिनिधी | दाखल गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केल्याचे बक्षीस म्हणून पीडीत महिलेकडून पाच हजाराची लाच स्विकारताना उस्मानपुरा पोलिस ठाण्याचा जमादार शिवाजी दामू गाडे याला एसीबीने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास उस्मानपुरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. एका महिलेने पती त्रास देत असल्याने त्याच्याविरुध्द उस्मानपुरा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ही पीडीत … Read more

घराच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या…

औरंगाबाद प्रतिनिधी | फ्लॅटचे बांधकाम सुरू असताना शेजाऱ्यांकडून सतत येणाऱ्या व्यत्ययाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना बाबा पेट्रोल पंम्प जवळील म्हाडा कॉलनी येथे घडली. उषा विजय गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. ओढणीच्या सहाय्याने या महिलेने गळफास घेतला. एक वर्षापासून गायकवाड यांच्या फ्लॅटचे बांधकाम सुरु आहे. त्यांना जवळच राहणारे … Read more

लज्जास्पद! वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग; पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे बाप लेकीच्या अत्यंत पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना परभणी जिल्ह्यातील किन्होळा येथे घडली असून वडिलांनीच स्वतःच्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचे घृणास्पद कृत्य केलयं. नराधम पित्याला न्यायालयाने आता दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पाथरी तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या किन्होळा या गावातील दीपक संपत वावळे असे आरोपीचे नाव आहे. शनिवार … Read more

पीपीई किट घालून आले चोर, दागिन्यांच्या दुकानातून चोरले तब्ब्ल 78 तोळे सोने; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे देश कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी परदेशातून पीपीई किट मागवत आहे आणि कोरोना वॉरियर्सना ते उपलब्ध करुन देऊन त्यांना या लढाईसाठी फ्रंटलाइनवर लढण्यासाठी प्रोत्साहित करत आहे, तर दुसरीकडे काही लोक आता चोरी तसेच दरोड्यासाठी पीपीई किट वापरत आहेत. अशीच एक घटना महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात घडली आहे. येथे चोरट्यांनी पीपीई किट परिधान केले … Read more

आणखीन एका १८ वर्षांच्या TikTok स्टारची आत्महत्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नैराश्याच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. दिल्ली विद्यापीठाच्या 18 वर्षाच्या मुलीने नैराश्यामुळे आत्महत्या केली आहे. ही मुलगी टिकटॉकची मोठी स्टार होती आणि या व्हिडिओ प्लॅटफॉर्मवर तिचे बरेच फॉलोअर्स देखील होते. पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नसली तरी नुकतेच टिकटॉक घातलेल्या बंदीनंतर ही मुलगी खूपच अस्वस्थ झाल्याचे समजते … Read more

कोरोनामुक्त झाल्यानंतर MIM च्या नेत्याची जंगी मिरवणूक; २०० जणांवर गुन्हा दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | माजी नगराध्यक्षने कोरोनावर मात केल्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी आतषबाजी करीत जंगी मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी वैजापूर शहरात घडला. या प्रकरणी सुमारे दोनशे जनांवर विविध कलमाखाली वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापुरचे माजी नगरअध्यक्ष व एमआयएम चे नेते अखिल शेख यांना कोरोनाची लागण झाली होती, शहरात उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त … Read more

फेसबुक वर बदनामीकारक जातीयवादी पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे फेसबुक वरील वॉलवर विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकणे एका पक्षाच्या ता. उपाध्यक्षाला चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेसबुक समाज माध्यमावर बाळू कोल्हे पाटील नावाने अकाउंट चालवणाऱ्या एका राष्ट्रीय पक्षाचा पाथरी तालुका उपाध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीने शुक्रवार दुपारी दोन ते पाच च्या दरम्यान … Read more

पैसेवाल्या उद्योगपतींचे हनी ट्रॅप करायची गॅंग; २ महिलांसह तिघांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील पोलिसांनी एका मोठ्या हनीट्रॅप टोळीचा खुलासा केला आहे. बड्या उद्योगपतींची शिकार करणाऱ्या या टोळीतील तीन सदस्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी दोन महिला आहेत. याप्रकरणी पोलिस आता अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी दिल्लीतील कृष्णानगर पोलिस ठाण्यात गांधी नगरच्या एका व्यावसायिकाविरूद्ध एका 19 वर्षीय … Read more