घराच्या बांधकामात अडथळा निर्माण करणाऱ्या शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून महिलेची आत्महत्या…

औरंगाबाद प्रतिनिधी | फ्लॅटचे बांधकाम सुरू असताना शेजाऱ्यांकडून सतत येणाऱ्या व्यत्ययाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केली आहे. ही घटना बाबा पेट्रोल पंम्प जवळील म्हाडा कॉलनी येथे घडली. उषा विजय गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. ओढणीच्या सहाय्याने या महिलेने गळफास घेतला. एक वर्षापासून गायकवाड यांच्या फ्लॅटचे बांधकाम सुरु आहे. त्यांना जवळच राहणारे … Read more

लज्जास्पद! वडिलांनीच केला मुलीचा विनयभंग; पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे बाप लेकीच्या अत्यंत पवित्र नात्याला काळीमा फासणारी घटना परभणी जिल्ह्यातील किन्होळा येथे घडली असून वडिलांनीच स्वतःच्या अकरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचे घृणास्पद कृत्य केलयं. नराधम पित्याला न्यायालयाने आता दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. पाथरी तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या किन्होळा या गावातील दीपक संपत वावळे असे आरोपीचे नाव आहे. शनिवार … Read more

फेसबुक वर बदनामीकारक जातीयवादी पोस्ट; एकावर गुन्हा दाखल

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे फेसबुक वरील वॉलवर विशिष्ट धर्माविरुद्ध बदनामीकारक पोस्ट टाकणे एका पक्षाच्या ता. उपाध्यक्षाला चांगलेच महागात पडले असून याप्रकरणी संबंधित व्यक्तीवर पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. फेसबुक समाज माध्यमावर बाळू कोल्हे पाटील नावाने अकाउंट चालवणाऱ्या एका राष्ट्रीय पक्षाचा पाथरी तालुका उपाध्यक्ष असणाऱ्या व्यक्तीने शुक्रवार दुपारी दोन ते पाच च्या दरम्यान … Read more

बब्बर खालसाच्या वाधवा सिंह सोबत ९ जणांना गृह मंत्रालयाने केले आतंकवादी घोषित 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बब्बर खालसा च्या वाधवा सिंह सहित ९ जणांना  मंत्रालयाने आतंकवादी घोषित केले आहे. गृह मंत्रालयाकडून आज ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार पाकिस्तानच्या दहशतवादी संघटन शिख युथ फेडरेशनचे चिफ लखबर सिंहना देखील दहशतवादी यादीमध्ये घालण्यात आले आहे. या नऊ लोकांना बेकायदेशीर हालचाली अधिनियम(UAPA ऍक्ट, १९६७) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे. … Read more

स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात चाकू हल्ला; हल्लेखोराने पोलिस कर्मचाऱ्यासह सहा जणांना केले जखमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी 26 जून रोजी स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात एका हॉटेलमध्ये चाकू हल्ल्याची घटना घडली. या घटनेत एकूण तीन जणांचा मृत्यू झाल्याचे पूर्वी सांगितले गेले होते मात्र, नंतर पोलिसांनी सांगितले की, या घटनेत कुणाचाही मृत्यू झालेला नाही. चाकू हल्ला करणाऱ्या व्यक्तीने सहा जण जखमी केल्याचा पोलिसांचा दावा आहे तसेच पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो … Read more

धक्कादायक !!! शिक्षकानेच बनविले तब्ब्ल 168 मुलींचे अश्लील व्हिडिओ, क्लिप केल्या व्हायरल जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सिंगापूरमध्ये एका शाळेतील शिक्षकास 168 हून अधिक मुलींचे अपस्कर्ट व्हिडिओ (परवानगीशिवाय व्हिडिओ बनवल्याबद्दल) अटक केली आहे. या 47 वर्षीय शिक्षकावर समाजात अश्लीलता पसरविण्याचा आणि महिलांच्या गोपनीयतेचा अवमान केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. पोलिसांनी सांगितले की या आरोपीने काही विद्यार्थिनींचे व्हिडिओ क्लिप हे सोशल मीडियावर व्हायरल केले होते. द स्टारच्या एका रिपोर्ट … Read more

Google Play वरील ‘हे’ १७ अ‍ॅप चोरु शकतात तुमचा प्रायव्हेट डाटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण जर Android फोन वापरत असाल तर ही बातमी आपल्यासाठी आहे. गूगल प्लेवर कथितपणे कमीतकमी 17 अ‍ॅप्स असे आहेत की जे HiddenAds नावाच्या ट्रोजन गटाचा भाग आहेत. सायबर स्पेस फर्म Avast चा असा विश्वास होता की हे अ‍ॅप्स मोठ्या लपलेल्या HiddenAds कॅम्पेनचा एक भाग आहेत जी मुख्यत्वे भारत आणि दक्षिण पूर्व … Read more

खेळणी विक्रेत्याला दुकानातील नोकरानेच ४६ लाखांला  गंडवले…

औरंगाबाद प्रतिनिधी | घाऊक व्यापा-याशी हातमिळवणी करुन नोकराने मालकालाच ४५ लाख ६८ हजारांना गंडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार दोनवर्षा पासून सुरू होता. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यावर दुकानदाराने पोलिसात धाव घेतली. त्यावरुन नोकर दत्तप्रसाद सुभाषचंद्र लोया, घाऊक विक्रेता पंकज कैलाशचंद खंडेलवाल आणि त्याचा नोकर रवि शिवाजी पानखेडे यांच्याविरुध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

चीनचा भारतावर सायबर अटॅक; ४० हजारांहून जास्त सायबर हल्ल्यांची नोंद

मुंबई । भारत-चीन सीमेरवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आले आहे. ‘मागील ४-५ दिवसांमध्ये इन्फॉर्मेशन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि बँकिंग यासारख्या विभागांना सायबर हल्लेखोरांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. अशाप्रकारचे किमान 40,300 सायबर हल्ल्याचे प्रयत्न झाले. चीनच्या चेंगडू भागातून सायबर अटॅकचे सर्वाधिक प्रयत्न झाले’, … Read more