अबब ! हे काय पैशांसाठी कर्जबाजारी उद्योगपतीने दिली स्वतःच्याच हत्येची सुपारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. सोमवारी राजधानी दिल्लीमध्ये एका उद्योगपतीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. यातील एक आरोपी अल्पवयीन आहे. मात्र पोलीसांनी केलेल्या तपासादरम्यान हत्या झालेल्या उद्योगपतीने या तिन्ही आरोपींना आपल्याच हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं आहे. या मृत उद्योगपतीवर गेली अनेक वर्ष कर्जाचा डोंगर … Read more

जॉर्ज फ्लॉयडनंतर अमेरिकेत पोलिसांच्या गोळीबारात आणखी एका कृष्णवर्णीयाचा मृत्यू; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील अटलांटा येथे मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या एका कृष्णवंशीय माणसाला एका पोलिस कर्मचाऱ्याने गोळ्या घालून ठार मारले. या घटनेच्या काही तासांनी अटलांटा पोलिस प्रमुखांनी आपला राजीनामा दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, त्या व्यक्तीने एका पोलिस अधिकाऱ्यांची टेझर बंदूक हिसकावली आणि तो पळून जात असताना त्याला गोळी … Read more

लॉकडाऊनमध्ये पुण्याहून औरंगाबादेत घरी आलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी | लॉकडाऊनमुळे पुणे येथून औरंगाबादेत घरी आलेल्या प्रथम वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थाने घरातील हॉल मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुंडलीकनगर मधील गजानन कॉलोनी भागात घडली. आत्महत्येचे कारण मात्र समोर आलेले नाही पोलीस पुढील तपास करीत आहेत. विवेक भाऊलाल पांणकडे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली अधिक … Read more

अमरावतीत धरणात बुडून दोन बहिणींचा मृत्यू

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील पथ्रोट नजीकच्या गोंडवाघोली गावाला लागुन असलेल्या भुलेश्वरी धरणात दोन सख्या बहीणींचा बुडून मृृत्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली. कुणबी वाघोली येथील रश्मीता राजेश बेलसरे वय १० वर्षे व कावेरी राजेश बेलसरे वय ८ वर्षे अशी सदर बहिणींची नावे आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, दोघी बहीणी व दोन मावस … Read more

अस्वलाच्या पिलांना कुऱ्हाडीने मारले; चिडलेल्या अस्वलीने दोघांना केले जंगलातच ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आई आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करत असते. प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून ती आपल्या मुलांचा जीव वाचावीत असते. सर्व प्राणिमात्रांमध्ये हेच प्रेम असते. अनेकदा सिनेमांमध्ये प्राणी आपल्या आप्तजनांच्या मृत्यूचा बदला घेताना दाखविले जातात. असेच काहीसे भासावे अशी एक घटना बुलढाणा जिल्ह्यात घडली आहे. आपल्या पिलांच्या मृत्यूने क्रोधीत झालेल्या अस्वलाच्या मादीने शिवारात हल्ला … Read more

धक्कादायक ! खाऊ समजून स्फोटकाचा चावा घेतल्याने सहा वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तामिळनाडूमध्ये नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे एका सहा वर्षाच्या मुलाने खाऊ समजून स्फोटकाचा चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला आहे. तिरुचिरपल्ली येथील एका गावात ही घटना घडली आहे. इथे ठेवलेल्या गावठी स्फोटकाला खाण्याची वस्तू आहे असं समजून मुलाने चुकून ते खाल्लं. मात्र त्याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी … Read more

कोरेगाव तालुक्यातील कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यु

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी | रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार सातारा शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल असणाऱ्या कोल्हापूर येथील 39 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित आल्याचे खाजगी प्रयोगशाळेने कळविले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 78 वर्षीय कोरोना बाधित … Read more

पिसाळलेल्या वानराच्या हल्यात महिला गंभीर जखमी; वनविभागाचा हलगर्जीपणा भोवला !

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे | परभणी जिल्ह्यातील झरी येथे एका वानर टोळीने  मागील काही दिवसापासुन उच्छाद मांडला असून  बुधवारी सकाळी त्यातील पिसाळलेल्या एका वानराने  कडाडून चावा घेऊन महिलेला गंभीर जखमी केल्याची घटना घडल्याने गावात भातीचे वातावरण पसरले आहे . पाथरी तालुक्यातील झरी गाव शिवारात वानराच्या  टोळीने मागील काही महिन्यापासून चांगलाच धुमाकूळ घातला आहे. गाव … Read more

लॉकडाऊनमुळे अफगाणिस्तानच्या प्रसिद्ध मशिदीत १००० कबूतरांचा मृत्यू; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे फक्त माणसांनाच नाही तर प्राणी आणि पक्ष्यांना देखील त्रास होतो आहे. अशाच एका घटनेत, अफगाणिस्तानमधील प्रसिद्ध मजार-शरीफ मशिदीत पाळलेल्या जवळपास हजारो पांढऱ्या कबूतरांचा उपासमारीने मृत्यू झाला आहे. हे कबूतर मशिदीत पाळले गेले होते आणि कोरोना संसर्गामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना खायला धान्य मिळाले नाही. लॉकडाऊनमध्ये मशिद उघडण्याची परवानगी नव्हती ज्याची … Read more

कोरोनाचे निदान झालेल्या मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांचे निधन 

मुंबई । मुंबई महापालिकेच्या विशेष अभियांत्रिकी विभागाचे उपायुक्त शिरीष दीक्षित यांचे निधन झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या माहीम येथील राहत्या घरी मध्यरात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. महापालिकेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिरीष दीक्षित यांचे कोरोना चाचणीचे अहवाल सकारात्मक आले होते. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजले नसून त्यांचा मृतदेह सायन रुग्णलयात … Read more