घबराना मत, चुनौती का सामना मिलकर करेंगे; उद्धव ठाकरेंचा परप्रांतीयांना दिलासा

टीम हॅलो महाराष्ट्र | देशातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकलेले आहेत. त्या मजुरांना १४ तारखेला लॉकडाऊन हटेल असं वाटलं होतं म्हणून ते एकत्र आले होते. पण संचारबंदी वाढवण्याचा निर्णय झाल्यामुळे त्यांची निराशा झाली. पण राज्याचा प्रमुख म्हणून मी त्यांना आश्वासित करु इच्छितो की तुमची संपूर्ण काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे, तुम्ही अजिबात घाबरु नका. लॉकडाऊन झाल्यानंतर … Read more

कोरोनाशी लढण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स काम करेल – उद्धव ठाकरे

टीम हॅलो महाराष्ट्र | परिस्थिती नियंत्रणात आली असली किंवा नसली तरी या लढ्याकडे गांभीर्याने पहावं लागेल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यातील नागरिकांचं कौतुक केलं. महाराष्ट्रात वैद्यकीय परिस्थिती आजही व्यवस्थित असून चाचण्यांची संख्याही वाढली आहे. सरकारतर्फे करता येणारे सर्व प्रयत्न सुरुच असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीविषयी उद्धव ठाकरेंनी सविस्तर माहिती यावेळी दिली. कोरोनातून … Read more

मुंबईत दिवसभरात ११ जणांचा बळी, २०४ नवे करोनाबाधित

मुंबई । देशातील आणि राज्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालत असून परिस्थिती चिंताजनक होत आहे. राज्यात करोनाग्रस्तांची रुग्णसंख्या २ हजाराच्या वर गेली आहे. अशा परिस्थितीत मुंबईत आज दिवसभरात करोनाने ११ बळी घेतले आहेत. तर २०४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. याचबरोबर मुंबईतील करोनाबाधितांचा एकूण आकडा १ हजार ७५३ वर पोहचला आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या १११ … Read more

पुण्यात २७ वर्षीय तरुणाचा कोरोनाने मृत्यू; शहरातील मृतांची संख्या ३८

पुणे । पुण्यात १२ तासांमध्ये ४ करोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यानं चिंतेत आणखीनच भर पडली आहे. हे सर्व ससून रुग्णालयात उपचार घेत होते. धक्कादायक बाब म्हणजे आजच्या मृतांमध्ये एका २७ वर्षीय तरुणाचा सुद्धा समावेश आहे. आतापर्यंत केवळ चाळीशी पार व्यक्तीच कोरोनाने दगावण्याची जास्त शक्यता असताना २७ वर्षीय तरुणाच्या मृत्यूने पुणेकरांच्या चिंता वाढली आहे. पुण्यात आता मृतांची संख्या … Read more

अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली राज्यात ‘कोरोना’ उपसमितीची स्थापना

मुंबई । करोनाचा उपद्रव झाल्यानंतर राज्यातील सर्वच क्षेत्रातील आर्थिक स्थिती चिंताजनक होत चालली आहे. राज्यावरील करोनाच्या संकटाचा सर्वस्तरावर प्रभावी सामना करुन कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी, ठप्प पडलेल्या राज्य अर्थव्यवस्थेची घडी पुन्हा बसवण्यासाठी, राज्याची आर्थिक, औद्योगिक, सामाजिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी एका ‘कोरोना’ उपसमितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार … Read more

भारतात ‘या’ ३ राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. अशा गंभीर परिस्थितीत संपूर्ण देशभरातील लॉकडाऊन ३ मे पर्यँत वाढवण्यात आला आहे. संपूर्ण देशातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव देशातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. कोरोनाचे जास्तीत जास्त रूग्ण या ३ राज्यांमध्येच आहेत. याव्यतिरिक्त सर्वाधिक चिंताजनक गोष्ट म्हणजे, कोरोनामुळे देशभरात झालेल्या मृत्यूंमध्ये निम्म्यापेक्षा जास्त … Read more

कहर कोरोनाचा! राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २ हजार ४५५ वर

मुंबई । राज्यात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा कहर राज्यात वाढत आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाची लागण झालेले १२१ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता २ हजार ४५५ वर पोहोचला आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज आढळलेल्या कोरोनाच्या १२१ नव्या रुग्णांपैकी ९२ रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. 121 new COVID19 … Read more

३० एप्रिल ऐवजी मोदींनी ३ मे पर्यंत का वाढवला लॉकडाउन, हे आहे कारण

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनचा आजचा अखेरचा दिवस आहे. या दिवशी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी देशव्यापी लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम राहणार असल्याचं जाहीर केलंय. मात्र यामुळे अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउन वाढवला जावा असा सल्ला दिला असतानाही पंतप्रधान नरेंद्र … Read more

यंदाची आंबेडकर जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करा- अजित पवार

मुंबई । कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. दरम्यान, त्यांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. … Read more

मुंबईत एकाच दिवसात आढळले २१८ करोना रुग्ण,कोरोनाग्रस्तांचा आकडा हजाराच्या उंबरठ्यावर

मुंबई । राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असून राजधानी मुंबई करोनाचा केंद्रबिंदू बनला आहे. मुंबईत आज करोनाचे नवीन २१८ रुग्ण आढळले असून १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत करोनाची लागण होऊन ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील करोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या हजाराच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. आज २१८ नवीन रुग्ण आढळल्याने … Read more