देशातील प्रत्येक सहावा कोरोना रुग्ण महाराष्ट्रातील, सर्व वयोगटातील लोकांना होतेय लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या विषाणूमुळे बळी पडलेल्यांची संख्या अडीच हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. विशेष म्हणजे देशातील प्रत्येक सहावा रुग्ण यावेळी महाराष्ट्रातून बाहेर पडत आहे. बातमी लिहिण्यापर्यंत महाराष्ट्रात कोरोना विषाणूमुळे १६ जणांचा बळी गेला आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ३१ मार्चपूर्वी कोरोना विषाणूच्या आकडेवारीवर काही निष्कर्ष काढले … Read more

अन्यथा निझामुद्दीनऐवजी वसई झालं असत करोनाचं हॉटस्पॉट; महाराष्ट्र पोलिसांच्या सतर्कतेमुळं अनर्थ टळला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्लीमधील निझामुद्दीन मरकजमध्ये पार पडलेल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमामुळे भारतावरील करोनाचं संकट अधिक गंभीर झालं आहे. एकीकडे या कार्यक्रमामुळे शेकडो लोकांना करोनाची लागण झाल्याची भीती असताना एक धक्क्कादायक माहिती समोर आली आहे. निझामुद्दीनप्रमाणेच तबलिगी जमातने वसईतही तितकाच मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आखली होती. पण महाराष्ट्र पोलिसांनी शेवटच्या क्षणी परवानगी नाकारली आणि … Read more

कोरोनाच्या संकटात वस्त्रनगरी इचलकरंजीने मास्क बनविण्यासाठी घेतला पुढाकार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर इचलकरंजी डीकेटीईच्या सेंटर ऑफ एक्सलन्स इन नॉनवोव्हन आणि इचलकरंजी गारमेंट क्लस्टर लि. इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना संसंर्गाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी ‘मल्टीलेयर फिल्टरेशन मास्कची‘ निर्मिती करण्यात आलेली आहे. कोरोना संसर्ग होवू नये म्हणून एन ९५ मास्कचा वापर होत असतो. भारतात कोरोनाने शिरकाव केला असल्याने ‘एन ९५‘ मास्कचा तुटवडा आहे व … Read more

लॉकडाऊननंतर आता ‘सॅलरी कटडाऊन’; लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी कपात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. अशातच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अनेक लोक मदतही करत आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केल्यानंतर राज्य सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत … Read more

दर्शकों की खास मांग पर ‘शक्तिमान’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण भारत सध्या लॉकडाऊन आहे. घरात बसून लोकांचा वेळ चांगला जावा म्हणून सरकारने रामायण, महाभारतासारख्या लोकप्रिय मालिकांचे पुनःप्रक्षेपण दूरदर्शनवर सुरु केलं आहे. यानंतर सोशल मीडियावर गतकाळात दूरदर्शनवर लोकप्रिय असलेल्या बऱ्याच मालिकांचं पुनःप्रक्षेपण सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली. या मागणीत सर्वात आघाडीवर एकाच मालिकेचं नाव होत ते म्हणजे शक्तिमान. त्यामुळं ‘दर्शको … Read more

VIDEO: गावकऱ्यांनो घरात राहा! करोनाबाबत आवाहन करताना महिला सरपंचांना अश्रू अनावर

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर  राज्यात दिवसेंदिवस करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत शासन व्यवस्थेतील सर्व यंत्रणा दिवसरात्र कामाला लागल्या आहेत. लोकांना सहकार्याचं आवाहन करत आहेत. मात्र, अजूनही काही लोक या आवाहनाला प्रतिसाद देतांना दिसत नाही आहेत. असाच काहीसा प्रकार गडहिंग्लज तालुक्यातील महागावमध्ये पाहायला मिळत आहे. नोकरी निम्मिताने मुंबईत असलेले काही नागरिक लॉकडाऊनमुळे गावात परतले … Read more

भारतातील मशिदी बंद करण्याबाबत जावेद अख्तर म्हणतात..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचालॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या काळात खबरदारी म्हणून देशातील सर्व धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशाचे पालन करत लॉकडाउनमध्ये अनेक धार्मिक स्थळंही बंद केली आहेत. परंतु काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात येत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावरून प्रसिद्ध … Read more

तरुणांनो स्वतःची काळजी घ्या! कोरोनाचा तरुण वर्गाला सर्वाधिक धोका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना संसर्गा संबंधी एक महत्वाची बाब समोर आली आहे. माध्यम वयोगटांनंतर आता २१ ते ३० वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका असल्याचं आढळलं आहे. राज्यामध्ये आढळलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी ४४ रुग्ण २१ ते ३० वयोगटातील आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या अहवालामध्ये ही माहिती स्पष्ट केली आहे. तेव्हा तरुणांना जर असं वाटतं असेल कि, कोरोना … Read more

राज्यातील करोना बाधितांचा आकडा २२० वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशावर करोना व्हायरसचं सावट असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रात जास्त दिसून येत आहे. राज्यात करोना बाधितांच्या संख्येत आजही भर पडली. राज्यातील करोना बाधितांचा आकडा आता २२० झाला आहे. आज दिवसभरात १७ नवीन रुग्णांची भर पडली आहे. तर २ जणांचा आज मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे उपचार घेणाऱ्या ३९ जणांना … Read more

कोल्हापूरात बाधित रुग्णाच्या कुटुंबातील महिला सदस्याला कोरोनाची लागण

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर पुण्याहून आलेल्या मंगळवार पेठेतील कोरोना बाधितच्या कुटुंबातील एका महिला सदस्याला कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला. कुटुंबातील इतर चार सदस्यांसह अन्य ३१ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पुण्याहून मंगळवार पेठेत आलेल्या प्रवाश्याला यापूर्वीच कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून त्याच्या … Read more