फडणवीस यांची संघ मुख्यालयात गोपनीय बैठक !

Devendra Fadanvis Secret meet at rss headquarter

नागपूर | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात संघाच्या वरिष्ठांसोबत गोपनीय बैठक झाल्याचे बोलले जात आहे. सदर बैठक बंद दरवाजात झालेली असल्याने राजकिय वर्तुळात याबद्दल उलटसुलट चर्चांना उधान आले आहे. तातडीने घेण्यात आलेल्या या बैठकीत संघाचे वरिष्ठ मंडळी सामील झाले होते. गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या बैठकीत आगामी निवडणुकीत नाराज मित्र … Read more

पवारांच्या बालेकिल्ल्यात गडकरी-फडणवीसांचा शड्डू

Satara News

सातारा प्रतिनिधी | योगेश जगताप भारतीय राष्ट्रीय रस्ते विकास महामार्गाच्या सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या कोनशीला अनावरणाचा कार्यक्रम आज सातारा येथे पार पडला. यावेळी केंद्रीय रस्ते व जहाजबांधणी विकास मंत्री ना.नितीन गडकरी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. धोम-बलकवडी कालव्याच्या १४७ किमी कामाचेही लोकार्पण यावेळी करण्यात आले. यावेळी जलसंपदा … Read more

उद्योग, गृहनिर्माण, रोजगार निर्मितीत महाराष्ट्रच अग्रेसर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Vidhanbhavan

मुंबई | सतिश शिंदे प्रधानमंत्री आवास योजना, औद्योगिक गुंतवणूक, थेट परकीय गुंतवणूक, रोजगार निर्मिती, राज्याची अर्थव्यवस्था या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र हे देशात आघाडीवर असून इतर महत्त्वाच्या योजनाही लवकरच पूर्णत्त्वास येणार आहेत, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत व्यक्त केला. अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात मुंबई तसेच … Read more

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

CM Devendra Fadanvis

मुंबई । सतिश शिंदे गोवर-रुबेलासारख्या घातक आजारांपासून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी सामान्य नागरिकांनी लसीकरणामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा आणि मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे केले. विधानभवनाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात गोवर-रुबेला प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विधानपरिषद सभापती राजराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आदिवासी विकास मंत्री … Read more

लाडशाखिय वाणी समाजाचे व्यापारातील योगदान कौतुकास्पद – मुख्यमंत्री

Devendra Fadanvis

पुणे प्रतिनिधी | लाडशाखीय वाणी समाजाचे व्यापारातील व अर्थव्यवस्थेच्या बळकटी साठीचे योगदान कौतुकास्पद आहे, असे उद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल पार पडलेल्या अखिल भारतीय लाडशाखीय वाणी समाजाच्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी काढले. यावेळी वाणी समाजाच्या वतीने मुख्यमंत्री निधि साठी 11 लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री यांच्या कडे सुपुर्द करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री यांनी वाणी समाजाच्या होतकरु … Read more

सहकार मंत्री सुभाष देशमुखांना मुख्यमंत्र्यांचा झटका, लोकमंगल संस्थेचे कोटींचे अनुदान रद्द

Devendra Fadanvis and Subhash Deshmukh

मुंबई | वेगवेगळ्या कारणांनी कायम वादात राहणारे सहकारमंत्री सुभाष देशमुख पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. त्यांच्या ‘लोकमंगल मल्टिस्टेस्ट सहकारी संस्थे’ला दिलेले अनुदान रद्द करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे लोकमंगलने 25 कोटी रूपयांचे अनुदान लाटले होते. बोगस कागदपत्रांच्या आधारे अनुदान लाटल्याचे चौकशीत उघड झाल्यानंतर राज्य सरकारने अनुदान रद्द केले आहे. सहकारमंत्री सुभाष … Read more

अटल आरोग्य वाहिनीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

IMG WA

मुंबई । सतिश शिंदे आदिवासी विद्यार्थ्यांना आता आणखी उत्तम आरोग्य सुविधा मिळणार असून आदिवासी विद्यार्थी यापुढे उपचाराच्या सुविधेपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला. आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अटल आरोग्य वाहिनी व कायापालट अभियान या योजनेचे उद्‌घाटन व लोकार्पण समारंभ प्रसंगी ते बोलत होते. विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आयोजित … Read more

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार असल्याचे प्रतिपादन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Vidhanbhavan

मुंबई । सतिश शिंदे मराठा समाजाला राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या आरक्षणासाठी भविष्यात न्यायालयात लढावे लागेल हे गृहित धरुनच या कायद्याची मजबूत रचना करण्यात आली आहे. याच अधिवेशनात या आरक्षणाचे विधेयक मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान सांगितले. आरक्षणाच्या निर्णयाविषयी अधिक माहिती देताना मुख्यमंत्री म्हणाले, कायद्यानुसार मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशींबाबत राज्य सरकार निर्णय … Read more

मुंबई महानगर क्षेत्र विस्तारणार वसई, अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर पर्यंत, मुख्यमंत्री बैठकीत निर्णय

Devendra Fadanvis

• तीन नव्या मेट्रो मार्गाच्या प्रकल्प अहवालांना मंजुरी • गायमुख ते शिवाजी चौक, वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल व कल्याण ते तळोजा मार्गाचा समावेश • मेट्रोच्या संचालनासाठी ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळा’च्या स्थापनेस मंजुरी • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वॉर रुम, नव्या बोध चिन्हाचे अनावरण मुंबई । सतिश शिंदे बृहन्मुंबई व परिसराची झपाट्याने होणारी … Read more

आदिवासी माना समाजाच्या मागण्यांबाबतीत शासन सकारात्मक भमिका घेणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis on Tribal Issue

मुंबई । सतिश शिंदे विदर्भ आदिवासी माना समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यांच्या मागण्यांबाबतची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. विदर्भ आदिवासी माना समाज कृती समितीच्या समवेत विधानभवनात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा … Read more