केंद्राने राज्य सरकारला २८ हजार १०४ कोटींचा निधी दिला; फडणवीसांचा दावा

मुंबई । केंद्राने राज्य सरकारला आत्तापर्यंत २८ हजार १०४ कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारला केंद्र सरकारनेच मदत केली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. निधी देऊनही केंद्राने काहीही दिलं नाही असं भासवलं जातं … Read more

देवेंद्र फडणवीसांची तातडीची पत्रकार परिषद; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार?

मुंबई । देशभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या थैमानात महाराष्ट्रातील सर्वाधिक संख्येमुळे हे सरकार कोरोनावर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा कडून बोलले जात आहे. नुकतेच आघाडी सरकारच्या विरोधात मेरा आंगण, मेरा रणांगण हे आंदोलन ही करण्यात आले. दरदिवशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन वळणे येत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही विरोधकांकडून केली जात … Read more

केंद्राच्या पॅकेजमध्ये फोलपणा दिसल्यावरचं फडणवीसांनी राज्याकडे पॅकेजची मागणी केली- जयंत पाटील

मुंबई । केंद्राप्रमाणे राज्य सरकारनेही विशेष पॅकेज जाहीर करावं अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधील फोलपणा देवेंद्र फडणवीस यांना दिसला म्हणून आता ते राज्य सरकारकडे पॅकेजची मागणी करत आहेत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी फडणवीसांना लगावला आहे. शिवाय “केंद्राने राज्याला पैसे दिले … Read more

५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांचे ठाकरे सरकार विरोधात आंदोलन

मुंबई । महाराष्ट्र सरकारचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर पक्षाच्या नेत्यांनी राज्य सरकारच्या वतीने शेतकरी, कामगार आणि मजुरांसाठी ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी करत राज्य भाजपा कार्यालयाबाहेर निदर्शने केली. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांसाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. आत्मनिर्भर भारत या दूरदृष्टीतून भारताला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी विविध क्षेत्रांसाठी हे पॅकेज जाहीर … Read more

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नवीन, त्यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही – देवेंद्र फडणवीस 

वृत्तसंस्था । राजकारणात वाद-प्रतिवाद होत असतात. महाराष्ट्राच्या राजकारणात तर ते सातत्याने होत राहतात. आपल्या विरोधकांच्या चुका शोधणे, त्या सातत्याने लोकांसमोर विविध माध्यमातून मांडत राहणे हे महाराष्ट्राला नवीन नाही. मग कोरोना संकटकाळात तर अशी संधी कोण कशी सोडेल? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना सुरु झाल्यापासून सध्याच्या सरकारच्या चुकांचा पाढाच वाचत आहेत. त्यातच … Read more

…म्हणून अजित पवारांनी केलं होत बंड! चेकमेट पुस्तकातून धक्कादायक खुलासा

मुंबई । गेल्या वर्षी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि राज्यात भाजप-शिवसेनाच्या युतीला बहुमत मिळालं होतं. पण मुख्यमंत्रिपदावरुन भाजप-शिवसेनेत मोठा कलह होऊन अखेर युती तुटली आणि महाविकासआघाडी जन्माला आली. पण या दरम्यान महाराष्ट्राने मोठा सत्तासंघर्ष पाहिला. या सत्तासंघर्षातील एक महत्वाचं प्रकरण म्हणजे, महाविकासआघाडीच्या बैठकांवर बैठका सुरु असताना अजित पवार अचानक भाजपच्या गोटात सामील होणं. संपूर्ण … Read more

देवेंद्र फडणवीस राज्यात अस्थिरता पसरवण्याचा रचतायत ‘कट’- बाळासाहेब थोरात

मुंबई । राज्यातील विधान सभेचे विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्ली आणि राज्यातील काही नेते एकत्र मिळून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”राज्य कोरोनाच्या संकटात असताना भाजपला राजकारण सुचत … Read more

फडणवीसांनी दिला ‘महाराष्ट्र बचाव’ नारा; म्हणाले, कोणाला राजकारण वाटत असेल तर वाटू दे!

मुंबई । केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना केली आहे. आपल्या मागण्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन शेतकरी आणि बाराबलुतेदारांच्या प्रश्नांबाबतचं निवेदन सादर केलं. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी ‘महाराष्ट्र बचाव’ची भूमिका घेऊन राज्यपालांना निवेदन देण्यात आल्याचं … Read more

”जमलं तर एक पत्र राज्य सरकारला पण लिहा!” फडणवीसांनी हाणला पवारांना उपरोधक टोला

मुंबई  । कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने अन्य क्षेत्रांबरोबरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यस्थेलामोठा आर्थिक फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राप्रमाणेच राज्य सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना निवदेन देत केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारलाही एखादं पत्र लिहून मदतीची मागणी करावी, असा टोला देवेंद्र … Read more

देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस, ते सहन करतात म्हणून काहीही म्हणायचं काय- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच तिकिट नाकारल्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस असून ते सहन करतात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं, त्यांनी आता छाती फाडून दाखवायची का?” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष … Read more