देवेंद्र फडणवीसांची तातडीची पत्रकार परिषद; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । देशभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या थैमानात महाराष्ट्रातील सर्वाधिक संख्येमुळे हे सरकार कोरोनावर उपाययोजना करण्यास असमर्थ ठरल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा कडून बोलले जात आहे. नुकतेच आघाडी सरकारच्या विरोधात मेरा आंगण, मेरा रणांगण हे आंदोलन ही करण्यात आले. दरदिवशी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन वळणे येत आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणीही विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. फडणवीस आज राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

फडणवीस या परिषदेत काय भूमिका मांडणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पुण्यातील पत्रकारांसाठी ही पत्रकार परिषद बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्राचे हे सरकार रद्द करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी गेले काही दिवस सातत्याने भाजपाकडून केली जात आहे. भाजपा नेते सरकारविरुद्ध निदर्शने करताना दिसत आहेत. या सर्व राजकीय हालचाली पाहता फडणवीस पत्रकारांसोबत आपल्या पक्षाची कोणती भूमिका मांडणार आहेत. यावर महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. याचे संपूर्ण खापर भाजपा ने आघाडी सरकारवर फोडले आहे. ते सातत्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु करण्याची मागणी करीत आहेत. सध्या भाजपा आणि आघाडी सरकार यांचे चांगलेच युद्ध जुंपले आहे. ट्विटर वरून दोन्हीकडचे नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता फडणवीस काय बोलतात ते ४ वाजता समजेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment