ऐन दिवाळीत एसटी कडून तब्बल १० टक्के तिकीट वाढ

दिवाळीच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्तीचा भार सहन करावा लागणार आहे. कारण, दरवर्षीप्रमाणे एसटी महामंडळाने यावर्षीही १० टक्के भाडेवाढ केली आहे. २४ ऑक्टोबरला मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. ही भाडेवाढ ५ नोव्हेंबर २०१९ पर्यंत कायम राहिल. भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) आणि शिवशाही (आसन) या बसेसला लागू असेल.

आठवणीतली दिवाळी…

थोड्याच दिवसांनी दिवाळी येत आहे. या दिवाळीच्या सुट्टीत नेमक काय करायच हे प्रश्न अनेकांना पडत असतात कारण वाढत्या बदलांमुळे माणूस हा शहराकडे वळू लागला. आ

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ‘सुवर्ण संधी’!

दसऱ्याचा मुहूर्त साधल्यानंतर आता धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी लोकांची पुन्हा एकदा सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होणार आहे. दिवाळीच्या आधीच सोने खरेदी करणाऱ्यांना एक गोड बातमी मिळाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना सोने खरेदी करता येऊ शकणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्लीत सोन्याच्या दरात ३० रुपयांची किरकोळ घसरण झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

‘व्हाइट हाऊस’मध्ये दिवाळी! ट्रम्प दीपप्रज्वलन करून दिवाळीच्या उत्सवास सुरुवात करतील

अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे गुरुवारी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. दिवाळी सुरू होण्याच्या तीन दिवस आधीच दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसध्ये दिवाळी साजरी करण्याचे हे तिसरे वर्ष आहे. याआधी २००९ पासून बराक ओबामा यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा सुरू केली होती. ट्रम्प हे गुरुवारी दीपप्रज्वलन करून दिवाळीच्या उत्सवास सुरुवात करतील. २०१७ मध्ये व्हाइट हाऊसमधील ओव्हल कार्यालयात त्यांनी दिवाळी साजरी केली होती. उद्याच्या दिवाळी कार्यक्रमास त्यांच्या प्रशासनाचे सदस्य व भारतीय अमेरिकी समुदायाचे नेते उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी अमेरिकेतील भारतीय राजदूत नवतेजसिंह सरना यांना दिवाळीसाठी निमंत्रित केले होते. सध्या अमेरिकेत भारतीय वंशाच्या लोकांनी दिवाळीचा उत्सव सुरू केला आहे.

‘रंगात रंगलेली – फोटोजेनिक दिवाळी’

दिवाळी म्हटलं की रंगीबेरंगी वातावरणाचा सडा सगळीकडे पडलेला दिसतो. तो रंग कपड्यांमध्ये, दिवाळी फराळात आणि आकाशकंदिलामध्ये दिसून येतो. रंगीबेरंगी रांगोळीमुळे बाह्य वातावरण अधिक प्रसन्न होतं. त्यामुळे या रंगांकडे दुर्लक्ष करून चालणारच नाही..!!

यंदाच्या दिवाळीवर पावसाचे सावट; बाजारपेठा सामानाने फुल्ल पण लोकांविना शांतच..

यंदा पावसाने राज्यभरात कहर माजवला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने आतापर्यंतचं सर्वाधिक रौद्ररूप दाखवलं असून याचा परिणाम दिवाळी सणावरही होईल असं दिसून येत आहे. मागील ५ दिवसांपासून पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, अहमदनगर या ठिकाणी पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. घराबाहेर पडण्यासाठी पाऊस जराही उसंत देत नसल्याने याचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम दिसून येत आहे. या आठवड्याच्या शेवटी वर्षातील सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीला सुरुवात होणार असून, या सणावरही पावसाचे सावट जाणवून येत आहे.

यंद्याच्या दिवाळीत करून पहा चविष्ट ‘ढेबऱ्या’

ठाणे जिल्हात भातशेती मोठ्या प्रमाणात करण्यात येते. त्यामुळं या भागात वर्षभर तांदळाचे विविध पदार्थ बनविले जातात. अनेक ग्रामीण भागातही सकाळची न्याहारी म्हणूनही भाकरीच बनवली जाते. गणपतीनंतर भात कापणीला सुरुवात होते आणि दिवाळीच्या काही दिवसांआधी घरात धान्य येते. पूर्वी दिवाळीच्या दिवशीही याच धान्याचा पदार्थ केला जायचा. या दिवसांत घरात शेतमजुरांची वर्दळ असायची. हा पदार्थ या मजुरांचा खास आवडीचा होता. पणं जसजसं शेतीचं प्रमाण कमी होत गेलं, तसा हा पदार्थही गायब झाला. आता तो बनवला जातं नाही.

आकाशकंदिलांनी उजळला यंदाचा दिवाळी बाजार

दीपावलीच्या पार्श्वभूमीवर नेत्रदीपक आकाशकंदील खरेदीसाठी बालगोपाळांसह आबालवृद्धांची शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये गर्दी करत असल्याचे दिसत आहे. यंदा मान्सूनही चांगला झाला असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून विविध आकाशकंदील विक्रीसाठी ठेवले आहे. बाजारपेठेत फेरफटका मारल्यास चिनी मालाचे प्रमाण भारतीय वस्तुंनी मोडून काढल्याचे दिसत आहे.दिवाळीचे मुख्य आकर्षण असणारे आकाशकंदिलाचे अनेक प्रकार बाजारात दाखल झाले आहेत.

आली…आली दिवाळी आली…

अवघ्या नऊ दिवसांवर आलेल्या दिवाळीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. कपडे, पणत्या, आकाशकंदील, रांगोळ्या, शोभेच्या वस्तू यांसह फराळासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी आता ग्राहकांची लगबग सुरू आहे. दुसरीकडे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनीही विविध योजना बाजारात आणल्या आहेत.

धक्कादायक! फटाके फोडले म्हणुन दोन वर्षांचा तुरुंगवास

Crackers Free Diwali

सिंगापूर | दोन भारतीयांनी दिवाळी निमित्य बिना परवाना फटाके फोडले म्हणून सिंगापूर येथील लिटिल इंडिया या ठिकाणी त्यांना अटक करण्यात आली असून यासाठी त्यांना २ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होणार आहे. त्यांची नावे थियागु सेल्वराजु ( 29) आणि शिव कुमार सुब्रमण्यम (48) अशी आहे. पर्यावरणाला धोका निर्माण होतो म्हणून देशाच्या सुप्रीम कोर्टाने यंदाच्या दिवाळीत फटाके … Read more