”तुमचं दूतावास ७२ तासांच्या आत बंद करा” अमेरिकेचे चीनला अल्टिमेटम

वॉशिंग्टन । कोरोना व्हायरसच्या प्रसारानंतर अमेरिकेकडून चीनवर संताप व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार कोरोना महामारीच्या प्रसारासाठी चीन जबाबदार असल्याचे म्हटलं आहे. याशिवाय डोनाल्ड ट्रम्प जाहीर सभांमधून चीनवर निशाणा साधताना दिसत आहेत. दरम्यान कोरोना व्हायरसवरून दोन्ही देशामधील संबंध ताणले असताना अमेरिकेने चीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दूतावास ७२ तासांच्या आत बंद करण्याचे … Read more

कोरोनावर नियंत्रण मिळवणं नव्हे तर त्याला संपवणं हेच आपलं ध्येय- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन । ”कोरोनावर नियंत्रण मिळवणं नाही तर त्याला संपवणं हेच आपलं ध्येय आहे. कोरोनावरील लस येत असून लोक विचार करत आहेत त्यापेक्षाही वेगाने ती येईल,” असा विश्वास अमिरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला असून कोरोना नाहीसा होईल याचा पुनरुच्चार केला. व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पत्रकारांशी … Read more

ट्रम्प प्रशासनाच्या ‘या’ निर्णयाविरोधात १७४ भारतीयांनी कोर्टात घेतली धाव

वॉशिंग्टन । अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने एच १बी व इतर प्रकारचे व्हिसा २०२०च्या अखेरीपर्यंत थांबवल्याने भारतीय माहिती तंत्रज्ञान व्यावसायिकांना या फटका बसला आहे. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात १७४ जणांनी कोर्टात धाव घेतली आहे. यामध्ये ७ जण अल्पवयीन आहेत. भारतीय नागरिकांच्या समुहानं ट्रम्प ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरोधात कोर्टात याचिका दाखल केली आहे. वास्डेन बॅनियास यांनी १७४ भारतीय … Read more

कोरोनावरची लस अमेरिकेला सापडली? ट्रम्प यांच्या ‘या’ ट्विटने एकचं खळबळ 

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसविरोधात संपूर्ण जग लढा देत आहे. सध्या सगळयांचे लक्ष कोरोनाला रोखणारी लस बाजरात कधी उपलब्ध होणार याकडे लागले आहे. रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने बनवलेली लस मानवी परीक्षणामध्ये यशस्वी ठरलेली असतानाच जगासाठी आणखी एक आनंदाची बातमी येण्याचे संकेत मिळत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना लसी संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण टि्वट केले … Read more

चीनशी करार केल्यानंतर चाबहार रेल्वे प्रकल्पातून भारताला काढून इराणने दिला मोठा धक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इराण आणि चीनमधील 400 अब्ज डॉलरच्या कराराचा परिणाम आता दिसून येऊ लागला आहे. चीनशी हातमिळवणी केल्यावर इराणने भारतला चाबहार रेल्वे प्रकल्पातून बाहेर सोडत एक मोठा धक्काच दिला आहे. कराराच्या 4 वर्षानंतरही भारत या प्रकल्पाला वित्तपुरवठा करीत नाही असा आरोप इराणने केला आहे. अशा परिस्थितीत, आता ते स्वत: हा प्रकल्प पूर्ण करतील. … Read more

अमेरिका करणार चीनवर मोठी कारवाई, १५ दिवसांत घेतले ‘हे’ नऊ महत्वाचे निर्णय 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या फैलावामुळे चीन सध्या जगाच्या निशाण्यावर आहे. जगभरात हा विषाणू चीनने पसरवला असल्याचे बोलले जात आहे. भारत चीन सीमेच्या तणावातही अमेरिका भारताच्या बाजूने असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते. सध्या महासत्ता अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंतर वाढते आहे असे म्हंटले जाते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच चीनविरोधात … Read more

अमेरिका WHO मधून पडलं बाहेर, ट्रम्प प्रशासनाने पाठवले अधिकृत पत्र

वॉशिंग्टन । अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेतून (World Health Organization) बाहेर पडलं असून, ट्रम्प सरकारने (American Government) अधिकृत पत्र पाठविले आहे. अमेरिका आता यापुढे जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारने WHOला या संदर्भात आपला निर्णय अधिकृत पत्राद्वारे कळविला आहे. अमेरिकन माध्यमांच्या म्हणण्यानुसार ट्रम्प सरकारने WHOमधून आपले सदस्यत्व मागे घेण्याबाबत एक पत्र पाठवले आहे. … Read more

भारतापाठोपाठ आता ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेतही टिकटॉकसहित अनेक चिनी अ‍ॅप्स वर बंदी ? जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताकडून मागील आठवड्यात 59 चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आल्यानंतर आता अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया देखील राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची तयारी करत आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये संसदीय समिती लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करू शकते तर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनीही म्हटले आहे की,’ सुरक्षेच्या दृष्टीने अनेक चिनी अ‍ॅप्सवर लवकरच बंदी … Read more

कोरोना व्हायरस आपोआप गायब होईल – डोनाल्ड ट्रम्प 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या विधानांनी नेहमी चर्चेत असणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता त्यांच्या कोरोना विषाणूसंदर्भातील विधानामुळे चर्चेत आले आहेत. सध्या अमेरिका कोरोना बाधित रुग्णसंख्येत प्रथम क्रमांकावर आहे. बुधवारी अमेरिकेत कोरोनाचे ५२ हजार रुग्ण आढळले आहेत. स्थिती इतकी गंभीर असतानाही तरूप यांनी कोरोना आपोआप गायब होईल असे म्हण्टल्याने ते पुन्हा प्रकाशझोतात आले आहेत. सध्या … Read more

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

तेहरान । इराणचे टॉप लष्करी जनरल कासिम सुलेमानी यांच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्याविरोधात इराणने अटक वॉरंट जारी केले आहे. इराकच्या बगदाद शहरात अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात सुलेमानी ठार झाले होते. डोनाल्ड ट्रम्प यांना पकडण्यासाठी इराणने इंटरपोलकडे मदत मागितली आहे. ट्रम्प आणि इतर अधिकाऱ्यांना अटक करण्यासाठी इंटरपोलला नोटीस काढण्याची विनंती केली आहे. … Read more