‘माफ करा साहेब, पहिल्यांदाच तुमचं ऐकणार नाही’ – जितेंद्र आव्हाड

मुंबई प्रतिनिधी। आज दुपारी दोनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे मुंबईतील ईडीच्या कार्यालयात येणार आहेत. त्यामुळे ईडीसमोरच मोठा पेच निर्माण झाला आहे. तसंच “मी शुक्रवारी दुपारी २ वाजता ‘ईडी’ कार्यालयात उपस्थित राहणार आहे. मात्र, पक्ष कार्यकर्ते आणि समर्थकांनी या कार्यालयाबाहेर उपस्थित राहू नये. राज्यघटना आणि संस्थांचा आदर करण्याची आपली परंपरा कायम राखत … Read more

शरद पवारांनी ईडी कार्यालयात येऊ नये – ईडी

 मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार आहेत. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच आहे. या सगळ्या घडामोडींमुळे मुंबईत तणावाची परिस्थिती … Read more

मग… मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल करा – राजू शेट्टी

कोल्हापूर प्रतिनिधी। ‘शरद पवार यांच्यावर झालेल्या ईडी च्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताशी मी सहमत आहे. त्यामुळे जसा पवारांवर गुन्हा दाखल झाला तसाच चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे.’ असे मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी शरद यांच्यावर … Read more

खडसेंनी केली पवारांची पाठराखण ; म्हणाले बँक घोटाळ्याशी पवारांचा काय संबंध

मुंबई प्रतिनिधी | राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्या संदर्भात काल ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून राज्यभर भाजपच्या विरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली आहेत. याच संदर्भात भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे. आपण विरोधी पक्ष नेते पदावर असतानाच या प्रकरणाला सुरुवात झाली. या प्रकरणाच्या संदर्भात … Read more

मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना हवी असणारी माहिती देणार : शरद पवार

मुंबई प्रतिनिधी |  राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात त्यांनी आज मुंबई मध्ये पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात आपली भूमिका विस्ताराने मांडली आहे. मी स्वतः ईडीच्या कार्यालयात जाऊन त्यांना हवी असणारी माहिती देणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मी राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे. महिनाभर मुंबईत … Read more

पवारांचं चारित्र्यहनन हाच भाजपचा अजेंडा, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

मुंबई प्रतिनिधी ।  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने गुन्हा दाखल केला. त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घटनेला अधिकच महत्व प्राप्त झालं आहे. भाजपने विरोधकांच्या प्रचाराची धार कमी करण्यासाठीच हे केल की काय अशा प्रकारच्या चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगू लागल्या आहेत. त्याच त्यांदर्भात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर … Read more

‘ईडी झालीय येडी!’ – सत्यजीत तांबे

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। राज्यातील विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू झाली असतानाच मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिखर बँक घोटाळाप्रकरणी कारवाई केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. यावर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘ईडी झालीय येडी!’ असं ट्विट त्यांनी केलं आहे. सत्यजीत … Read more

राज्य सहकारी बँक घोटाळा : निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर ईडीने केला गुन्हा दाखल

मुंबई प्रतिनिधी |  राज्य सहकारी बँकेच्या अनियमित कर्ज वाटपामुळे झालेल्या २५ हजार कोटी रुपयांच्या भष्टाचार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शरद पवार यांना हा आजपर्यंतच्या राजकीय जीवनात मिळालेला सर्वात मोठा धक्का असल्याचे राजकीय जाणकारांनी म्हणले आहे. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश … Read more

मनसेचे नितीन सरदेसाईंची ईडीकडून चौकशी; राज ठाकरे नंतर देसाईंचा नंबर

वृत्तसंस्था | कोहिनूर स्क्वेअरप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या चौकशीनंतर ईडीनं मनसेचे नेते माजी आमदार नितीन सरदेसाई यांची चौकशी सुरू केली आहे. ईडीनं सरदेसाई यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानुसार सरदेसाई हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहेत.ईडीनं या आधी कोहिनूर स्क्वेअर प्रकरणात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे सुपुत्र उर्वेश जोशी यांची चौकशी केली होती. त्यानंतर मनसे अध्यक्ष … Read more

सर्वोच्च न्यायालयाने पी चिदंबरम यांना ईडी प्रकरणात जमिन नाकारला

वृत्तसंस्था | माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे. जामीन नाकारल्यामुळे आता ईडीचा (सक्तवसुली संचलनालय) चिदंबरम यांना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निर्णयाला आव्हान दिलं होतं.यावेळी सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ट्रायल कोर्टात नियमित जामिनासाठी … Read more