काँग्रेसची दारं नाथाभाऊंसाठी नेहमी खुली- बाळासाहेब थोरात

मुंबई । विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यान पक्षावर नाराज असलेले भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचा गौप्यस्फोट केला होता. तसेच कोरोनाचं संकट संपल्यानंतर निर्णय घेऊ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यावर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण देत आपण अशी कुठलीही ऑफर खडसे यांना दिली नसल्याचे म्हटलं आहे. मात्र, खडसेंसाठी आमची … Read more

कोरोना संकट संपल्यानंतर देशात ३ तर राज्यात असंख्य राजकीय भूकंप होणार; चंद्रकांत पाटलांचं भाकीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । “कोरोना संकट संपल्यानंतर देशात तीन तर महाराष्ट्रात असंख्य भूकंप होणार आहेत,” असा गौप्यस्फोट भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त बोलत होते. कोरोनाचं संकट संपल्यानंतर देशामध्ये तसंच राज्यातही काँग्रेसमध्ये अनेक भूकंप होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही … Read more

देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस, ते सहन करतात म्हणून काहीही म्हणायचं काय- चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच तिकिट नाकारल्यामुळे एकनाथ खडसे यांच्याकडून होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या मुद्द्यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस एक सज्जन माणूस असून ते सहन करतात म्हणून त्यांच्याबद्दल काहीही म्हणायचं, त्यांनी आता छाती फाडून दाखवायची का?” असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष … Read more

एकेकाळी फडणवीसांची शिफारस मीच केली होती, त्याचीच आज शिक्षा भोगतोय- एकनाथ खडसे

जळगाव । भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकारल्यानं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे सध्या राज्यातील पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशा वेळी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस मीच केली होती त्याचीच आज शिक्षा मी भोगतोय, अशी खदखद प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. भूतकाळात विधानसभेचा विरोधी पक्षनेता असताना मीच भाजप नेते … Read more

मला काँग्रेसकडून ऑफर होती; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

जळगाव । विधानपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती आणि भाजपच्या ६-७ आमदारांनीही क्रॉस व्होटिंग करण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र आपण ही ऑफर नाकारली, असा दावाही खडसे यांनी केला. भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकालल्यानं खडसे सध्या पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशातच आपल्याला … Read more

एकनाथ खडसे भाजप सोडण्याच्या तयारीत? म्हणाले…

जळगाव  । भाजपचे राज्यातील जेष्ठ आणि दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना भाजपने विधान परिषदसाठीच तिकीट नाकारलं. यामुळं भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे तीव्र नाराज असून त्यांनी भाजप सोडण्याचे आता संकेत दिले आहेत. आपल्याला इतर पक्षांकडून ऑफर असल्याचा खुलासा खडसे यांनी केला आहे. कोरोनाचं संकट संपल्यानंतर निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं आहे. “मला संधी … Read more

भाजपने तिकीट नाकारल्यावर निष्ठावंत खडसे म्हणाले, ‘पक्षाला शिव्या घालणाऱ्यांना मान दिला गेला,पण..

जळगाव । विधान परिषदेची उमेदवारी नाकारली गेल्यामुळं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘मी ४० ते ४२ वर्षे एकनिष्ठ राहून भाजपचं काम करतोय. पक्ष वाढवताना अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला. चढउतार पाहिले. आतातरी मला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मला उमेदवारी द्यायची नव्हती तर किमान काही वर्षे पक्षाचं काम करणाऱ्यांना … Read more

खडसे, मुंडेंना भाजपचा पुन्हा दे धक्का! विधान परिषदेसाठी उभे केले ‘हे’ ४ उमेदवार

मुंबई। येत्या २१ मे ला होऊ  घातलेल्या विधान परिषद निवडणुकांसाठी भाजपकडून ४ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. संख्याबळानुसार भाजपला चौथ्या जागेसाठी काही मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भाजपमध्ये अनेक नेत्यांच्या नावाची चर्चा होती. अखेर नवीन चेहऱ्यांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज असलेल्या ओबीसी नैतृत्व एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा भाजपने … Read more

राज्यसभा नाही दिली किमान विधानपरिषदेची तर जागा द्या!- एकनाथ खडसे

जळगाव । येत्या 21 मे रोजी महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी मुंबईत निवडणूक होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षानं उमेद्वारीपासून डावलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेच्या जागेची उमेदवारी देण्याची मागणी भाजपकडे केली आहे. राज्यसभेच्या जागेसाठी शिफारस होऊनही निवड झाली नाही, पण आता विधानपरिषदेसाठी तरी माझा विचार करावा, असं भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी … Read more

खंत! आता राज्यसभेची उमेदवारी देऊन उपयोग नाही- एकनाथ खडसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाकडून एकनाथ खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सुत्रांची माहिती आहे. आपल्याला विधानसभेतच आपल्याला रस होता, आता राज्यसभेची उमेदवारी देऊन उपयोग नाही अशी तीव्र नाराजीची भावना एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा दर्शवली. गेल्या वर्षी विधानसभेसाठी भाजपने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नव्हती. विधानसभा लढवण्याची पूर्ण तयारी केलेल्या खडसेंनी विधानसभेसाठी आपला अर्जही … Read more