एकनाथ खडसेंची शिवसेनेला युतीधर्म पाळावा म्हणून वॉर्निंग

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या विरोधात उभे आहेत. पाटील यांनी शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून मातोश्रीकडून तो अद्याप स्वीकारल्या गेला नाही आहे. याच कारणावरून एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले असून शिवसेनेला वॉर्निंग दिली आहे.

चंद्रकांत पाटील युतीमधून बाहेर, एकनाथ खडसेंच्या मुलीविरुद्ध राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर लढणार

मुक्ताईनगर येथील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार रवींद्र भैय्या पाटील यांनी आज आपल्या उमेदवारीचा अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा दिला आहे.

खडसेंना राष्ट्रवादीत घेण्याच्या हालचाली वाढल्या; अजित पवारांचा बीड दौरा अचानक रद्द

हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी। भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर अपमानित झालेले खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोललं जात आहे. खडसे यांच्याशी सुरु असलेल्या चर्चेमुळेच आज अजित पवार बीड जिल्ह्यातील उमेदवारांचा अर्ज भरण्यासाठी गेवराई, माजलगाव, बीडला येऊ शकले नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. खडसे यांना तिकिट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी मुक्ताईनगरमध्ये आंदोलन पुकारले आहे. खडसेंनी … Read more

या कारणामुळे रक्षा खडसेंच्या उमेदवारीला स्थानिक शिवसैनिकांचा जोरदार विरोध

जळगाव प्रतिनिधी | वाल्मिक जोशी रावेर लोकसभेची जागा शिवसेनेला मिळावी अशी मागणी करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी जोरदार घोषणा बाजी केली. भाजपचे खलनायक व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या कुटुंबियांस लोकसभेचे तिकीट मिळाल्यास शिवसेनेचे कार्यकर्ते त्याचा प्रचार करणार नसल्याचा पवित्रा घेत शिवसैनिकांनी पाटील यांच्या निवास्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल … Read more