एकनाथ शिंदेंची दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद; स्पष्ट करणार भूमिका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे 25 आमदारांसह गुजरात मध्ये आहेत. काल रात्री उशिरापासून शिंदे गुजरात येथील हॉटेल मध्ये आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत. एकनाथ शिंदे दुपारी 2 वाजता सुरत येथून पत्रकार परिषद … Read more

शिवसेनेचे फुटलेले आमदार एकनाथ शिंदेंसोबत घेणार अमित शहांची भेट?

Amit Shah Eknath Shinde 01

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर ठाकरे सरकारमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कारण शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल आहेत. दरम्यान त्यांच्यासह वीसहून अधिक आमदार असून ते गुजरातमध्ये आहेत. दरम्यान ते आज केंद्रीयगृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह संबंधित आमदार भाजमध्ये प्रवेश … Read more

एकनाथ शिंदेशी संपर्क झालाय; संजय राऊतांची मोठी माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेविवेट नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून सोमवारी संध्याकाळी पासून ते नॉट रीचेबल आहेत. सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या एकूण घडामोडींमुळे राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेशी संपर्क झालाय अशी माहिती दिली आहे. शिवसेनेचे काही आमदार … Read more

एकनाथ शिंदे ‘नॉट रिचेबल’, नारायण राणेंनी हसत हसत दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाले…

narayan rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याने शिवसेनेचे टेन्शन वाढले आहे. काल सायंकाळी मतदान पूर्ण झाल्यानंतरपासूनच एकनाथ शिंदे पक्षाच्या संपर्कात नसल्याने राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याच पार्श्वभूमीवर सर्व शिवसेना आमदारांची दुपारी १२ वाजता बैठक बोलावली आहे. यावर केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी एकनाथ … Read more

शिंदेंच्या नाराजीने राजकीय घडामोडींना वेग; फडणवीस दिल्लीला रवाना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात सर्वात मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे हे 25 आमदारांसह गुजरात मध्ये आहेत. काल रात्री उशिरापासून शिंदे गुजरात मध्ये आहेत. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यातील एकूण … Read more

सरकार अडचणीत?? एकनाथ शिंदे गुजरातमध्ये; पवारांनी बोलावली तातडीची बैठक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे हेविवेट नेते एकनाथ शिंदे हे नाराज असून सोमवारी संध्याकाळी पासून ते नॉट रीचेबल आहेत. सूरतमधील मेरिडियन हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे असल्याचे सांगण्यात येत आहे. या हॉटेलबाहेर गुजरात पोलिसांकडून बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे काही आमदार असल्याची शक्यता आहे. गुजरातमधील भाजपा नेत्यांचा गट एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी हॉटेलच्या दिशेनं रवाना … Read more

उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारणार ; अयोध्येतून शिवसेनेची मोठी घोषणा

Shiv Sena

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे नुकतेच अयोध्येत दाखल झाले. त्यांनी रामनगर येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्णाचे दर्शन देखील घेतले. तसेच रात्री युवा सेनेकडून शरयू नदीच्या काठी त्यांच्याकडून आरतीही केली जाणार आहे. दरम्यान शिवसेने नेते तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्येत पोहचताच एक मोठी घोषणा केली. उत्तर प्रदेशात महाराष्ट्र भवन उभारणार … Read more

भाजपने रामाच्या मंदिराचे राजकारण बंद करावे; अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनानंतर संजय राऊतांची टीका

Sanjay Raut Ayodhya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन भाजप आणि शिवसेनेत जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी अयोध्या दौरा जाहीर केला असून 15 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत, गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आज अयोध्येत दाखल झाले. त्यांनी प्रभू … Read more

एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री !! ठाण्यातील बॅनरमुळे चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त मुलुंडसह सर्व ठाण्यात पोस्टर्स, बॅनर्स झळकाविण्यात आले आहेत. या बॅनर्समध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यामुळे … Read more

गोव्यात भाजपने आत्मपरीक्षण करणे गरजेचे; एकनाथ शिंदे यांचा टोला

Eknath Shinde

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज मुंबई, नागपूर, औरंगाबाद, उस्मानाबाद आदी ठिकाणी दहावी आणि बारावीमधील विध्यार्थ्यानी ऑफलाईन परीक्षेच्या विरोधात आंदोलन केले जात आहे तर दुसरीकडे गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्पल पर्रीकर यांची उमेदवारी नाकारली आहे. यावरून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. विद्यार्थी आंदोलनामुळे लॉ अँड ऑडर बिघडणार नाही याची संबंधित मंत्री काळजी … Read more