बबनराव लोणीकरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

जालन्यातील परतुरचे भाजपचे उमेदवार बबनराव लोणीकर यांच्यावर आचार संहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालन्यातील सेवली पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका वायरल विडिओ मधील भाषणाच्या आधारावर त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निवडणूक आयोगाने घातली एक्झिट पोलवर बंदी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मंगळवारी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. २१ ऑक्टोबर रोजी, महाराष्ट्र व हरियाणा या दोन्ही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांसह १७ राज्यांमधील ५१ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांसाठी तसेच, महाराष्ट्रातील सातारा व बिहारमधील समस्तीपुर येथील लोकसभेच्या जागेसाठी देखील मतदान होणार आहे. या दिवशी आयोगाकडून मतदानोत्तर कल दाखवणाऱ्या एक्झिट पोलवर बंदी घालण्यात आली आहे.

‘रस्त्यांवर सभा घेऊ द्या!’ निवडणूक आयोगाला ‘मनसे’ विनंती

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा पावसामुळं रद्द झाल्यानंतर मनसेनं रस्त्यावर सभा घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसं पत्र मनसेनं राज्य निवडणूक आयुक्तांना लिहिलं आहे. पाऊस लांबला असून, मैदानांत चिखल होत आहे. त्यामुळं सभा घेण्यात अडचणी येत आहेत, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

‘मतदानातील नोटा पर्याय लोकशाहीला घातक’ – चंद्रकांत पाटील

आज ‘विजयादशमी’चा उत्सव देशभरासह राज्यभरात देखील मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर देश आणि महाराष्ट्रातील मान्यवर जनतेला शुभेच्छा देत आहेत. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यावेळी मतदारांना दिलेल्या नोटा पर्यायाबाबत त्यांनी विवादित वक्तव्य केले.

मतदान केंद्र शोधताय? गूगल करा..

लोकसभा निवडणुकीत पुण्यामध्ये निचांकी मतदान झाल्याचा कटू अनुभव असल्याने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी यंदा प्रथमच मतदान केंद्रे ही ‘गुगल टॅग’ करण्यात येणार आहेत. त्यामुळे मतदारांना घराजवळची मतदान केंद्रे समजू शकणार आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांना गुगल मॅपमध्ये टॅग करण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांना मतदान केंद्र कोठे आहे; तसेच किती अंतरावर आहे, हे समजणार आहे.

निवडणूक आयोगाने लोकप्रिय ‘लुडो’ चिन्हाचा समावेश करत विधानसभेसाठी 197 चिन्ह दिली

मुंबई प्रतिनिधी। निवडणुकांचा प्रचार खऱ्या अर्थाने निवडणुकीतील चिन्हांमुळे रंगात येतो. राजकीय पक्षाच्या उमेदवारांची चिन्हे आधीच निश्‍चित असतात. पण, अपक्ष उमेदवारांना अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी चिन्हाचे वाटप होते. त्यामुळे त्यांना कमीत कमी कालावधीत आपले चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे कठीण काम यशस्वीपणे करावे लागते. त्यामुळे रोजच्या वापरातील आणखी ओळखीच्या चिन्हाला अपक्ष उमेदवारांची मागणी असते. त्यामुळे यंदा निवडणूक आयोगाने … Read more

ईव्हीएम बंद झाल्याशिवाय परिवर्तन नाही- वामन मेश्राम

नाशिक प्रतिनिधी| ‘देश अराजकतेच्या दिशेने चालला आहे. लोकशाही पर्यायाने संविधान बदलवून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. भारतीय जनता पार्टीन 2014 व 2019 च्या दोनही निवडणुका ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून जिंकल्यात. यात देशातील निवडणूक आयोगही सहभागी असून सुप्रीम कोर्टान दिलेला निर्णय ही पाळत नाही. तेव्हा देशात हुकुमत कुणाची हे लक्षात आल पाहिजे. म्हणूनच ईव्हीएम बंद झाल्याशिवाय देशात परिवर्तन … Read more

कर्नाटक सीमा भागात १४ ठिकाणी नाकाबंदी, पोलीस दल निवडणुकांसाठी सज्ज

कोल्हापूर प्रतिनिधी | राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असून निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील भांगात विशेष दक्षता घेणारी पाऊल उचलण्यात अली आहेत. त्यानुसार ‘ सीमावर्ती भांगातून रक्कम घेऊन जात असताना 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम असेल तर त्यासोबत पुरावा म्हणून आवश्यक ती कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. अन्यथा अशी संशयीत रक्कम आयकर विभागाकडे वर्ग … Read more

यू. पी. एस. मदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त

वृत्तसंस्था |राज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राज्याचे मुख्य सचिव राहिलेले यू.पी.एस. मदान हे १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. राज्याच्या मुख्यसचिवासह त्यांनी … Read more

विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त ठरला ?

टीम, HELLO महाराष्ट्र | विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु झाला असून राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य मतदारांना निवडणुकांचे वेध लागले आहेत. येत्या 13 सप्टेंबरला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होण्याची चिन्हं आहेत. राज्यात 22 ऑक्टोबरपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात येणं गरजेचं असल्याचं निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितलं आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 31 … Read more