नवीन रुग्णालयात होणार एमसीएच विंग- राजेश टोपे

MCH Wing

औरंगाबाद | काही दिवसांपूर्वी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची भेट घेत घाटीतील रद्द झालेली एमसीएच विंग पुन्हा मिळावी यासाठी शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी अमित देशमुख यांना एम सी एच विंग ची सर्व कागदपत्रे सादर केली होती. परंतु आता हे एमसीएच विंग घाटीत होणार नसून नवीन रुग्णालयात होणार आहे. शासकीय दूध डेअरी जवळ … Read more

मराठवाड्यात एम्सची स्थापना करण्याची मागणी-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

Dr. bhagavat karad

औरंगाबाद | मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवी यांच्याकडे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी मराठवाड्यात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची स्थापना करण्याची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत निवेदन देऊन चर्चा देखील केली. औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात आले आहे. परंतु मराठवाड्यामध्ये एम्स ची गरज आहे. प्रधानमंत्री … Read more

उभ्या ट्रकवर कंटेनर आदळून चालक ठार; झाल्टा फाट्यावर घडला अपघात

accident

औरंगाबाद : बीडच्या दिशेने कुरियर घेऊन जाणारा कंटेनर उभ्या ट्रकवर आदळला. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला. उपचारांदरम्यान घाटी रुग्णालयात गुरुवारी त्याचा मृत्यू झाला. हा अपघात झाल्टा फाटा येथे घडला. फिरोज बुन्‍दू खान असे मृताचे नाव आहे. उत्तर प्रदेशातील सरताज मोहम्मद आजाद मोहम्मद वय 24 (रा. हाशमपूर) हा त्याचे भावजी फिरोज खान असे दोघे … Read more

‘मी विष घेत आहे तुम्ही सर्व चांगले रहा’ असा व्हिडिओ वर्गमित्राला टाकून तरुणाची आत्महत्या

Poision

औरंगाबाद | एका पंचवीस वर्षीय तरुणाने आपल्या वर्गमित्रांना मोबाईलद्वारे ‘मी विष घेत आहे’ असे कळवून आत्महत्या केली आहे. आता मी विष घेवुन मरणार आहे तर तुम्ही चांगले रहा हा संदेश त्यानी विष घेण्यापूर्वी आपल्या वर्गमित्रांना दिला. आजाराला कंटाळून तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी, थेरगाव (ता.पैठण) येथे घडली. हमीद अन्सार शेख (रा. … Read more

चिंताजनक! जिल्ह्यात 47 कोरोनाबाधितांची नव्याने वाढ, दोघांचा मृत्यू

Corona

औरंगाबाद : जिल्ह्यात 47 कोरोना बाधितांची नव्याने भर पडली आहे. तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला. यात घाटी रुग्णालयात कबाडीपुरा येथील 59 वर्षीय पुरुष, तर खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 70 वर्षीय रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात 35 जणांना मनपा 9, ग्रामीण 26 सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एक लाख 43 हजार 255 कोरोनाबंधित बरी होऊन घरी परतली … Read more

धक्कादायक! मित्रांसमोरच तलावात बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत; सुदैवाने चारजण बचावले

Drop boy

औरंगाबाद | ट्रेकिंगला गेलेल्या मित्रांना अंघोळीचा मोह आवरला नाही. तलावात अंघोळ करताना पाण्याचा अंदाज न आल्याने पाच मित्र बुडाले होते. त्यापैकी चौघेजण सुखरूप बाहेर निघाले मात्र एका तरुणाचा पाण्यात बुडुन दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सातारा डोंगर परिसरातील तलावात घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लखन ईश्वर पवार, वय-18 (रा. शिवशंकर … Read more

बारा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू; खेळताना पडला होता डोहात

River Death

औरंगाबाद | चिकलठाणा येथील हिनानगर भागातील 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी दोन वाजता उघडकीस आली आहे. आदिल शेख रहीम शेख, वय 12 (रा. नगर चिकलठाणा) असे मृत बालकाचे नाव आहे. हिनानगर येथील काही मुले केंब्रिज सावंगी बायपास रोडच्या बाजूच्या ओढ्यात शनिवारी दुपारी खेळण्यासाठी गेली होती. खेळता-खेळता आदिल शेख सहा फूट खोल … Read more

अंगावर भिंत पडून चिमुकलीचा मृत्यू ; आजी आजोबा जखमी

जालना | पाऊस चालू असताना घराची भिंत अंगावर पडून आठ वर्षीय मुलगी जागीच ठार झाली, तरआजी आजोबा जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे तालुक्यातील ढासला येथे घडली. श्रावणी मदन संगोळे ही 8 वर्षाची मुलगी मृत्युमुखी पडली. तर शांताबाई सोनवणे (वय 60) व सारंगधर विश्वनाथ सोनवणे (वय 65) हे दोघे जखमी होते. तालुक्यातील ढासला येथे मंगळवारी सायंकाळपासून … Read more

खेळत असताना गच्चीवरून पडून चिमुकलीचा मृत्यू

child death

औरंगाबाद | दीड वर्षीय चिमुकली गच्चीवर खेळत असताना तोल जाऊन खाली पडली असता गंभीर जखमी झाल्यामुळे तिला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  ही घटना 11 जुलै रोजी सायंकाळी गारखेडा परिसरातील विजयनगर येथे घडली. श्रेया आकाश ढगे राहणार विजय नगर गारखेडा परिसराचे चिमुकलीचे नाव आहे. श्रेया गच्चीवर खेळत होती, त्यावेळी अचानकपणे तिचा तोल गेला … Read more

पुंडलिक नगरात 20 वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Suside at Home

औरंगाबाद | आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पुंडलीकनगर भागातील हनुमान नगर येथे बेडरूम मध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेत एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही. पूजा अमोल त्रिभुवन वय-20 वर्षे (रा.गल्ली क्र-3 हनुमाननगर, पुंडलिकनगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दुपारपर्यंत मिळालेली अधिक माहिती अशी की, नित्य … Read more