Wednesday, February 1, 2023

‘मी विष घेत आहे तुम्ही सर्व चांगले रहा’ असा व्हिडिओ वर्गमित्राला टाकून तरुणाची आत्महत्या

- Advertisement -

औरंगाबाद | एका पंचवीस वर्षीय तरुणाने आपल्या वर्गमित्रांना मोबाईलद्वारे ‘मी विष घेत आहे’ असे कळवून आत्महत्या केली आहे. आता मी विष घेवुन मरणार आहे तर तुम्ही चांगले रहा हा संदेश त्यानी विष घेण्यापूर्वी आपल्या वर्गमित्रांना दिला. आजाराला कंटाळून तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी, थेरगाव (ता.पैठण) येथे घडली.

हमीद अन्सार शेख (रा. रांजणगाव दांडगा, थेरगाव ता. पैठण) असे मृताचे नाव आहे. हा विवाहित होता बऱ्याच दिवसापासून थेरगाव येथे तो शिंपीचे काम करीत होता. मानसिक आजारामुळे तो खूप दिवसापासून तो त्रासात होता. त्याने कुणालाही न सांगता ईदच्या दिवशी नमाज केल्यानंतर दारूच्या अड्ड्यावर गेला दारूची बाटली घेऊन मद्यप्राशन करून विषारी द्रव्य घेतले. त्यानंतर मी विष घेतले आहे आता मी मरणार आहे तुम्ही सगळ्यांनी चांगले राहा असा व्हिडिओ काढून वर्गमित्राला टाकला आणि रस्त्याने जात असतांना एका रस्त्याच्या कडेला बेशुद्ध पडला.

- Advertisement -

थेरगावच्या ग्रामस्थांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासून यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आणि घाटी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या हाती देण्यात आला आणि सायंकाळी रांजणगाव येथे हमीदला दफन करण्यात आले. पाचोड पोलीसांनी पंचनामा करून हमीदचा मृत्यू आकस्मिक असल्याचे सांगितले आहे. त्याच्या पश्र्च्यात आई, वडिल, भाऊ, पत्नी, तीन लहान मुले असा परिवार आहे.