लाॅकडाउन 3.0 : सोने चांदीच्या किंमतींत मोठी उलाढाल; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजपासून देशात लाॅकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या दोन टप्प्यात सोन्या-चांदीच्या किंमतींनी आकाशाला स्पर्श केलेला होता.देशात कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण लोकांची संख्या ४२,५३३ आहे तर मृतांचा आकडा हा १,३७३ वर पोहोचला आहे.सरकारने सध्या सुरु असलेला हा लॉकडाऊन १७ मे पर्यंत वाढवला ​​आहे. सोमवारी, मेच्या पहिल्या व्यापाराच्या दिवशी सराफा बाजारात … Read more

सोनं झालं स्वस्त; सलग दुसऱ्या दिवशी दरात घसरण

मुंबई । अक्षय्य तृतीयेला वधारलेल्या सोन्यामध्ये नफेखोरी झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी कमाॅडिटी बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून सोनं ४६ हजारांखाली आले आहे. सोन्याचा भाव ४०१ रुपयांनी कमी झाला. मल्टी कमाॅडिटी एक्सचेंजमध्ये (MCX)सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅमला ४५७९० रुपयांपर्यंत खाली आला आहे.चांदीच्या दरात सुद्धा घसरण झाली आहे. देशात … Read more

Akshay Tritiya 2020 | लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन सोने कसे खरेदी करायचे? जाणून घ्या

नवी दिल्ली । आज साडेतीन मुहूर्तापैकी असणारा अक्षय तृतीया सण आहे. बरेच लोक आज सोन्याची खरेदी करणयासाठी शुभमुहूर्त मानतात. तसेच काहीजण गुंतवणूकीच्या कारणास्तव सोने खरेदी करतात. सोने अजूनही 46,500 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करीत आहे. शुक्रवारी (24 एप्रिल) सोन्याचे वायदे 0.7 टक्क्यांनी किंवा 78 रुपयांनी वाढून 46,505 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. मागील दोन सत्रांमध्ये सोन्याच्या … Read more

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ; जाणून घ्या सोन्याचे नवीन दर

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शनिवारी दिल्ली सराफ बाजारामध्ये 10 ग्रॅम सोन्याच्या किंमतीत 277 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही वाढल्या आहेत. 1 किलो चांदीच्या किंमतीत 483 रुपयांची वाढ झालीय आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प सादर केला.

अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने गाठणार ४५ हजाराचा टप्पा

अमेरिका आणि इराणमधील युध्दजन्य संकेतांमुळे सर्वात मोठा परिणाम शेअर बाजार आणि सोनेदरावर झाला आहे. युध्दाच्या भीतीने गुंतवणुकीची सुरक्षितता तपासली जाते आहे आणि साहजिकच सोने हा एकमेव पर्याय समोर आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी पहिली पसंती सोने खरेदीला दिली असल्याने आज ४१,००० पार करणारा सोनेदर यापुढेही चढता आलेखच ठेवणार असून तो ४५,००० पर्यंत पोहोचणार आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी ‘सुवर्ण संधी’!

दसऱ्याचा मुहूर्त साधल्यानंतर आता धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी लोकांची पुन्हा एकदा सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होणार आहे. दिवाळीच्या आधीच सोने खरेदी करणाऱ्यांना एक गोड बातमी मिळाली आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने नागरिकांना सोने खरेदी करता येऊ शकणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्याच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. दिल्लीत सोन्याच्या दरात ३० रुपयांची किरकोळ घसरण झाल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

विजयादशमीच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव वधारले

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याची मागणी वाढल्यामुळे दरातही थोडी वाढ झाली आहे. पण गेल्या दहा वर्षांतला सोन्याचा चढता भाव बघता या वर्षभरात झालेली दरवाढ विक्रमी आहे. सराफा बाजारात आजचा सोन्याचा भाव प्रति तोळा ३९३०० (वस्तू व सेवा कर सहित )आहे. कालच्यापेक्षा हा दर वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे दर १ हजार ५०३ डॉलर प्रतिऔंस झाले तर चांदीचा दर १७.४७ डॉलर प्रति औंस आहे.