आमदार गोपीचंदांचे पडळकरवाडीत गुढी उभारून स्वागत

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे गोपीचंद पडळकर यांची विधान परिषदेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्याने आनंदाचे प्रतिक म्हणून आटपाडी तालुक्यातील पडळकर कार्यकर्त्यानी घरासमोर गुढी उभाकरून सध्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही जल्लोष न करता पडळकरवाडी येथे घराणसोम गुढी उभारत आमदार गोपीचंद पडळकर यांचे स्वागत केले. भाजपमधून गोपीचंद पडळकर विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाल्याने … Read more

पक्षाच्या ‘त्या’ नियमाला पडळकर अपवाद का? खडसेंनाचा चंद्रकांतदादांना परखड सवाल

जळगाव । विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं तिकीट नाकारल्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांची नाराजी उफाळून आली आहे. आपल्याला तिकीट नाकारण्यामागे राज्यातील भाजप नैतृत्वाचा हात असल्याचा थेट आरोप खडसे यांनी करत राज्यातील नेत्यांना धारेवर धरले होते. त्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर देत “विधानसभेचं तिकीट दिल्यानंतर विधान परिषदेचं देत नाहीत, हा पक्षाचा नियम आहे. पंकजा … Read more

पडळकरांची लढाई ही स्वत:च्या आमदारकीच्या सर्टिफिकेटसाठी होती, धनगर समाजासाठी नव्हती!

सांगली । भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्यापुर्वी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण लागू करण्यासाठी जाहीर आश्वासने दिली होती. नंतरच्या काळात ती पुर्ण न केल्यामुळे फडणवीस यांच्या विरोधात समाजात असंतोष तयार झाला होता. तो कमी करण्यासाठी फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना ‘आरक्षण आंदोलन’ उभे करायला लावून आपला कार्यभाग साधला. पडळकरांना वंचित आघाडीत पाठवून पुन्हा … Read more

गोपीचंद पडळकरांच्या उमेदवारीने सांगली भाजपात नाराजी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून चारजणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्ह्यातील व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकरांचा समावेश आहे. विधानपरिषदेसाठी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे आणि निता केळकर, दीपकबाबा शिंदे हे निष्ठावंत इच्छुक होते. यंदा निष्ठावंतांना संधी मिळेल याची खात्री असताना पक्षाकडून तिघांनाही डावलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात बंड करीत … Read more

बारामती : राष्ट्रवादीत खळबळ ; अजित पवारांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही करणाऱ्याने केला पडळकरांचा सत्कार

पुणे प्रतिनिधी | बारामती विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा सतीश काकडे यांनी सत्कार केला आहे. त्यांनी पडळकरांचा सत्कार केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. सतीश काकडे यांनी अजित पवारांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सही केली आहे. काकडे आणि पवार कुटुंबात जुना राजकीय संघर्ष आहे. १९६७ सालापासून हा संघर्ष अविरत सुरु … Read more

बारामतीतून पडळकरांच्या उमेदवारीचे मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

मुंबई प्रतिनिधी | वंचितला सोडचिठ्ठी दिलेले धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडलकरांना बारामतीतून मैदानात उतरवण्याचे संकेत दिले आहेत. गोपीचंद पडळकर वाघ आहेत. त्यांनी जंगलाचा राजा असल्या सारखे राहिले पाहिजे. गोपीचंद पडळकरांनी बारामतीतून विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे … Read more

भाजपचे सोशल इंजिनीअरिंग : अजित पवारांविरुद्ध गोपीचंद पडळकर भाजपचे उमेदवार

पुणे प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर धनगर समाजाचे असल्याने बारामतीत असणारा बहुसंख्य धनगर समाज पडळकरांच्या बाजूने जाईल असे बोलले जाते आहे. त्यामुळे अजित पवारांसाठी पडळकर हे काटे की टक्कर ठरणार हे मात्र निश्चित . वंचित आघाडीचा हात पकडून राजकारणात … Read more

धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा वंचितच्या सर्व पदांचा राजीनामा

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडी मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सांगली मध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. तसेच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर हे निष्कलंक आणि चारित्र्यवान नेते असल्याचंही जाता जाता त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान गोपीचंद पडळकर यांच्या राजीनाम्यामुळे … Read more

गोपीचंद पडळकरांचा येत्या दोन दिवसात भाजप प्रवेश

सांगली प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची चिन्हं आहेत. सांगली लोकसभा निवडणुकीत वंचितकडून उभे राहिलेले उमेदवार गोपीचंद पडळकर हे स्वगृही परतणार असल्याची माहिती आहे. येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून गोपीचंद पडळकर भाजपचं कमळ हाती घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित … Read more

गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपच्या वाटेवर ; वंचितच्या अडचणी वाढल्या

सांगली प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील कंबर कसली आहे . पण लोकसभा निवडणुकीत वंचितकडून सर्वाधिक मतं घेतलेल्या गोपीचंद पडळकर वंचितपासून काहीसे अलिप्त झाल्याची चर्चा आहे. पडळकर भाजपमध्ये जातील, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र आहे . युती … Read more