कामगार कायद्यात बदल करणे ही कामगारांची चेष्टा

भारतीय कामगार कायद्यांना गंभीर बदलाची  आवश्यकता आहे. पण सुधारणेच्या सबबीखाली सरकारकडून करण्यात आलेल्या अध्यादेशाच्या घोषणा म्हणजे संपूर्णपणे कामगारांवरील प्राणघातक  हल्ल्यांना मुक्तपणे सोडून देणे. त्यांचे कामाचे तास वाढविणे म्हणजे अक्षरशः त्यांचे शरीर, स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा तोडणे होय.

जनतेच्या डोळ्यांत धूळ टाकून त्यांनाच शहाणपणा शिकवणारं; निष्क्रिय आणि भ्रामक – नरेंद्र मोदी सरकार

नोकरी, अन्न आणि वाहतूक सेवांच्या अनुपस्थितीत कंटाळलेले आणि तरीही मजबूत धीर उराशी बाळगलेले हे कामगार, ज्यांनी एकेकाळी अर्थव्यवस्थेला शक्ती दिली आहे, त्यांचा घरी परतण्याचा हजारो किलोमीटरचा खडतर प्रवास पायी आणि सायकलवरून सुरुच आहे. पालक त्यांच्या मुलांना सोबत घेऊन, सामान आणि शिल्लक असेल ते डोक्यावर घेऊन ओढत आहेत. आजारी आणि जखमी होईपर्यंत, जितके सहन करू शकता येईल तितके ते सहन करत ते पुढे चालले आहेत.

सरकार दारुशिवाय चालणार नाही??; दारु बदनाम होण्याच्या काळातील काही निरीक्षणं

मागील १० दिवसांपासून दारु समर्थक विरुद्ध दारु विरोधक अशी लढाई सुरु आहे. लोक दारुशिवाय जगू शकतात, पण सरकार नाही असं काहीसं उपहासाने देखील म्हणण्यात आलं. दारु बदनाम होण्याच्या काळात त्याच्या उपायुक्ततेची, त्याच्याशी निगडीत भावनांची क्रोनॉलोजी समजून सांगण्याचं काम लोकमित्र संजय सोनटक्के यांनी त्यांच्या निरीक्षणातून केलेलं आहे. पटलं तर घ्या..!! या न्यायाने वाचकांपर्यंत त्यांच्या भावना पोहचवत आहोत.

सिमांचल एक्सस्प्रेस रुळावरून घसरल्याने ६ ठार, १० गंभीर.

Railway Incident

बिहार | बिहार येथे आज सकाळी सिमांचाल एक्सप्रेस या दिल्लीवरुन आलेल्या रेल्वेगाडीचे ९ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ६ जण मृत्युमुखी तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाला तेव्हा गाडी तिच्या सर्वाधिक वेगात असल्याचं सांगितलं जात आहे. डॉक्टरांचं एक पथक तातडीने या ठिकाणी पाठवलं गेलं असून रेल्वे प्रशासन ही तातडीने मदतीसाठी दाखल झालं … Read more