अतिवृष्टीने शेतकरी देशोधडीला, उभ्या सोयाबीन पिकावर फिरविला ट्रॅक्टर

अतिवृष्टीमुळे शेतकरी पुरता देशोधडीला लागला आहे. कर्जबाजारी होत, बैलजोडी विकून शेतकऱ्यांनी शेती केली. मात्र पावसामुळे पीक मातीमोल झाले. त्यामुळे अतिवृष्टीने ओढवलेल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने काळजावर दगड ठेवत खराब झालेल्या उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविला आहे.

राज्यात पुढील ४८ तासांत ‘मुसळधार पाऊस’; हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

राज्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बुधवारी रात्रीही पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या काही भागातही जोरदार वादळी पाऊस होऊ शकतो. राज्यात २७ ऑक्टोबरपर्यत पाऊस राहणार असून बंगाल आणि अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस स्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.

यवतमाळमध्ये वीज पडून युवकाचा मृत्यू ; प्रत्यक्ष मृत्यू पाहिल्याने कुटुंबीयांची कालवाकालव

शहादत खान हा आंब्याच्या झाडाखाली थांबला. तर त्याचे वडील आणि इतर कुटुंबीय जवळील झोपडीच्या आडोशाला. विजेचे रुद्र रूप पाहून त्याच्या वडिलांनी आणि भावंडांनी शहादतला हाकाही मारल्या होत्या. परंतु तेवढ्यातच शहादतच्या अंगावर अचानक वीज कोसळली आणि त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

नाशिक शहरात जोरदार पाऊस, रेल्वे सेवा ठप्प

नाशिक प्रतिनिधी। नाशिक जिल्ह्यात जोरदार व मुसळधार पाऊस पडत असल्यान नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या आस्वली गावाजवळील रेल्वे पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळ सर्व गाड्या इगतपुरी ते आसनगाव व वाशिंद स्थानकात थांबवण्यात आल्यात. त्यामुळं इगतपुरी ते नाशिक रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. दुपारी तीन वाजेनंतर शहरासह उपनगरीय भागांमध्ये ढग दाटून आल्याने … Read more