प्रा. राजन शिंदे खुन प्रकरण: मारेकरी ताब्यात, मात्र अजुनही अनेक प्रश्न अनुत्तरित

Murder

औरंगाबाद – शहरातील उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या प्रा. राजन शिंदे यांचा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता. परंतु, घरातून एकही वस्तू चोरीला गेली नाही आणि कुटुंबातील इतर सदस्यांनाही धक्का लागला नाही. या परिस्थितीवरून पोलिसांना एक वेगळाच अँगल मिळाला. यानंतर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. प्रा. राजन शिंदे यांचे शहरात मोठे … Read more

पुरवणी परीक्षा: औरंगाबाद विभागात दहावी-बारावीचे ‘इतके’ विद्यार्थी उत्तीर्ण

औरंगाबाद – दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला. ज्या विद्यार्थ्यांना निकालांवर आक्षेप होता त्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून फेर परीक्षा घेण्यात आली होती. यात औरंगाबाद विभागातून दहावीत 31.64 टक्के तर बारावीत 36 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी 607 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 500 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून मात्र 180 … Read more

येत्या २०२३ पर्यंत औरंगाबाद ते मनमाडचे विद्युतीकरण पूर्ण करणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे

औरंगाबाद – येत्या २०२३ पर्यंत औरंगाबाद ते मनमाड रेल्वेची इलेक्ट्रिक लाईन पूर्ण करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाच्या दिवशी मागणी केलेल्या औरंगाबाद अहमदनगर, औरंगाबाद पुणे रेल्वे लाईन बाबत प्रस्ताव आला असून लवकरच त्यावर निर्णय घेतला जाईल असे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले. नांदेड रेल्वे डिव्हिजनची बुधवार (२०) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात … Read more

…अन खासदार जलील भर बैठकीत रेल्वेच्या अधिकाऱ्यांवर भडकले

Imtyaj jalil

औरंगाबाद – तब्बल दोन दशकानंतर औरंगाबादेत रेल्वेचा प्रलंबित प्रश्नांनावर आज बैठक झाली. या बैठकीत मराठवाड्याने मागणी केलेल्या नव्या रेल्वे लाईनवर सर्वेक्षणात फायदा मिळणार नसल्याचे रेल्वेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगताच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील रेल्वे प्रश्नांवरील बैठकीत चांगलेच भडकले. आधीच मागास भाग त्यात नवीन रेल्वे येणार नसल्यास या भागाचा विकास कसा होईल, असा संतापजनक सवाल खा. जलील … Read more

दीड वर्षानंतर महाविद्यालये अनलॉक; पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

औरंगाबाद – कोरोना वर लोक डाऊन मुळे विस्कळीत झालेले जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना मागील दीड वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमाची बंद असलेली महाविद्यालयांची द्वारे अखेर आज उघडली. यामुळे सर्वत्र विद्यार्थ्यांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. महाविद्यालयात 50 टक्के क्षमतेने वर्ग भरविण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन पद्धत वापरण्यात आली. काही महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन … Read more

संतापजनक ! शेतवस्तीवर दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन महिलांवर सामुहिक बलात्कार

crime

औरंगाबाद – जिल्ह्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर बुधवारी मध्यरात्रीतून दरोडेखोरांनी धुमाकूळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरोडेखोरांनी या वस्तीची केवळ लूटच केली नाही तर दोन महिलांवर बलात्कार केल्याचीही माहिती हाती आली आहे. या घटनेमुळे औरंगाबादमधील पैठण तालुक्यासह संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्याला हादरला आहे. जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडाळी गावातील शेतवस्तीवर घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे अवघ्या गावात दहशत पसरली … Read more

इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी ऑरिक सिटीमध्ये गुंतवणूक करावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Sunil chavhan

औरंगाबाद – औरंगाबाद परिसरात उद्योगाला पुरक पायाभुत सुविधा उपलब्ध असल्याने येथे अनेक उद्योग भरभराटीला आलेले आहेत. सध्या बाजारात इलेक्ट्रीकल वाहनांना मोठी मागणी असल्याने ऑरीक सिटी मध्ये इलेक्ट्रीकल वाहन निर्मिती करणाऱ्या उद्योगांनी गुंतवणुक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले. हॉटेल ताज येथे तैवान मधील तयत्रा या संस्थेच्या पुढाकारातुन आयोजित एका सेमिनारमध्ये जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी तयात्राचे संचालक … Read more

रेल्वे प्रश्नांवर औरंगाबादेत आज पहिल्यांदाच ‘मंथन’; रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सुटणार का ?

औरंगाबाद – मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांवर आतापर्यंत नांदेड येथे बैठक घेण्यात येत होती. परंतु आता पहिल्यांदाच औरंगाबादेत आज लोकनेत्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय राज्यअर्थमंत्री भागवत कराड, रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितील रेल्वे प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे. या चर्चेतून औरंगाबादला काय मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यतः आज होणाऱ्या बैठकीत … Read more

रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

औरंगाबाद – शहरातील सिडको बसस्टँड ते हर्सुल टी पॉइंटच्या रस्त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली. पाहणी दरम्यान रस्त्याची कामे दर्जेदार करण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रस्त्यावरील खड्डे, रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना असलेले खड्डे तत्काळ बुजवावेत. त्याचबरोबर रस्त्यांची व्यवस्थित रोलिंग करून घ्यावी. मोठ्या खड्ड्यांमध्ये खडीचा वापर करण्यात … Read more

‘त्या’ प्रकरणात सात दिवसांत चौकशी करून अहवाल सादर करा; राज्य महिला आयोगाचे विद्यापीठाला पत्र

bAMU

औरंगाबाद – मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनात पदव्युत्तर विभागाच्या सहाय्यक कुलसचिव हेमलता ठाकरे गेल्या २ महिन्यांपासून बसण्याची व्यवस्था न केल्याने जमिनीवर बसूनच कामकाज करत आहेत. यासोबतच वारंवार एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली करणे, काम करत असतांना दबाव आणणे या गोष्टीही त्यांच्यासोबत करण्यात आल्या. परीक्षा विभागात सुरू असलेल्या काही अनधिकृत … Read more