बलात्काराचा आरोप असणाऱ्या शेख मेहबूब यांच्यासोबत जिल्हाभर फिरले मंत्री जयंत पाटील

ncp

अरंगाबाद – बलात्काराचा आरोप असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. औरंगाबाद हायकोर्टाने बी समरी अहवाल फेटाळून लावत या प्रकरणात पुन्हा तपास करण्याचे आदेश पोलीसांना दिले आहेत. पोलीस तपासाबाबत न्यायालयाने शंका व्यक्त केल्यानंतर शेख मेहबुब यांच्या अडचणीत वाढ झालेली असतानाच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील … Read more

अतिमुसळधार पावसाने घाटी रुग्णालयाला आले तळ्याचे स्वरूप; परिसरातील स्वच्छता मात्र व्हेंटिलेटरवर

ghati

औरंगाबाद – शहरातील घाटी रुग्णालय आणि परिसरात शनिवारी पहाटे झालेल्या धुवाँधार पावसात पाणीच-पाणी साचले होते. रुग्णालयातील डिन बांगला, ॲम्ब्युलन्स पार्किंग परिसरात पाणीच पाणी झाले होते. त्या बाहेर कशा काढाव्यात, अत्यावश्यक रुग्णांना कशी सेवा पुरवावी अशी पंचायत ॲम्ब्युलन्स चालकांची झाली होती. गुडघ्या इतक्या पाण्यातून जाऊन चालकांनी त्या बाहेर काढल्या. याच ठिकाणी महात्मा फुले जीवनदायी योजनेचे कार्यालयही … Read more

औरंगाबाद- जळगावचा संपर्क तुटला; तिडका नदीला पूर

औरंगाबाद – शुक्रवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने औरंगाबाद जिल्ह्यात चांगलेच थैमान घातले आहे. जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे सोयगाव तालुक्यातील तिडका नदीला तुफान पूर आला आहे. मध्यरात्रीतून पावसाचे चांगलाच जोर पकडल्यामुळे सोयगावात अनेक ठिकाणी पूराचे पाणी शिरले आहे. औरंगाबादमध्ये शनिवारी पहाटेपासून सुरू असलेल्या पावसाने सोयगावात पूर आला आहे. या पुरामुळे सोयगाव मार्गे पाचोरा जोडणारा राज्यमार्ग बंद … Read more

शहरात दोन दिवस महोत्सवी वातावरण, विविध लाइव्ह कार्यक्रमांची मेजवानी

aurangabad

औरंगाबाद – ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्यासाठी स्मार्ट सिटी औरंगाबाद आणि औरंगाबाद महानगरपालिका यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. काल कॅनॉट परिसरात सकाळी 7 ते 9 यावेळेत झुंबा त्याबरोबरच दिवसभरात कला कार्यशाळा, खेळ आणि फिटनेस कार्यशाळा, स्वसंरक्षण कार्यशाळा, लाईव्ह म्युझिक हे कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमांना सर्वच वर्गातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाच्या … Read more

तीन तलाक प्रकरणात फक्त पतीवर गुन्हा दाखल होऊ शकतो; खंडपीठाचा महत्वपूर्ण निकाल

Aurangabad Beatch mumbai high court

औरंगाबाद – मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षण) कायदा 2019 अन्वये तलाक या शब्दाचा तोंडी, लेखी, इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही स्वरुपात उच्चार करुन घटस्फोट देण्याच्या प्रकरणात फक्त पतीवर गुन्हा दाखल होऊ शकतो. त्याच्या नातेवाईकांविरुद्ध नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. सुनावणीअंती न्यायमूर्ती सुनील पी. देशमुख आणि न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी यांच्या … Read more

औरंगाबादकरांची झोपमोड ! सकाळीच विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पाऊस

औरंगाबाद – गेल्या सोमवारपासून देशात राजस्थानमधुन परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रिवादळाने 27 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना झोडपून काढले. या चक्रिवादळाचा प्रवास नंतर उत्तर महाराष्ट्रात व गुजरात मार्गे अरबी समुद्रात गेल्याने या गुलाब चक्रिवादळाचे नामकरण शाहीन करण्यात आले. शाहीन चक्रिवादळ सध्या सक्रिय असुन ओमान च्या … Read more

जिल्ह्याला ‘गुलाबाचा’ तडाखा ! दोनच दिवसात तब्बल १४१ कोटीचे नुकसान

Heavy Rain

औरंगाबाद – दोन दिवसांपूर्वी गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीचा जिल्ह्याला चांगलाच तडाखा बसला आहे. जिल्ह्यात तब्बल 141 कोटी 46 लाख 48 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरात अडकलेल्या साडेपाचशेहून अधिक लोकांची मदत करून सुटका करण्यात आलेली आहे तर 260 लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. सध्या पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. अतिवृष्टीमुळे पावसाने मोठ्या प्रमाणावर … Read more

आंबेडकरी संघटनांचा विद्यापीठात भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात ‘हल्लाबोल’

andolan

औरंगाबाद – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भ्रष्टाचार तसेच कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले होते आंबेडकरी संघटना तसेच विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले असून आज येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर आंदोलकांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीचे गेट खोलण्यासाठी आंदोलकांनी राडा घातल्याचेही पाहायाला मिळाले. औरंगाबादमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ … Read more

महापालिकेला पुर नियंत्रणासाठी मिळणार 14 कोटी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात मागील महिनाभरात दोन वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहराच्या अनेक भागात नागरिकांच्या घरात तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याअनुषंगाने विविध कामे करण्यासाठी महापालिकेला 14 कोटी 85 लाख 3 हजार 804 रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी … Read more

शहर आणि परिसरात पुन्हा एकदा वीजांच्या कडकडाटासह बरसल्या सरी

Heavy Rain

औरंगाबाद – दोन दिवसांपासून औरंगाबाद शहर आणि परिसरात पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. मात्र आज 01 ऑक्टोबर रोजी दुपारपासून पुन्हा एकदा चार वाजता वीजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. औरंगाबद शहरासह दौलताबाद, खुलताबाद, पैठण, कन्नड भागात काही ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील जनजीवन पुन्हा एकदा विस्कळीत झाले होते. दरम्यान पुढील तीन दिवस म्हणजे 04 … Read more