‘अ’ स्मार्ट मनपा प्रशासनामुळे शहरात वाहतुकीचे तीन तेरा

traffic

औरंगाबाद/ नवनीत तापडिया – आशिया खंडात सर्वात झपाट्याने वाढलेले शहर असे नावलौकिक मिळविलेल्या औरंगाबाद शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होत चालली आहे. दिवसेंदिवस शहरातील रस्त्यांवरील वाहनांची संख्या वाढतच चालली आहे. त्यामुळे निश्चितच प्रशासनावरील ताण आणि काम देखील वाढले आहे परंतु काळाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी अजूनही स्थानिक मनपा प्रशासन दाखवत नसल्याने शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या … Read more

आजच्या शिक्षण व्यवस्थेच्या चक्रव्यूहात अडकलेला विद्यार्थ्याला बाहेर काढणारा ‘अभिमन्यू शिक्षक’ मिळेल का ?

teachers day

औरंगाबाद/ प्राची नाईक उंडणगावकर – “गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः” गुरू म्हणजे साक्षात ब्रम्ह, गुरू म्हणजे विष्णु, गुरू म्हणजेच महादेव आणि गुरु म्हणजेच साक्षात परब्रह्म. कारण एकमेव गुरु असतो जो आपल्याला अंधारातून प्रकाश मार्गाकडे जाण्याचा रस्ता दाखवत असतो. म्हणूनच गुरूला सर्वशक्तिमान अशी उपाधी मिळाली आहे. आज 5 सप्टेंबर म्हणजेच … Read more

आमची भाषा सामंजस्याची राहील – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

Jayant patil

औरंगाबाद – मधल्या काळात राजू शेट्टी यांनीच मला विधान परिषदेच्या जागेचे महत्त्व नसल्याचे सांगितले होते, असा उपरोधिक टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राजू शेट्टी यांना लगावला. राजू शेट्टी यांनी ‘करेक्ट कार्यक्रम करणार’ असल्याचा इशारा दिल्याच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. नुकसानग्रस्त भागाची पाहणी झाल्यावर पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना पाटील यांनी हे विधान केले. तसेच आगामी … Read more

अतिवृष्टीग्रस्त भागात मोटरसायकलीवरून जात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली पाहणी

jayant patil

औरंगाबाद – अतिवृष्टीमुळे कन्नड तालुक्यातील फुटलेले भिलदरी धरण व परिसरातील अतिवृष्टीग्रस्त नागद व सायगव्हाण या गावांची जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी काल पहाणी केली. कन्नड तालुक्यात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील भिलदरी हे धरण फुटल्याने परिसरातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. तर नागद व सायगव्हाण या गावाला … Read more

गेल्या ५ वर्षात तीन हजार कोटी मिळूनही शहराचा विकास दिसत का नाही ? लोकप्रतिनिधींचाच सवाल

औरंगाबाद – शहरासाठी वेळोवेळी कोट्यवधी रुपयांचा निधी आल्याची घोषणा होते. मागील ५ वर्षांत तब्बल ३ हजार कोटी रुपये मिळाले तरीही मूलभूत प्रश्न कायम आहेत. विकास का दिसत नाही, असा सवाल खुद्द लोकप्रतिनिधींनी काल स्मार्ट सिटी आढावा बैठकीत केला. मुख्यमंत्र्यांकडे आता पुन्हा ७८२ कोटी रुपयांची मागणी होत आहे. तो निधी सायकल ट्रॅकपेक्षा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी वापरावा, … Read more

शिक्षकदिनी २८ शिक्षकांचा होणार सन्मान; जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

teachers day

औरंगाबाद – जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक दिनी आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. त्यानिमित्त २८ शिक्षकांचा आज ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी हॉलमध्ये सन्मान करण्यात येणार आहे. जि. प. अध्यक्षा मीना शेळके, शिक्षण सभापती अविनाश गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या … Read more

शहरात लवकरच होणार ऑक्सिजन निर्मिती; मेल्ट्रॉन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन प्लांटचे साहित्य दाखल

oxygen plant

औरंगाबाद – महापालिकेतर्फे शहरात चालवल्या जाणाऱ्या मेल्ट्रॉन कोव्हिड केअर सेंटरसाठी उभारल्या जाणाऱ्या लिक्विड ऑक्सिजन सेंटरच्या कामाला गती मिळाली आहे. मागील वर्षीच या द्रवरुप ऑक्सिजन प्लांटला मंजूरी मिळाली होती. शुक्रवारी यासंबंधीचे साहित्य रुग्णालय परिसरात दाखल झाले. आता हा प्लांट उभारण्याचे काम सुरु झाले असून लवकरच तो कार्यान्वित केला जाईल. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने शहरात ऑक्सिजन कमी … Read more

शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे ! भर दिवसा आमदाराच्या चालकाला भर चौकात टोळक्याची मारहाण

marhan]

औरंगाबाद – शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या सेवन हिल उड्डाणपुलाखाली भीक मागणाऱ्या एका टोळक्याने शिवसेना आमदाराच्या गाडीवर चालक असलेल्या राजू दाभाडे (रा. पीर बाजार, मिलिंद नगर) यांच्यासह त्यांच्या पत्नीला मारहाण केली. अनपेक्षितपणे टोळक्याने केलेल्या हल्ल्यानंतर उपस्थित जमावाने टोळक्याला बेदम चोप दिल्याची घटना काल दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. भर दुपारी झालेल्या या मारहाणीमुळे शहरात कायदा व्यवस्था … Read more

भीक मागण्यासाठी मुलांची विक्री; औरंगाबाद पोलिसांनी संशयित महिलेला घेतले ताब्यात

औरंगाबाद – शहरातील सिग्नलवर भीक मागण्यासाठी दोन लहान मुलांना दोन महिला अमानुष मारहाण करत असल्याचा चिमुकल्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर औरंगाबाद पोलीस आता सक्रिय झाले आहेत. त्यांनी देऊळगाव मही येथून एका संशयित महिलेस 4 सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले आहे. देऊळगाव मही येथील दिग्रस रोड वरील एका महिलेस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अखिल काजी व राजू … Read more

बनावट चावी बनवून मित्राच्या मेडिकलमध्ये मित्रानेच केली चोरी; रोख लंपास

chori

औरंगाबाद – मेडिकलची बनावट चावी बनवून मित्राने आपल्या मित्राच्या मेडिकलमध्ये चोरी करून महागडे इंजेक्शन , औषधी रोख असा सुमारे ३० हजाराचा ऐवज चोरी केल्याची घटना आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास समर्थनगर भागात समोर आली. चोरी करताना आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यामुळे मित्रानेच आपल्या मित्राचा घात केल्याची चर्चा परिसरात सुरु होती. याप्रकरणी आधी माहिती … Read more