येत्या 15 दिवसांत तालुक्यात 100 टक्के लसीकरण; राज्यमंत्री अब्दुल सत्तारांचा निर्धार

sattar

औरंगाबाद – कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय आहे. लस घेतल्या शिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने लस घ्यावी असे अवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लसीकरण अभियान उदघाटन प्रसंगी केले. आपल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याने कोणीही लसीकरण पासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला … Read more

मनपाने ‘इतक्या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांना केले कामावरून कमी

aurangabad mahanagar

औरंगाबाद – महानगरपालिका प्रशासनाने कोरोना च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत तब्बल 750 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घेतले होते. या कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा 31 ऑगस्टपासून थांबवण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यानुसार काल रात्री उशिरा मनपा प्रशासन यांनी तब्बल 614 कंत्राटी कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना च्या दुसऱ्या लाटेत इतक्या मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कर्मचारी नेमले … Read more

वाळुज पर्यंत जाणार औरंगाबाद मनपा ची हद्द; सिडको प्रशासनाकडून अहवाल तयार करण्याचे काम सुरु

aurangabad

औरंगाबाद – औरंगाबाद महानगरपालिकेची हद्द वाळुज पर्यंत वाढवण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून जोर धरत होती. आता या प्रक्रियेला गती प्राप्त झाली असून सिडको प्रशासनाकडून प्राथमिक अहवाल तयार करण्यात येत आहे. हस्तांतरणापूर्वी विविध शासकीय कार्यालयाच्या प्रमुखांची एक समिती स्थापन करण्यात येणार असून समितीच्या अंतिम अहवालावरून हस्तांतरणाची प्रक्रिया राज्य शासनाच्या आदेशानुसार होणार असल्याची माहिती सूत्रांनी … Read more

नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शासनास अहवाल सादर करा; राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

sattar

औरंगाबाद – मागिल दोन दिवसात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील कन्नड, सोयगाव तर जळगाव च्या चाळीसगाव तालुक्याला बसला आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली असून नुकसानीचे पंचनामे पूर्ण होताच नेमकी किती नुकसान … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

pahni

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील महसूल मंडळापैकी 7 मंडळात अतिवृष्टी झाली.अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांनी नागद, सायगव्हाण, भिलदरी येथील भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात मोठ्याप्रमाणात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली, नागरिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि घाटातील भूस्खलनामुळे उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 31 … Read more

औरंगाबादेत आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा होणार शिक्षक दिन

teachers day

औरंगाबाद – शिक्षण क्षेत्रांमध्ये मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी संपुर्ण देशामध्ये दरवर्षी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. या दिनानिमित्त 2020-21 मध्ये ‘थँक्स अ टिचर’ अभियान राबविले होते. यावर्षी देखील शिक्षकांचा गौरव करण्यासाठी ‘थँक्स अ टिचर’ अभियानाअंतर्गत शिक्षकांचे कार्य गौरव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक … Read more

शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चार जणांनी संपविले जीवन

suicide

औरंगाबाद – काल औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा, छावणी, मुकुंदवाडी तसेच वाळूज महानगर या भागात चार जणांनी विविध कारणांमुळे आत्महत्या करून आपले जीवन संपवण्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी छावणी आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भावसिंगपुऱ्यात रिक्षा चालकाची आत्महत्या – भाव्सिंग्पुरा भागातील प्रभात नगर येथील रिक्षाचालक रमेश वाकेकर (56) यांनी 30 ऑगस्ट रोजी रात्री … Read more

‘त्या’ खुनातील महिला आरोपी अटकेत

Murder

औरंगाबाद – शहरातील हनुमान नगरातील भरचौकात झालेल्या आकाश राजपूत हत्या प्रकरणात फरार झालेल्या आरोपी तरुणीला नेवासा येथून पुंडलिक नगर पोलिसांनी काल अटक केली आहे. सोनल पवार (23, रा. नेवासा) असे अटक केलेल्या तरुणीचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, शहरातील हनुमान नगरातील आकाश राजपूत (21, रा. अजिंक्य नगर, गारखेडा) या तरुणाची 8 ऑगस्टच्या मध्यरात्री … Read more

वैजापूरचे माजी आमदार आर. एम. वाणी यांचे निधन

औरंगाबाद – वैजापूरचे नगराध्यक्ष ते तीन वेळा आमदार राहिलेले आर. एम. वाणी यांचे दुखःद निधन झाले. वाणी यांनी महाराष्ट्र विधानसभेत असताना अनेक जनकल्यानाचे प्रश्न सभागृहात मांडले होते. माजी आमदार वाणी यांचे मंगळवारी मध्यरात्री अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांनी एक अभ्यासू पत्रकार संपादक अशी देखील आपली ओळख निर्माण केली होती. वाणी यांचे पार्थिव बुधवार सकाळी … Read more

मराठवाड्याला पावसाने झोडपले; औरंगाबाद, जालना, बीड, परभणीत सर्वदूर पाऊस

Aurangabad Rain

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस काळ रात्रीपासून धो-धो बरसत आहे. आज पहाटेच पावसाने संपूर्ण मराठवाड्याला झोडपून काढले यामुळे बळीराजा सुखावला असला तरी बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली … Read more