कुंकू लावण्यास आणि बांगड्या घालण्यास नकार म्हणजे विवाहास नकार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संस्कृतीत सुवासिनी स्त्रीच्या दागिन्यांना विशेष महत्व असल्याचे म्हंटले जाते. आता गुवाहाटी न्यायालयाने जर एखादी महिला बांगड्या घालण्यास आणि कुंकू लावण्यास नकार देत असेल तर याचा अर्थ त्या महिलेला विवाह मंजूर नाही असे म्हंटले आहे. न्यायमूर्ती अजय लांबा आणि सौमित्र सैकिया यांच्या खंडपीठासमोर एका घटस्फोटाच्या याचिकेवर सुनावणी सुरु असताना न्यायालयाने असे मत नोंदवले आहे. … Read more

गद्दारी लपून राहावी यासाठीच गोपीचंद पडळकरांकडून भडक वक्तव्ये: विक्रम ढोणे

बारामती| गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणप्रश्नी मॅनेज होवून, तसेच उच्च न्यायालयातील एफिडेव्हिटसंबंधी खोटी माहिती देवून समाजाशी गद्दारी केली आहे. त्या गद्दारीची चर्चा होवू नये म्हणून पडळकरांनी भडक वक्तव्ये सुरू केली आहेत, अशी टीका धनगर विवेक जाग्रती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. ते बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर आरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या व्होट बँक … Read more

वेळेवर चार्जशीट दाखल न केल्यास आरोपीला जामीन मिळणे हा त्याचा अधिकार – सर्वोच्च न्यायालय 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संक्रमणाला पाहता केंद्र सरकारने २४ मार्चपासून देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. सर्वोच्च न्यायालयाने याविषयी आता म्हंटले आहे की, आपत्काळाच्या घोषणेची तुलना आपत्काळाशी होऊ शकत नाही. तसेच जर ठरविलेल्या वेळेत चार्जशीट दाखल नाही केली तर जामीन मिळणे हा आरोपीचा अधिकार असल्याचे देखील न्यायालयाने सांगितले आहे. मद्रास उच्च न्यायालयाने जेव्हा वेळेत चार्जशीट दाखल … Read more

म्हणुन सर्वोच्च न्यायालयाने केले ठाकरे सरकारचे कौतुक

वृत्तसंस्था। एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्ताची दाखल घेत सर्वोच्च न्यायालयाने रुग्णांना मिळणाऱ्या उपचारासंबंधी सुनावणी घेतली आहे. दिल्लीमधील एका रुग्णालयात ढिसाळ कारभार सुरु असल्याचे एका वृत्तवाहिनीने निदर्शनास आणून दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीतील गंभीर परिस्थितीचे रुग्णालयांनी उत्तर दिले पाहिजे असे म्हंटले आहे. दिल्लीसोबत सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारलाही नोटीस बजावली आहे. मात्र मुंबईत दरदिवशी होणाऱ्या तपासण्यांचे कौतुकही त्यांनी … Read more

नीरव मोदींची १,४०० कोटींची मालमत्ता भारत सरकारच्या ताब्यात; संपत्तीत ‘या’ महागड्या वस्तू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याला कोर्टाने मोठा धक्का दिला आहे. कोर्टाने आता आदेश दिले आहेत की, नीरव मोदी याच्या सर्व मालमत्ता जप्त कराव्यात. नुकताच पीएमएलए कोर्टाने हा आदेश दिला आहे, जेथे नीरव मोदीविरूद्ध मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत खटला चालविला जात होता. कोर्टाच्या आदेशानंतर आता नीरव मोदींच्या सुमारे १४०० कोटींच्या मालमत्तेवर भारत … Read more

काही दिवसातच मल्ल्या जाणार गजाआड, भारतात आणण्यासाठीची कायदेशीर कारवाई झाली पूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर एअरलाइन्सचा संस्थापक विजय मल्ल्या याचे पुढील काही दिवसांत कधीही भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते. इंग्लिश बिझिनेस इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मल्ल्याच्या प्रत्यार्पणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. माजी खासदार आणि देशातील सर्वात मोठी दारू कंपनी असलेल्या युनायटेड ब्रुव्हरीजचा मालक मल्ल्या याने किंगफिशर एअरलाइन्स सुरू … Read more

मृत आईला उठवतानाचा चिमुकल्याच्या व्हिडिओ व्हायरल; उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुजफ्फरपूर रेल्वे स्थानकात एक मृत महिला आणि तिच्या लहान मुलाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पाटणा उच्च न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली आहे. सरन्यायाधीश संजय करोल आणि न्यायमूर्ती एस. कुमार यांच्या दोन सदस्यांच्या खंडपीठाने या व्हिडीओचे वेदनादायक असे वर्णन केले आहे. खंडपीठाने सांगितले की, ‘ही धक्कादायक बातमीही … Read more

दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला 

नागपूर प्रतिनिधी । दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला असल्याने त्यांना जामिनावर मुक्त करून हैद्राबादला घरी जाण्याची परवानगी द्यावी असा अर्ज त्यांनी केला होता.  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा अर्ज फेटाळला असून त्या परिसरातील संचारबंदी संपल्यानंतर तसेच तो परिसर कंटेन्मेंट झोनमधून मुक्त झाल्यानंतर तुम्ही पुन्हा जमीन … Read more

दारुवर कर आकारणार्‍या दिल्ली सरकारला उच्च न्यायालयाचा दणका !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये दारूची विक्री करण्यास केंद्र सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. याच दारूच्या एमआरपीवर ७०% अतिरिक्त कोरोना कर लादण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला होता. मात्र शुक्रवारी दिल्ली हायकोर्टाने हा अतिरिक्त कोरोना कर घेण्याचा आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी दिल्ली सरकारवर दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी केली. सरन्यायाधीश डी एन पटेल आणि … Read more

आपल्यांनीच दिला सरलारला दगा; २४५ रुपयांना चीन कडून खरेदी केलेले किट सरकारला दिले ६०० ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनने कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी दिलेल्या खराब रॅपिड अ‍ॅन्टीबॉडी टेस्ट किटसाठी दुप्पट पेमेंट घेतल्याचे आता उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड -१९ची चाचणी किट भारतीय डिस्ट्रिब्यूटर्स रिअर मेटॅबोलिक्स आणि आर्क फार्मास्युटिकल्सने सरकारला बर्‍याच जास्त किंमतीला विकल्या आहेत.डिस्ट्रिब्यूटर्स आणि आयात करणार्‍यांमधील कायदेशीर वाद हा दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला नसता तर त्याचा खुलासाही … Read more