सांगलीत संजय पाटील अडचणीत, उमेदवारास पक्षाच्याच आमदारांचा विरोध 

स्मिता पाटील, गोपीचंद पडाळकर आणि स्वाभिमानी शड्डू ठोकून तयार सांगली प्रतिनिधी | भाजप खासदार संजय पाटील यांच्या उमेदवारीस भाजपच्या सर्व आमदारांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पाटील यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाऊस पडल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हैराण झाले. या बैठकीला खासदार संजय पाटील यांच्यासह आमदार सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, … Read more

मराठवाड्यात लोकसभा उमेदवारांची कोंडी, काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवारच ठरेनात अन् सेना-भाजप निवांत

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली असली तरी पहिल्या दिवशी मराठवाड्यात एकाही प्रमुख उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. सर्वच पक्ष उमेदवारांची अंतिम चाचपणी करताना चाचपडताहेत अशीच स्थिती आहे. आयाराम- गयारामांमुळे संभ्रम अधिकच वाढला आहे. औरंगाबादेत होळीनंतरच प्रमुख पक्ष उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. चंद्रकांत खैरेंविरुद्ध आघाडीतर्फे कोण लढणार; हे … Read more

आणि राहुल गांधी तिला म्हटले मला फक्त राहुल म्हण, सर नको!

चेन्नई | राहुल गांधी हे निवडणुकीचा संग्राम सुरू होण्यापूर्वीच अनेक राज्यात दौरे करत आहेत. देशातील युवा बेरोजगारीच्या प्रश्नांवर ख़ास करून त्यांचे दौरे विशेष आहेत. राहुल गांधी हे आज तमिळनाडु राज्यातील चेन्नई येथील स्टेला मारिस कॉलेज आयोजित कार्यक्रमात एक ख़ास किस्सा घडला. राहुल गांधी आज या महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते त्या दरम्यान एक मूलगी प्रश्न … Read more

काँग्रेस प्रवेशाआधी शिवसेना आमदार दर्ग्यात

चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे शिवसेनेचे वरोऱ्याचे आमदार बाळू धानोरकर हे काँग्रेसमधील प्रवेशाआधी ‘अजमेर शरीफ दर्ग्या’त दर्शनासाठी गेले. काँग्रेस प्रवेशानंतर चंद्रपूर येथून तिकिट मिळावे यासाठी धानोरकरांनी अजमेर शरीफ दर्गा गाठला. त्यांनी दर्ग्यात चादर चढवली आणि आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी प्रार्थनाही केली. येत्या दोन दिवसांत धानोरकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. वरोरा विधानसभा मतदार संघातील शिवसेना आमदार … Read more

आम्हाला चार जागा देणारे तुम्ही कोण? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Untitled design

औरंगाबाद प्रतिनिधी | काँग्रेस आम्हाला चार जागा देणारे कोण? आम्ही दिलेल्या चार जागा तुम्ही घ्या अन्यथा फजिती करून घ्याल. आम्ही तुमचे सालगडी म्हणून राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा शनिवारी पार पडली. यावेळी आंबेडकर यांनी मोदी सरकार तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी … Read more

अर्थसंकल्प: २०१९ मत-मतांतरे

Budjet

#Budget2019 | केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प शुक्रवारी हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेत मांडला. विविध योजनांची खैरात करण्यात आली. शेतकरी, कामगार, मध्यमवर्ग या सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला. परंतु, प्रश्न पुढे येतो, तो एवढा पैसा आणणार कुठून? यावरूनच या अर्थसंकल्पावर खूप टीका टिप्पणी आणि समर्थनही देशभरातून होत आहेत. दिग्गजांनी मांडलेली मते : “अर्थसंकल्पातील तरतुदींचा … Read more

निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

अकोला प्रतिनिधी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षात आणण्यासाठी काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावानुसार आराखडा सादर होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेच्या आघाडीसाठी तडजोड करणार नाही, असा इशार बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. आज शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आघाडीतील कळीचा मुद्दा आरएसएस हा असून तो मान्य … Read more

प्रियांका गांधी बनल्या ‘मणिकर्णिका’, योगींच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची पोस्टरबाजी

लखनौ प्रतिनिधी | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत हालचालीला सुरुवात झाली आहे. पक्षात मोठा बदल करण्यात आला असून प्रियांका गांधी यांची पूर्व उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. दरम्यान प्रियांका गांधी यांनी मोदींविरोधात वाराणसीमधून लोकसभा निवडणुक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. आता वाराणसीपाठोपाठ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही … Read more

काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

जयपूर प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीत राजस्थानमध्ये काँग्रेसने विजय मिळवला असला तरी, या निवडणुकीत काँग्रेसला राजस्थानमधील जालोर येथे मोठ्या पराभवाला सामोर जावं लागलं. या पराभवाचा धडा घेण्यासाठी आणि पुढील निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर प्रदेश प्रचारक विवेक बंसल यांच्या उपस्थित एक जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू असताना काँग्रेसमध्ये दोन गट पडले आणि याचे रुपांतर हाणामारीत … Read more

मलकापूर नगरपरिषद निवडणूक; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

Untitled design

कराड प्रतिनिधी | राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपा नेते अतुल भोसले यांची मलकापूर नगरपंचायत निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरवात झाली असून कॉंग्रेस आणि भाजप मध्ये जोरदार घुमासान होण्याची शक्यता आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे समजले … Read more