चीनची खैर नाही! भारतीय लष्कर शक्तिशाली टी-९० भीष्म टॅंक गलवान खोऱ्यात करणार तैनात

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यातील हिंसक संघर्षांनंतर भारत आणि चीन यांच्यातील तणाव टिपेला पोहोचला आहे. चीनकडून सातत्यानं मोठा फौजफाटा सीमेवर तैनात होत असलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर सुद्धा तयार आहे. भारतीय लष्कराने गलवान खोऱ्यात १४ हजार फूट उंचीवर सहा टी-९० टँक तैनात केले आहेत. हे टँक क्षेपणास्त्र डागण्यासाठी सुद्धा … Read more

चीनसाठी धोक्याची घंटा! शक्तिशाली ‘राफेल’ फायटर जेटची पहिली स्क्वाड्रन भारतात दाखल होणार

नवी दिल्ली । शत्रूला धडकी भरवणारे राफेल फायटर जेटची पहिली स्क्वाड्रन येत्या २७ जुलै रोजी भारतात दाखल होत आहे. हरियाणातील अंबाला एअर बेसवर राफेलची पहिली स्क्वाड्रन तैनात होईल. राफेलची गोल्डन अ‍ॅरो स्क्वाड्रन ऑगस्टमध्ये कुठल्याही लढाईसाठी सज्ज असेल. प्राथमिक माहितीनुसार, फ्रान्सच्या इस्ट्रेसवरुन ४ ते ६ राफेल विमानांची पहिली खेप भारतात दाखल होईल. दक्षिण फ्रान्सच्या इस्ट्रेस बेसवरुन … Read more

आरोप करण्यापूर्वी इतिहासात काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे; शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

सातारा । राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे, असा सल्ला पवार यांनी राहुल यांना दिला आहे. शरद पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. भारत-चीन … Read more

चीनला धडा शिकवायचा तर त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार घातलाच पाहिजे- कंगना रनौत 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विविध विषयांवर नेहमीच परखड मत मांडणाऱ्या कंगना रनौत हिने आता भारत आणि चीन सीमेवरील वादावरून आपले मत व्यक्त केले आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकॉउंटवरून चीनला घडा शिकवला पाहिजे अशा आशयाचा व्हिडीओ बनविला आहे. यावेळी तिने सर्वाना उद्देशून चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास सांगितले आहे. तसेच हे युद्ध आपले सर्वांचे आहे असेही … Read more

निशस्त्र जवानांना चीनशी मुकाबला करण्यासाठी का धाडलं? प्रियंका गांधींचा मोदींना सवाल

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन देशांमधला तणाव चांगलाच वाढला आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखी वाढला आहे. या घटनेनंतर गलवान खोऱ्यात चीननं घुसखोरी केली नसल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं. मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी … Read more

पंतप्रधान मोदीजी, देशाला तुमच्याकडून सत्य ऐकायचंय!- राहुल गांधी

नवी दिल्ली । गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्यातील संघर्षानंतर सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ‘चीननं भारतीय जमिनीवर ताबा मिळवलेला नाही, घुसखोरी केलेली नाही’ या वक्तव्याला विरोधकांनी चांगलंच फैलावर घेतलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी समोर यावं आणि चीनच्या घुसखोरीबद्दल खरं काय आहे ते सांगावं, असं आवाहन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे केलं … Read more

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याचा चीन गैरफायदा घेतोय- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई । लडाखमधील गलवान खोऱ्यातील भारतीय हद्दीत चीनने कोणत्याही प्रकारची घुसखोरी केली नाही, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा चीनकडून गैरफायदा घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. चीनने भारतीय हद्दीत अतिक्रमण केले नाही, हा पंतप्रधान मोदींचा दावा साफ खोटा आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यामुळे वाटाघाटींमध्ये भारताची भूमिका … Read more

व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय; यंदाच्या दिवाळीत चीनी मालावर बहिष्कार

नवी दिल्ली ।  भारत-चीन युद्धजन्य तणावाच्या परिस्थितीत चीनी वस्तूंवर बहिष्काराची मागणी जोर धरत आहे. त्यासाठी आपल्या राष्ट्रीय अभियान ‘भारतीय सामान – आपला अभिमान’ अंतर्गत कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) आज देशातील व्यापाऱ्यांना आणि लोकांना चिनी वस्तूचा बहिष्कार टाकण्याचं आवाहन केलं आहे. यावर्षी दिवाळी मोठ्या प्रमाणात ‘भारतीय दिवाळी’ या रुपात साजरी करण्याचं आवाहनकॅट’ने केलं आहे. … Read more

भारत-चीन युद्ध झाल्यास रशिया तटस्थ राहिल ? पण का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गॅलवान व्हॅली स्टँड-ऑफपासून भारत आणि चीन यांच्या सीमेवर तीव्र तणाव निर्माण झाल्यानंतर देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह रशियाच्या दौर्‍यावर गेलेले आहेत. चीनशी वाढत्या ताणतणावाच्या दरम्यान हा दौरा म्हणजे जुना मित्र असलेल्या रशियाची मदत घेण्याचे धोरण म्हणूनही पाहिले जाते हे उघड आहे. मात्र , रशियाने नुकतेच स्पष्ट केले आहे की भारत आणि चीन … Read more

रशिया भारताला देणार हे ‘ब्रह्मास्त्र’; चीननं केला होता विरोध

मॉस्को । लडाख सीमेवर भारत आणि चीन या दोन देशामध्ये सीमावादावरून तणावाचं वातावरण आहे. अशा वेळी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाकडून अत्याधुनिक S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम भारताला मिळवण्याच्या दृष्टीनं राजनाथ सिंह यांचा हा दौरा महत्वाचा आहे. दरम्यान, रशियाने S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम भारताला देण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more