आरोप करण्यापूर्वी इतिहासात काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे; शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्दयावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अप्रत्यक्षपणे कान टोचले आहेत. राष्ट्राच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर आरोप करताना पूर्वी काय घडलं होतं, याचाही विचार केला पाहिजे, असा सल्ला पवार यांनी राहुल यांना दिला आहे. शरद पवार आज साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. भारत-चीन संघर्षावरून सत्ताधारी आणि काँग्रेस दरम्यान सुरू असलेल्या वाक् युद्धावरही त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी भूतकाळातील घटनांचे दाखलेही दिले.

काल परवा झालेल्या भारत-चीन संघर्षावेळी चीनने भारताचा काही भाग बळकावला ही गोष्ट खरी आहे. किती भूभाग बळकावला हे माहीत नाही. पण १९६२च्या युद्धानंतर चीनने आपला ४५ हजार किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो अजूनही चीनने सोडलेला नाही. ही गोष्ट आपण विसरू शकत नाही, असं सांगतानाच जेव्हा आपण आरोप करतो, तेव्हा पूर्वीच्या काळात मी असताना काय घडलं याचा मी विचार करतो. कारण हा राष्ट्राच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. त्यात राजकारण आणता कामा नये, असा सल्ला शरद पवारांनी राहुल गांधी यांना त्यांचे नाव न घेता दिला.

१९६२च्या युद्धानंतर चीनने भारताचा ४५ हजार चौरस वर्ग किलोमीटरचा भूभाग बळकावला होता. तो आजही परत मिळालेला नाही, अशी आठवण करून देतानाच राष्ट्राच्या संरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करू नका, अशा शब्दांत शरद पवार यांनी राहुल गांधी यांचे कान टोचले आहेत. चीन-भारत प्रश्न हा संवेदनशील आहे. चीनने गलवान खोऱ्यात कुरापती काढली हेही खरं आहे. मात्र, असे असले तरी भारत-चीन युद्ध होण्याची शक्यता नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. सियाचीनशी संपर्क साधण्यासाठी आपण गलवान खोऱ्यात रस्ता करत आहोत. गलवान खोऱ्यात आपल्याच हद्दीत आपण रस्ता करत असून त्या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरण्याची सोय करत आहोत. या रस्त्याचं काम सुरू असताना चीनचं सैन्य रस्त्यावर आलं आणि आपल्या सैनिकांसोबत त्यांची झटापट झाली, असं पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment