काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ला, ३ आतंकवादी ठार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि अतिरेक्यांच्या दरम्यान सुरू झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले. पोलिस सूत्रांनी सांगितले की, कुलगाम जिल्ह्यातील बटपोरा भागात दहशतवाद्यांच्या गटाच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिस आणि राष्ट्रीय रायफल्सच्या सुरक्षा दलाने काल सायंकाळी कारवाई सुरू केली.गाव परिसरातील बागेत लपून बसलेले दहशतवादी तिकडेच अडकले आणि जबरदस्तीने सुरक्षा … Read more

लाॅकडाउन मध्ये बाहेर पडणार्‍यांच्या कपाळावर पोलिसांकडून मारला जातोय ‘हा’ शिक्का

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. २१ दिवसांच्या लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरात राहण्यास सांगितले गेले आहे. परंतु बर्‍याच ठिकाणाहून लॉकडाऊनचे नियम मोडल्याच्या बातम्या येत आहेत. अशा परिस्थितीत जम्मू पोलिसांनी लॉक-डाऊन नियम फोडून घराबाहेर पडलेल्या लोकांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांच्या डोक्यावर आणि हातावर पोलिस शिक्के मारत … Read more

जम्मू-काश्मीरमध्ये IPC आणि CrPCसह ३७ केंद्रीय कायदे लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी दिलेल्या मंजुरीनंतर जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात भारतीय दंड संहिता ( IPC ) आणि फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) यासह ३७ केंद्रीय कायदे लागू करण्यात आले आहेत. या कायद्यांमध्ये नागरी प्रक्रिया संहिता, भारतीय वन कायदा, प्रेस काउंसिल एक्ट आणि जनगणना कायदा यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी कलम ३७० जम्मू-काश्मीरमध्ये अस्तित्वात … Read more

ट्रम्प यांनी केला काश्मीरविषयी मध्यस्थीचा पुनरुच्चार, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा काश्मीरविषयी मध्यस्थी करण्याचा पुनरुच्चार केला आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी खासमीरबाबत विचारलेल्या प्रश्नावर काश्मीरबाबत मध्यस्थी करण्याबाबत मी काहीही करू शकलो तर मी करेन, परंतु दोन्ही देशांना हवे असेल तर. असं संगितलं. पाकिस्तानच्या भूमीवरील दहशतवादाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की भारत … Read more

भारताने तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांना खडसावलं; आमच्या अंतर्गत मुद्दयांमध्ये हस्तक्षेप करू नका!

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काश्मीर संदर्भात केलेल्या विधानावरुन भारताने तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यीप एर्दोगान यांना खडे बोल सुनावले आहेत. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यात तुर्कस्तानने हस्तक्षेप करू नये असं भारताकडून सांगण्यात आलं आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, ”जम्मू-काश्मीर संदर्भात टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दिलेले सर्व संदर्भ भारत नाकारत असून जम्मू-काश्मीर हा भारताचा … Read more

भारतात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भारत आता लोकशाही देश राहिला आहे का ? अशी विचारणा करत केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. याबाबतचे एक ट्विट प्रियंका गांधी यांनी करत केंद्र सरकारच्या जम्मू-काश्मीरबाबतच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,”गेल्या सहा महिन्यांपासून जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना […]

श्रीनगर महामार्गावरील चकमकीत ३ दहशतवादी ठार; चकमक अजूनही सुरु

जम्मू-श्रीनगर महामार्गावर नगरोटा येथे भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून, या चकमकीत आतापर्यंत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. आज पहाटेपासून सुरू झालेली ही चकमक अजूनही सुरूच आहे.

अर्थसंकल्प 2020: जम्मू-काश्मीरमधील नवीन रेल्वे प्रकल्पांची होऊ शकते घोषणा, सर्व जिल्हे रेल्वेने जोडले जाणार

जम्मू-काश्मीरला यावर्षी सर्वसाधारण अर्थसंकल्पाप्रमाणेच रेल्वे अर्थसंकल्पाकडून सुद्धा बऱ्याच अपेक्षा आहेत. राज्यात रेल्वे नेटवर्क पसरविण्याबरोबर प्रलंबित रेल्वे मार्गाचे प्रकल्प आणि रेल्वे विभागातील कामही सुरू होण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात नवीन रेल्वे मार्गाची घोषणा होण्याची धाकट्या आहे. यात कठुआ-बासोली-भादरवाह रेल्वे मार्ग, जम्मू-अखनूर-रजोरी रेल्वे मार्ग आणि बिलासपूर-मनाली-लेह रेल्वे मार्ग यांचा समावेश असू शकतो. दरम्यान, जम्मू-अखनूर-राजोरी रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे.

मोदी मुस्लीमबहूल काश्मीरवर निर्बंध लादून हिंदूराष्ट्र निर्माण करत आहेत – उद्योगपती जॉर्ज सोरोस

नुकतच ‘द इकॉनॉमिस्ट’ या प्रसिद्ध मासिकाने आपल्या नव्या आवृत्तीत मोदी सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. या आवृत्तीतील सर्वांत प्रदीर्घ लेख, ‘नेता’ हा अधिक जहरी आणि चर्चेचा विषय आहे. त्यात असे लिहिले आहे की, “पंतप्रधान मोदींमुळे 20 कोटी मुस्लिम घाबरले आहेत कारण पंतप्रधान हिंदू राष्ट्र बनविण्यात व्यस्त आहेत.” असं सांगितलं आहे.

केंद्र सरकारने केली जम्मू-काश्मीरसाठी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा

केंद्र सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं अनुच्छेद ३७० रद्द केलं होतं. त्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं होतं. गेल्या काही महिन्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये ठप्प पडलेल्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे. केंद्रशासित प्रदेश घोषित केल्यानंतर जम्मू-काश्मीरची अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या दृष्टीने या घोषणेकडे पहिले जात आहे. याबाबतची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने दिली आहे.