सांगली-कोल्हापूर महामार्गावरील अपघातात वाढदिवसादिवशीच तरुणाचा मृत्यू

सांगली-कोल्हापूर महामार्गावरील डी-मार्ट नजिक ॲपे रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या धडकेत एका मोटरसायकलस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. सचिन कोळी असं तरुणाचं नाव असून तो उदगाव येथील रहिवाशी होता. या अपघातात ॲपे रिक्षामधील प्रवासी सुद्धा जखमी झाले आहेत. मोहसिन मुबारख निपाणीकर, शाहिदा निपाणीकर, नाजिया मोहसिन निपाणीकर, सुजान मोहसिन निपाणीकर, प्रकाश अण्णा जावळेकर अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.

गोकुळचे राजकारण पेटलं; मंत्री सतेज पाटलांना शह देण्यासाठी महादेवराव महाडिक आणि काँग्रेसचे पी.एन.पाटील एकत्र, वाचा स्पेशल रिपोर्ट

कोल्हापूर प्रतिनिधी, सतेज औंधकर : कोल्हापूरात गोकुळच्या निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने आज सुरू झालीय. पालकमंत्री सतेज पाटलांच्या विरोधात कॉंग्रेसचेच आमदार पी.एन. पाटील गोकूळच्या रिंगणात उतरले आहेत. सतेज पाटील यांचे कट्टर विरोधक महादेवराव महाडिक परिचित आहेत. यंदाच्या गोकुळच्या निवडणुकीत पी एन पाटील हे महादेवराव महाडिक यांच्या सोबत गेल्यामुळे एप्रिलमध्ये होणारी निवडणूक रंजक झाली आहे. गोकुळसाठी ठराव … Read more

शिरोळमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात भाजपचे जोडे मारो आंदोलन

कोल्हापूर प्रतिनिधी, सतेज औंधकर : माजी खा. उदयनराजे यांना छत्रपती शिवाजीराजे यांचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत यांच्या वक्तव्याचा शिरोळ तालुका भाजपतर्फे शिरोळ येथे निषेध व्यक्त करण्यात आला.शिरोळ येथील छत्रपती शिवाजी चौकात सकाळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजीराजे यांचे वंशज असल्याचे पुरावे मागणाऱ्या संजय राऊत यांच्या प्रतिमेस जोडे … Read more

समाजातील शोषित घटकांना उभं करण्यासाठी राज्य करणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज – शरद पवार

कोल्हापूर प्रतिनिधी, सतेज औंधकर : समाजातील शोषित, पीडित, उपेक्षित घटकांना उभं करण्यासाठी सत्तेचा वापर करून रयतेसाठी राज्य करणारा राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज होय, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराजांच्या कार्याचा, कर्तृत्वाचा गौरव केला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाचा लोकार्पण सोहळा आज कोल्हापूरमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंबाबाई चरणी लिन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. यावेळी अंबाबाईची विधीवत ओटी भरून त्यांनी मनोभावे पूजा केली. यावेळी त्यांच्यासोबत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापुरात संजय राऊत यांच्या विरोधात भाजपाने केलं निदर्शन

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात भाजपने जोरदार निदर्शने करत संताप व्यक्त केलाय. शिवसेनेचे संजय राऊत म्हणजे वाचाळवीर असल्याची टीका भाजपा महानगर अध्यक्षांनी केली.

पन्हाळगडावर छत्रपती संभाजी महाराजांचा 340 वा राज्यभिषेक दिन सोहळा संपन्न

छत्रपती संभाजी महाराजांचा 340 वा राज्य भिषेक दिन सोहळा कोल्हापूरच्या पन्हाळगडावर उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याच आयोजन छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक तुम्ही आज आणि पन्हाळा गिरीस्थान नगर परिषद तर्फे करण्यात आलं होतं. सकाळी आठ वाजल्यापासून पन्हाळगडावरील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर इथून ध्वज पूजन, गणेश पूजन आणि पालखी पूजनाने सोहळ्याची सुरुवात झाली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील शिवाजी महाराज; भाजपच्या माजी आमदाराकडून वादग्रस्त पुस्तकाचे समर्थन

कोल्हापूर, हॅलो महाराष्ट्र प्रतिनिधी, सतेज औंधकर : पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक काळातील छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि अशी तुलना करणे काही गैर नसल्याचे इचलकरंजीचे भाजपचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी म्हंटले आहे. भाजपचा कार्यकर्ता या नात्याने मी या लेखकाचं समर्थन करतो. हा शिवाजी महाराज यांचा सन्मान आहे, असे म्हणत त्यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र … Read more

देशव्यापी बंद : कोल्हापूर जिल्ह्यातील ३ लाख कर्मचारी संपात सहभागी

केंद्र सरकारच्या कामगार विरोधी आणि नागरिकविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात आज कोल्हापुर जिल्ह्यातील सुमारे 3 लाख कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी टाऊन हॉल चौकातून काढलेल्या मोर्चात २५ हजार पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. मोर्चात केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था मात्र पूर्णतः कोलमडली होती.

लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेचा विविध मागण्यांसाठी मोर्चा

आज कोल्हापूर येथील सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न लाल बावटा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला होता.