शिवारच मोकळं पडल्यावर शिवथाळी आणणार कोठून? राजू शेट्टींचा सवाल

शिवारात पिकवणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिला बघा जर शेतकऱ्यांचे शिवारच मोकळं पडलं तर शिवथाळीमध्ये अन्न आणणार कोठून शेवटी आयातच करावं लागेल अशा शब्दात राजू शेट्टी यांनी खरमरीत टीका केली.

वाहन चालकांचे रस्त्यावर बसून खर्डा भाकरी आंदोलन

कोल्हापूर शहरातील खड्डेयुक्त रस्ते डांबरीकरणास महापालिका प्रशासन कमी पडत असल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे खड्डयात बसून भोजन करण्यात आले. या खड्डेभोजन आंदोलनाने जणू नववर्षाचे स्वागत करण्यात आले. पापाची तिकटी ते शिवाजी चौक या मार्गावर हे आंदोलन करण्यात आले.

शहरातील शिवाजी चौक ते पापाची तिकटी हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे आहेत. रस्त्यातील महाकाय खड्डे अपघाताला आमंत्रण देणारे आहेत. खराब रस्त्यामूळ या मार्गावर वाहतुकोंडीमुळं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही-राजू शेट्टी

संपूर्ण कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. अशी प्रतिक्रिया माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी कर्जमाफीवर दिली आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाही. तसेच सरकार २१ हजार कोटींची कर्जमाफी करत असल्याचा दावाही खोटा असून कर्जमाफीची यादी जाहीर केल्यास सरकार उघडे पडेल अशी टीकाही माजी खासदार राजु शेट्टी यांनी केली. ते कोल्हापूरात बोलत होते.

कोल्हापूर जिल्ह्यात १२ खासगी सावकारांच्या घरांवर छापे

जिल्ह्यातील १६ खासगी सावकारांच्या घरावर गुरुवारी दिनांक १२ रोजी सकाळी पोलसांनी छापे टाकले. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली  आहे. तर जिल्ह्यातील इतर सावकारांचे मात्र धाबे दणाणले आहेत. हि कारवाई पुढील तीन दिवस सुरू राहणार असल्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरु आहे.

दहावीच्या माजी विद्यार्थ्यांकडून मोफत आरोग्य तपासणी;दत्त जयंती निमित्त अनोखा उपक्रम

जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात असणाऱ्या खिंडी व्हरवडे गावात दत्त जयंती निमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. अथायु मल्टी-स्पेशल हॉस्पिटल, कोल्हापूर व न्यू इंग्लिश स्कुल एस. एस. सी बॅच खिंडी व्हरवडे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच २०००-२००१ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.

कोल्हापूर जिल्हा परिषदेत सत्ता बदलाचे संकेत; महाविकासआघाडीने सत्तेसाठी कंबर कसली

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पुन्हा सत्ता आणण्याचा निर्धार काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांनी बोलून दाखविला. जि.प.च्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बुधवारी दोन्ही काँग्रेसच्या सदस्यांशी संवाद साधला. ‘राज्यामध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन महाविकासआघाडीच्या सरकारची स्थापना झाली. राज्यातील महाविकास आघाडीचा पॅटर्न जिल्हा परिषदेत आकाराला येईल. शिवसेनेचे दहा सदस्य दोन्ही काँग्रेस आघाडीसोबत येतील,’ असेही आमदार पाटील यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात बैठक झाली. सदस्यांना भेटण्याअगोदर मुश्रीफ व पाटील यांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर त्यांनी सदस्यांशी संवाद साधला.

कोल्हापूरचे साहिल चौहान ठरले पहिले शाकाहारी ‘आयर्नमॅन’

कोल्हापूरच्या एस. बी. चौहान स्टीलचे साहिल सुरेश चौहान हे या वर्षीचे ‘आयर्न मॅन’ ठरले आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये पार पडलेल्या २२६ किमीच्या या स्पर्धेत जगातील हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. चौहान यांच्या या विजयाने कोल्हापूरच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण शाकाहारी असलेले चौहान हे ही स्पर्धा पूर्ण करणारे एकमेव ठरले आहेत.

कोल्हापुरात मटण दराचा संघर्ष तीव्र होणार

कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मटण दरावरून सुरू झालेला संघर्ष आता आणखीनच तीव्र होणार आहे जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीमध्ये मटण विक्रेते सहभागी होणार नसल्याने हा पेच वाढणार आहे. त्यामुळे नक्की कोणत्या दराने मटन खरेदी करायचं हा प्रश्न  अनुत्तरित आहे.

अगं अगं म्हशी, खड्डे सांभाळून जाशी..!!

कोल्हापुरात रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे असल्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. या प्रश्नासाठी वारंवार मागणी करण्यात आली. तसेच वेळोवेळी यासाठी निदर्शनेदेखील करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून अदयाप हि ठोस पाऊले उचलले जात नाहीत. रस्त्यांच्या याच प्रश्नावरून आता ‘मनसे’  आक्रमक झाली आहे.

हसन मुश्रीफांनी निकाला आधीच उधळला गुलाल !

विधानसभा निवडणुकीचं मतदान सोमवारी किरकोळ घटना वगळता शांततेत पार पडले. मतदानानंतर आता सगळ्यांचं लक्ष निकालाकडे लागलेलं असताना पुण्यासह राज्यात काही उमेदवारांनी मतदान संपल्यानंतर फटाके फोडून जल्लोष केला. निकाला तीन दिवस बाकी असतानाच उमेदवारांनी फटाके फोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.